आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, एक काळ असा होता जेव्हा पन्नाशीनंतर हृदयासंबंधातील समस्या जाणवू लागायच्या. पण आता कोणत्याही वयोमर्यादेत हृदयासंबंधातील समस्या होण्याची शक्यता असते. अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हार्ट अॅटॅकच्या समस्येला बळी पडू शकतो. आता अशाही काही केसेस समोर आल्यात की अगदी ज्यामध्ये वीस वर्षाचा तरुण मुलाला हार्ट अटॅकचा त्रास झाला आहे.
असं का होत असेल बरं? सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जबाबदार्या वाढल्या आहेत. त्यामुळे ताणतणाव वाढले आहेत. वेळेवर जेवण नाही, पुरेशी झोप नाही, बदलती जीवनशैली याची कारणे असू शकतात. पण अनेक लोक संकुलीत आहार घेत नाहीत, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मात्र, तुम्हाला या आरोग्यसंबंधीत समस्यांचे निराकारण कराचे असेल तर तुम्हाला वेळीच सावध होऊन योग्य आहार आणि व्यायामाची आवश्यकता आहे. आपण आजपर्यंत विविध लेखांच्या माध्यमांतून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी उपयोगी असलेली आसने पाहिली आहेत. आज आपण हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी उपयोगी असलेल्या काही आसनांबद्दल समजून घेणार आहोत. या आसनांच्या मदतीने आपण हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकतो.
खराब जीवनशैली, धुम्रपान, मद्यपान, अति खाणे यासारखी व्यसने आणि सर्वात वाईट म्हणजे, सतत ताण आणि चिंता अशा गोष्टी हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. दर तुम्हाला हृदयासंबंधातील समस्यांवर मात करायची असेल तर, जाणून घ्या सविस्तर माहिती. यासंदर्भात योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी “द इंडियन एक्स्प्रेस”शी बोलताना माहिती दिली आहे.
चक्रासन
चक्रासन योग हा एक प्रकारचा योग आहे जो पाठीवर झोपून केला जातो. चक्रासनामुळे पाय, नितंब, पोट, छाती, कंबर, मनगट आणि हात यांना बळकटी मिळते. परिणामी, चक्रासनाचा सराव सुरुवातीला केल्याने शरीराच्या विविध भागात वेदना होऊ शकतात, जे कालांतराने कमी होतील.
चक्रासन आसन पद्धत
- चक्रासन योगाचा सराव स्वच्छ व शांत वातावरणात करावा.
- जमिनीवर चटई टाकून त्यावर थोडा वेळ आराम करा.
- त्यानंतर, पाठीवर झोपून, दोन ते चार मिनिटे दीर्घ श्वास घ्या.
- दोन्ही गुडघे वाकवा आणि आपले घोटे आपल्या नितंबांवर आणा.
- दोन्ही हात वर करा आणि दोन्ही कोपर एकाच वेळी वाकवा.
- दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू तुमच्या शरीराचा मध्यभाग उंच करा.
- शेवटी, या स्थितीतून हळूहळू श्वास सोडा.
- आपण ही प्रक्रिया २ ते ३ वेळा पुन्हा करू शकता.
ग्रीवा संचालन:
शरीराला जोडणाऱ्या सर्व अवयवांच्या नसा मानेला जोडून असतात. खूप वेळ काम केल्याने मान आणि खांद्याकडील भागात दुखते. ग्रीवा संचालन म्हणजे मानेला फिरवून व्यायाम करा. याने मानेचा ताण दूर होऊन मानदुखी कमी होते.
ताडासन
- सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवा.
- दोन्ही हात सरळ ठेवा.
- आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर करा आणि हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा.
- हात सरळ ठेवत त्यांना थोडा ताण द्या
- तुमच्या दोन्ही पायांची टाच उचला आणि पायाच्या बोटांवर उभे रहा.
- यादरम्यान तुम्हाला तुमच्या शरिरात पायांपासून हाताच्या बोटांपर्यंत ताण जाणवला पाहिजे.
- १० सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि श्वास घेत रहा.
- आता श्वास सोडताना, तुमच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये या.
- हे योगासन तुम्ही १० वेळा करा.
हेही वाचा >> Blood sugar: मधुमेह असेल तर आहारामध्ये ‘या’ पदार्थाचे सेवन लगेच वाढवा! जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला
प्राणायाम
श्वास घेणं म्हणजे केवळ शरीरात हवा भरणं नाही. तर, श्वास घेण्याची देखील एक पद्धत आहे. जर आपण योग्य रितीने श्वासोच्छवास घेतला, तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. विशेष म्हणजे योगाभ्यासातही प्राणायाम करण्याला फार महत्त्व आहे.