Parenting Advice: मुलं आयुष्यात किती प्रगती करु शकतात आणि किती यशस्वी होऊ शकतात हे त्यांच्या पालकांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून असते. अनेक मुलांचा आत्मविश्वास लहानपणीपासूनच कमी असतो तर काही मुलं अत्यंत आत्मविश्वासू असतात. लहानपणीचा हाच आत्मविश्वास आयुष्याभर उपयोगी पडतो. आपण नेहमी पाहतो की जे मुलं आत्मविश्वासू असते कोणत्याही गोष्टीत पुढे असतात आणि संकोच बाळगणारी, आत्मविश्वास कमी असलेले मुलं मागे असते. अशी मुलं आयुष्यभर आत्मविश्वासाच्या कमतरेचा सामना करतात. आपल्या मुलांनी नेहमी पुढाकार घ्यावा, नेतृत्व करावे असे प्रत्येक पालकांना वाटणे सहाजिक आहे. मुलांनी स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करावे असे पालकांना वाटत असते. पण हे साध्य करण्यासाठी मुलांना लहानपणीपासून तसे संस्कार करावे लागतात. तुमच्या मुलाचे नेतृत्व कौशल्य वाढवायचे असेल तर पालक म्हणून काय करावे हे जाणून घ्या.
मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य कसे निर्माण करावे?
मुलांना हारण्याची भिती दाखवू नका
मुलं कधीही स्टेजवर काही परफॉर्म करत असतील किंवा कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेत असेल तर हारण्याची भिती दाखवू नका. मुलाना कधीही असे सांगू नका की, “चांगली कामगिरी नाही केली तर त्याचा अपमाना होईल” किंवा त्यांनी कोणतेही लोभ दाखवू नका. मुलांना समजवा की, “तुम्ही तुमचे सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करा आणि बाकी कसाच विचार करू नका”
हेही वाचा – मुलींवर संस्कार करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, प्रत्येकजण करेल लेकीचे कौतुक, तुम्हालाही वाटेल अभिमान
खेळात सहभागी व्हायला सांगा
जे मुलं कोणत्याही प्रकारचा खेळ खेळतात त्यांच्यामध्ये उत्तम नेतृत्व कौशल्या निर्माण होतात. ही मुलं नेतृत्वासह टीमवर्क देखील शिकतात.
मुलांना पुढाकार घ्यायला शिकवा
अशी अनेक कामे आहेत ज्यात मुलं पुढाकार घेऊ शकतात. पुढाकार घेऊन मुलं छोटी-छोटी काम करू लागतात. मुलांना समस्या सोडवायला शिकवा आणि मुलांमध्ये दयाळूपणा निर्माण होईल आणि ते इतरांची मदत करायला शिकतील. एका चांगल्या नेत्याचे हेच गुण असतात.ॉ
हेही वाचा – रात्रपाळीसाठी काम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कसा टाळू शकतात?
संवाद कौशल्य सुधारण्यावर भर द्या
मुलांचे संवाद कौशल्य सुधारण्यावर भर द्या. मुलांना मोकळेपणाने संवाद साधायला शिकवा. नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. मुलांना काय आवडते आणि काय नाही याबाबत त्यांच्यासह बोला आणि आत्मविश्वासाने सर्व मुद्यांवर आपले मत मांडू शकतात.