बऱ्याचदा स्त्रिया आपल्या आरोग्याच्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. जर आपण वाढते वजन तसेच मासिक पाळीची अनियमितता यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असाल, तर वेळीच सावधगिरी बाळगा. ही लक्षणे ‘पीसीओडी’ या आजराची सुरुवात देखील असू शकतात. पीसीओडी हा असा आजार आहे, ज्यामुळे आपल्याला वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. देशात सुमारे १० टक्के महिला या पीसीओडीच्या समस्येने त्रस्त आहेत. पीसीओडीची समस्या अशा महिलांना होते.ज्या महिला नाईट शिफ्टमध्ये काम करत असतात. रात्रभर जागणे,उशीरा जेवण करणे यांमुळे लाईफस्टाईलचं नुकसान होत अटसते.कारण त्यामुळे त्यांना ही समस्या उद्भवते. मात्र ‘ही’ योगासने केल्यास तुम्ही पीसीओडीवर मात करु शकता.

योगा पीसीओडीवर उपाय –

योगाच्या माध्यामातून पीसीओडीची समस्या कमी करता येऊ शकते.कारण योगा केल्याने शरीरातील मानसिक,शारीरिक स्थितीवर प्रभाव पडत असतो. मेंटल टॉक्सीन्स आणि फिजिकल टॉक्सिन्सना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरत असतं.आज आम्ही तुम्हाला अशा योगासनांबद्दल सांगणार आहोत. ही योगासनं करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता.उष्ट्रासन,बटरफ्लाय आसन आणि मार्जरी आसन म्हणजेच कॅट पोज आणि सुर्य नमस्कार करून तुम्ही हा आजार होण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकता.

Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

चक्रासन –

हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक आहे; नियमित सरावाने पोटाची अतिरिक्त चरबी कमी करता येते. याशिवाय चक्रासन कंबर आणि बाजूची चरबी कमी करण्यास मदत करते. चक्रासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी इतके शक्तिशाली आहे की तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसून येईल.

पूर्ण तितली आसन –

प्रथम जमिनीवर बसा.आता दोन्ही पाय वाकवून तळवे एकमेकांना जोडून घ्या.हातांनी पाय धरून आत खेचण्याचा प्रयत्न करा, टाचांना शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.त्यानंतर मांड्यांवर जोर देताना फुलपाखराच्या पंखाप्रमाणे गुडघे वर-खाली करण्याचा प्रयत्न करा.

स्कंध चक्र आसन –

हे आसन केल्यानं तुमचे खांदे योग्य आकारात राहतात. जर तुम्हाला बाईक किंवा स्कूटरवर बराच वेळ प्रवास करावा लागत असेल किंवा तुम्ही संगणकावर बराच वेळ बसून काम करत असाल तर तुम्हाला हे आसन फायदेशीर ठरु शकत.

उष्ट्रासन –

हे आसन करताना आपल्या पाठीचा कणा वाकतो, तोच भाग वाकवताना जास्त ताणू नका. इतर योगासनांप्रमाणे, या आसनाचा अभ्यास देखील सकाळी केला जातो. सकाळी व्यायाम करणे अधिक फायदेशीर असते. परंतु काही कारणांमुळे तुम्हांला सकाळच्या वेळी योगाभ्यास करायला वेळ न मिळाल्यास तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी न केलेला सराव पूर्ण करु शकता.

हेही वाचा – ज्वारी, बाजरीची भाकरी विसरुन जाल! ट्राय करा मऊ लुसलुशीत कडधान्याची भाकरी

या एका व्यायाम प्रकारात विभिन्न प्रकारच्या व्यायामांचे लाभ समाविष्ट आहेत. कुठल्याही वयाची व्यक्ती या व्यायाम प्रकाराने फिटनेस मिळवू शकते. यामध्ये बारा आसनं आहेत.  यामुळे तुम्ही आपल्या सेक्शुअल हेल्थची सुद्धा काळजी घेऊ शकता.