अतिवृद्ध व्यक्तींच्या हातांवर व क्वचित प्रसंगी पायांवर एकदम लालभडक रंगाचे चट्टे ( Senile purpura ) अचानक येतात . ते हळूहळू निळसर, हिरवट होत एक दोन आठवड्यात निघून जातात. असे अधेमधे सुरू राहते. वयस्क व्यक्तींच्या त्वचेतील इलॅस्टिन व कोल्याजिन फायबर्स कमी झाल्यामुळे त्वचेखालील केशवाहिन्यांचा आधार कमी होतो व त्या नाजूक होतात. त्यामुळे थोडेसे लागले तरी त्वचेखाली रक्तस्त्राव होतो व असे लाल चट्टे तयार होतात. अंघोळ करताना हात जोरात घासू नयेत व हातांना धक्का लागू नये म्हणून जपणे. शिवाय, दोन वेळ मॉईश्चरायझर लावणे, याने आराम पडेल.

आणखी वाचा : Health special: डोळा आळशी का होतो?

Orange Peel Theory What is the Orange Peel Theory Why is this theory trending in 2024
Orange Peel Theory : ऑरेंज पील थेअरी काय आहे? २०२४मध्ये का ट्रेंड होत आहे ही थेअरी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण

चेहरा व मानेवरील चामखीळे : ( Seborrheic keratosis and Skin tags ) वय व वजन जसे वाढत जाते तसे काहींना चेहऱ्यावर व मानेवर काळपट किंवा त्वचेच्या रंगांची छोटी छोटी चामखीळे येतात. यामध्ये थोडी अनुवंशिकतादेखील असते. यातील मानेवरील नरम, त्वचेच्या रंगाची चामखिळे (skin tags) ही पुष्कळदा मधुमेह किंवा स्थूलपणा (Obesity) यामुळे येतात. अशी चामखीळे बारीक असल्यास फक्त मलमाने सुन्न करून व मोठी असल्यास जागेवर इंजेक्शन देऊन मशीनने काढता येतात.

आणखी वाचा : Health special: वृद्धत्व व त्वचारोग

नाकाम शिरांमुळे होणारे पायाचे इसब व जखमा : (Varicose eczema and ulcers) ज्यांना आयुष्यभर जास्त उभे राहून काम करावे लागते, त्यापैकी काहींना वयपरत्वे हा आजार होण्याची शक्यता असते. नुसते उभे राहिल्यामुळे पायांच्या स्नायूंची हालचाल होत नाही. त्यामुळे अशुद्ध रक्त वेगाने हृदयाकडे जात नाही. तसेच हे रक्त वाहणाऱ्या शिरांच्या झडपा निकामी होत जातात व शिरा फुगून मोठ्या होतात. अशुद्ध रक्तात प्राणवायू कमी असल्याने थोडेसे खरचटले तरी त्याचे जखमेत रूपांतर होते व ती लवकर बरी होत नाही . त्याला व्हेरिकोज अल्सर म्हणतात. काहींना अशा नाकाम शिरांमुळे पायाला खाज येते. तो भाग काळसर होतो व तेथील त्वचा जाड होवून कधी कधी त्यातून पाणी येते.याला नाकाम शिरांमुळे होणारा इसब (Varicose eczema) म्हणतात. यासाठी स्थितिस्थापक पट्टा (Elastocrepe bandage or stockings) वापरणे व जास्त चालणे, तसेच झोपताना पाय लोड किंवा उशांवर ठेवणे आवश्यक असते. औषधोपचार तसेच लेझर किंवा इतर शस्त्रक्रियेद्वारे देखील याच्यावर उपचार होऊ शकतात.

आणखी वाचा : Health special: तुम्हाला होणाऱ्या वेदनेची तीव्रता कशावर ठरते?

तळपायांच्या भोवऱ्या : (Corns) वयोमानाप्रमाणे जशी पावलांची हाडे झिजतात व अस्थिबंधन (Ligaments) कमजोर होतात तसे तळपायांच्या ज्या छोट्या हाडांवर पूर्ण शरीराचे वजन पडते त्या खालील त्वचा जाड होवून तिथे भोवऱ्या (Corns) तयार होतात . भोवऱ्या असलेल्या व्यक्तींनी घरीही एकदम नरम स्लीपर वापरावी. बाहेर गेल्यास बुटांमध्ये सिलिकॉनचे इन्सोल वापरावे , जेणेकरून भोवरीवर येणारा दाब विभागला जाईल व दुखणे कमी राहील. भोवरीची घट्ट त्वचा काढण्यासाठी भोवरीची पट्टी (Corn cap) किंवा ठराविक केमिकलयुक्त पेंट वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन ती नरम झालेली भोवरीची मृत त्वचा डॉक्टरांकडून काढून घ्यावी लागते. असे दोन-तीन महिन्यातून एकदा करावे लागते.

