Common sunscreen mistakes: आजकाल अनेकांनी आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये सनस्क्रीन वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु, नियमित सनस्क्रीन वापरूनही अनेकांना टॅनिंग होते, अशी त्यांची तक्रार असते. यासंबंधी Indianexpress.com ने त्वचारोगतज्ज्ञांशी संवाद साधला आणि सनस्क्रीन वापरण्यातील सामान्य त्रुटी शोधल्या. संवादादरम्यान त्वचारोगतज्ज्ञांनी सनस्क्रीन वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हेदेखील स्पष्ट केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सनस्क्रीनचं अयोग्य प्रमाण
“लोक योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावत नाहीत. बरेच जण अगदी थोड्याच प्रमाणात सनस्क्रीन वापरतात आणि ते पुरेसं आहे, असं त्यांना वाटतं. तुम्ही कमीत कमी तीन बोटांना पुरेल इतकी सनस्क्रीन वापरावी आणि ती तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर व कानाला लावावी,” असं एस्थेटिक्सच्या संस्थापक, सौंदर्य चिकित्सक व प्रोमेड डॉ. आकांक्षा सिंग कॉर्निट म्हणाल्या.
“सनस्क्रीन लावताना काही लोक संपूर्ण चेहऱ्याला लावत नाहीत; फक्त कपाळ व गालालाच लावतात आणि नाक, कान, गळा विसरूनच जातात. त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा येतो आणि नाकाजवळ पीलिंगदेखील होऊ शकते,” असं डॉ. म्हणाल्या.
SPF 30 पुरेसे नाही
कॉर्निट यांच्या मते, लोकांचा गैरसमज आहे की SPF 30 भारतीय हवामानासाठी पुरेसं आहे. आपल्या देशात कडक उन्हाचा सामना करताना, SPF 50 पेक्षा कमी SPF चं सनस्क्रीन वापरणंदेखील धोकादायकच ठरू शकतं. “नेहमी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनब्लॉक निवडा, जो UVA, UVB किरण आणि निळ्या प्रकाशापासून तुमचं संरक्षण करेल. तुम्ही घरात असलात तरीही, इलेक्ट्रॉनिक स्क्रीनच्या दीर्घकाळ वापरामुळे नुकसान होऊ शकते,” असं कॉर्निट म्हणाल्या.
“सनस्क्रीनची परिणामकारकता कालांतरानं कमी होत जाते. त्यामुळे एक्स्पायर्ड प्रॉडक्ट्स वापरल्याने त्वचेला हानी पोहोचू शकते. आपल्या त्वचेला संभाव्य हानीपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन ढगाळ वातावरण असताना लावा,” असा सल्ला सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथील सल्लागार त्वचाविज्ञानैक डॉ. कुसुमिका कनक यांनी दिला.
कॉर्निट यांनी इतर क्रीम किंवा मॉइश्चरायजर्समध्ये मिसळून सनस्क्रीन लावण्याबद्दल सावधगिरीचा इशारा दिला. या पद्धतीमुळे प्रॉडक्टची प्रभावीता कमी होते आणि परिणामी सनब्लॉकचे फायदे कमी होतात.
सनस्क्रीन रिअप्लाय करणे
डॉ. कनक यांच्या मते, सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान सूर्याची तीव्रता जास्त असते आणि या वेळेस सनस्क्रीन लावले असले तरीही जास्त वेळ घराबाहेर असल्याने तुमची टॅनिंग होण्याची शक्यता वाढते.
“दर तीन तासांनी SPF पुन्हा रिअप्लाय करण्याबरोबरच, सनस्क्रीन स्टिकऐवजी पावडर सनस्क्रीन वापरण्याची मी शिफारस करते. सनस्क्रीन स्टिक मेकअप अॅप्लिकेशनमध्ये व्यत्यय आणू शकते. खराब फॉर्म्युलेटेड सनस्क्रीन स्टिक्सदेखील कॉमेडोजेनिक असू शकतात, ज्यामुळे पोअर्स ब्लॉकेज आणि मुरमे येऊ शकतात,” असं कॉर्निट म्हणाल्या.
टिंट असणाऱ्या सनस्क्रीनचा वापर
टिंटेड सनस्क्रीन किंवा मेकअपमध्ये SPF असणाऱ्या प्रॉडक्ट्सना बळी पडू नका. “हे प्रॉडक्ट्स अपुऱ्या SPFसह येतात; ज्यात फक्त १५-२५ इतकंच SPF असतं. जर तुम्ही तुमच्या सन प्रोटेक्शनसाठी अशा प्रॉडक्ट्सवर पूर्णपणे विसंबून असाल, तर तुम्हाला हवे ते परिणाम मिळणार नाहीत.”
त्याऐवजी नियमित सनब्लॉक वापरणे आणि नंतर टिंटेड सनस्क्रीन, स्किन टिंट किंवा बीबी क्रीम वापरण्याबद्दल डॉ. कॉर्निट यांनी सुचवले.
(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)