You can burn more calories during your daily walk: चालणे, हा एक साधा; पण प्रभावी व्यायाम आहे. चालण्यामुळे वजन नियंत्रण, हृदयाचे आरोग्य सुधारणे असे अनेक आरोग्य फायदे होतात. तुमच्या चालण्यामुळे अधिकाधिक कॅलरी बर्न होऊ शकतात; पण काही खास तंत्रांचा वापर केल्याने तुमचा हा चालण्याचा व्यायाम अधिक प्रभावी होऊ शकतो. दिल्लीच्या सी. के. बिर्ला रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंदर पाल सिंग यांनी खालील गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमच्या चालण्याच्या व्यायामाला चालना देण्यासाठी ९ टिप्स

चालण्याची गती वाढवा : अधिकाधिक कॅलरी बर्न होण्यासाठी, फक्त तुमचे चालण्याचे प्रमाण वाढविण्यापेक्षा चालण्याची गती वाढविण्यावर लक्ष द्या. एक चांगली गती ठरवा; ज्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. ‘इंटरव्हल ट्रेनिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धतीचा समावेश केल्यानेदेखील कॅलरी बर्न होण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. सुहाग यांनी सांगितले.

उंचावर चालण्याचा फायदा घ्या : डोंगरावर चालल्यामुळे तुमच्या स्नायूंना आव्हान मिळते आणि कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया वाढते. डोंगराळ जागा शोधा किंवा हिल सेटिंग असलेल्या ट्रेडमिलचा वापर करा; जेणेकरून तुमच्या व्यायामाची गती वाढू शकेल.

हेही वाचा… तुमच्या पाळीव श्वानांना ‘ही’ फळे खायला देताय? मग वेळीच थांबा! आरोग्यासाठी ठरतील धोकादायक, तज्ज्ञ म्हणतात…

तुमचे शरीर मजबूत करा : तुमच्या दिनचर्येत शक्ती वाढवणारे व्यायाम समाविष्ट करा, ज्यामुळे मांसपेशी वाढतात. डॉ. सुहाग यांच्या मते, मांसपेशींची वाढलेली मात्रा तुमच्या मेटाबॉलिक रेटला वाढवते (उच्च चयापचय दर), ज्यामुळे तुम्ही विश्रांती घेत असतानाही जास्त कॅलरी बर्न करू शकता.

योग्य स्थिती आणि रूप : तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवून हात फिरवत, त्याची हालचाल करा. त्यामुळे चालण्याची कार्यक्षमता सुधारते.

हायड्रेशन आणि योग्य शूज : चालण्यापूर्वी, चालताना आणि चालल्यानंतर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा. तुमच्या पायांना आणि सांध्यांना संरक्षण देण्यासाठी आरामदायक आणि सपोर्ट देणारे शूज वापरा.

तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या : तुमचं चालण्याचं अंतर, वेळ आणि बर्न झालेल्या कॅलरीज मोजण्यासाठी फिटनेस ट्रॅकर किंवा अ‍ॅप वापरा. प्रगती ट्रॅक केल्याने तुम्हाला प्रेरित राहायला मदत होईल आणि सुधारणा करण्याची जागा ओळखता येईल.

हेही वाचा… “आम्हाला मूल नको होतं; पण…”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा खुलासा! सांगितला मातृत्वाचा कमी बोलला जाणारा पैलू

चालण्यासाठी एक साथीदार शोधा : मित्राबरोबर चालल्याने तुमचा व्यायाम अधिक आनंददायक होईल आणि तुम्ही नियमितपणे व्यायाम करीत राहाल.

तुमच्या शरीराचे ऐका : तुमच्या शरीराचे संकेत लक्षात घ्या आणि चालण्याची गती व वेळ त्यानुसार समायोजित करा. स्वत:ला जास्त थकवू नका आणि विश्रांतीसाठी तुमचा वेळ घ्या.

तुमच्या मार्गात बदल करा : कंटाळा येऊ नये म्हणून वेगवेगळ्या मार्गांचा शोध घ्या आणि तुमच्या शरीराला आव्हान द्या.

ही तंत्रे तुमच्या चालण्याच्या दिनचर्येत समाविष्ट केल्याने तुम्ही जास्त कॅलरीज बर्न करू शकता, संपूर्ण फिटनेस सुधारू शकता आणि या सोप्या व्यायामाच्या अनेक फायद्यांचा अनुभव घेऊ शकता. लक्षात ठेवा, तुमचे फिटनेस लक्ष्य साधण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to burn more calories during daily walk here are 9 tips from experts dvr