त्वचेचा कर्करोग : (Skin Cancer) वयपरत्वे इतर अवयवांप्रमाणेच त्वचेचा कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढते. याचे एकूण ३ प्रकार आहेत.
१) स्क्वामस सेल कार्सिनोमा: (Squamous Cell Carcinoma) चेहरा, डोके, हात, पाय, तोंडाचा आतील भाग व इतरत्रही स्क्वामस सेल कार्सिनोमा हा त्वचेचा कर्करोग होऊ शकतो . यामध्ये न दुखणारी, लाल रंगाची, फुलकोबीसारखा खडबडीत पृष्ठभाग असणारी व आसपासच्या त्वचेपेक्षा वर आलेली गाठ किंवा जखम असते. अशा जखमेचा त्रास होत नाही म्हणून तिथे दुर्लक्ष न करता लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

२) बेसल सेल कार्सिनोमा (Basal Cell Carcinoma) या कर्करोगात जास्त करून चेहऱ्यावर एक छोटीशी न दुखणारी पुळी येते व ती फार हळूहळू वाढत जाते. मधला भाग चपटा होतो व सभोवारी ती रिंगणाकार वाढत जाते . कधी कधी मध्ये जखमही होते. अंगावर कुठेही एखादी पुळी येऊन ती हळूहळू वाढत असेल किंवा तिचे जखमेत रूपांतर होत असेल तर ती दुखत नाही म्हणून तिथे दुर्लक्ष करू नये. वरील दोन्ही प्रकारचे त्वचेचे कर्करोग शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे बरे होऊ शकतात.
३) मेलानोमा: ( Melanoma ) सुदैवाने त्वचेच्या या कर्करोगाचे प्रमाण जगातील इतर श्वेतवर्णीय लोकांपेक्षा भारतीयांमध्ये कमी आहे. हा त्वचेतील रंगांच्या पेशींचा कर्करोग आहे. याची लक्षणे खालील प्रमाणे आहेत
अ) अचानक आलेला काळा तीळ जो कमी वेळात जास्त वाढत आहे.
ब) आधी असलेला काळा तीळ जो अचानक वाढू लागला आहे. त्याच्यातून लस किंवा रक्त येते. त्याच्या रंगात बदल होतोय.
क) हातापायांच्या नखांजवळ किंवा हातापायावर काळा डाग किंवा नख काळे पडणे व बरेच दिवस तो डाग तसाच राहणे. पुढे त्यात जखम होणे . हे डाग किंवा तीळ किंवा जखमा दुखत नाहीत किंवा त्यांचा त्रास होत नाही म्हणून दुर्लक्ष करू नये. कारण त्वचेच्या कर्करोगांपैकी हाच एक कर्करोग असा आहे की जो पुढे लसिका ग्रंथी, यकृत , फुप्फुस, हाडे , मेंदू आणि इतरत्र पसरतो व त्यामुळे व्यक्ती दगावू शकते .

जंतूजन्य किंवा बुरशीजन्य आजार : (Bacterial and Fungal Infections) वाढत्या वयाप्रमाणे माणसाची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते व ते लवकर आटोक्यात येत नाहीत. काही वृद्धांना कमरेवर , जांघेत किंवा पाठीमागे वारंवार खाजरे नायटे ( बुरशी संसर्ग ) होतात. अतिवृद्ध व्यक्ती ज्यांच्या ओठांच्या कडेतून रात्री लाळ गळते त्यांना त्या ठिकाणी सफेद बुरशी जमते व लालसर जखम होते. काही वृद्धांना वारंवार गळवे होणे किंवा नखुरडे होणे असे आजारही होतात. असे झाल्यास मधुमेह तर नाही ना याची खात्री करावी लागते.

शय्याव्रण : (Bedsore) शय्याव्रण किंवा दाबव्रण हे ज्या अति आजारी व्यक्ती दीर्घकाळ हालचाल न करता निपचित गादीवर पडून असतात त्यांना हाडांच्या भागावर जिथे दाब पडतो तिथे जखमांच्या स्वरूपात दिसतात. सततच्या दाबामुळे तेथील रक्तप्रवाह कमी होतो. सुरुवातीला ती त्वचा चमकदार, काळपट व लाल होते. नंतर तिथे जखम होते. या जखमा बऱ्या होण्यासाठी हवेची किंवा पाण्याची गादी वापरणे , रुग्णाची स्थिती (कुशी) दोन-तीन तासांनी बदलणे, चादरीवर सुरकुत्या पडू न देणे, जखमेची प्रतिजैविक मलमाने पट्टी करणे, जखम असलेल्या भागावर कमीत कमी दाब येईल हे पाहणे हे महत्वाचे असते.

म्हातारपण हे अपरिहार्य आहे, पण आजाराचे तसे नाही. योग्य ती काळजी घेतल्यास, बहुतेक आजार एक तर टाळता येतात किंवा त्यांची लवकरच दखल घेतल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतात. त्वचारोगही त्याला अपवाद नाहीत. फक्त त्यासाठी आवश्यक आहे ती जागरूकता. जागते रहो !

Story img Loader