The Best Way to Eat Bread: ब्रेड हा आपल्या दररोजच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. काही लोकांना साधा ब्रेड, तर काही लोकांना भाजलेला ब्रेड आवडतो? प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतींनी ब्रेडचे सेवन करतात; पण तुम्हाला माहितीये का, ब्रेड कसा खावा?
हेल्थ कोच निपा आशाराम सांगतात, “ब्रेड भाजून खाणे चांगले आहे. या ब्रेडमुळे रक्तातील साखरेचे व ग्लुकोजचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक कमी करते. कारण- जेव्हा आपण ब्रेड भाजतो, तेव्हा रासायनिक क्रिया होते, ज्यामुळे कार्ब्स कमी होतात आणि त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि असा ब्रेड पचायला सोपा जातो. त्यात असलेल्या थोड्या कॅलरीज आणि शर्करा हळूहळू रक्तप्रवाहात सोडली जाते.”

याविषयी बॅलेन्स्ड बाईटच्या संस्थापक व न्युट्रिशनिस्ट अपेक्षा चांदूरकर सांगतात की, आहाराच्या गरजेनुसार, साधा किंवा भाजलेला ब्रेड खाणे हे फक्त व्यक्तीची आरोग्य स्थिती आणि आवड यांवर अवलंबून असते.

कॅलरीज

भाजलेल्या ब्रेडमध्येही सारख्याच प्रमाणात कॅलरीज असतात. चांदूरकर यांच्या मते, “भाजलेल्या ब्रेडमुळे कार्बोहायड्रेट्सवर परिणाम होत नाही. ब्रेड गरम केल्याने त्यात असलेल्या स्टार्चमध्ये बदल दिसून येतो. तसेच ब्रेडमधील ओलावा कमी होतो, ज्यामुळे काही लोकांना भाजलेले ब्रेड पचायला अधिक सोपे वाटतात.”

ग्लायसेमिक इंडेक्स (GI)

चांदूरकर सांगतात की, साध्या ब्रेडच्या तुलनेत भाजलेल्या ब्रेडमध्ये थोडा कमी ग्लायसेमिक इंडेक्स ( GI) असतो. आहारातील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवते हे ग्लायसेमिक इंडेक्स मोजतो. भाजलेला ब्रेड रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो.

ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यासाठी आणखी एक मार्ग म्हणजे ब्रेड फ्रिजमध्ये ठेवणे. “ब्रेडचा एक साधा स्लाईस घ्या. तो एका बॉक्स किंवा कंटेनरमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये तो बॉक्स ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्ही तो ब्रेड भाजून घ्या. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ४० टक्क्यांनी कमी होते. जेव्हा आपण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवतो, तेव्हा रेझिस्टन्स स्टार्च तयार होतो, जो आतड्यांमधील जीवाणूंसाठी उत्तम आहे.

अ‍ॅक्रिलामाइडची निर्मिती

ब्रेड भाजल्यावर पोषक घटकांवर कमीत कमी परिणाम होतो. तसेच ब्रेड जास्त तापमानात भाजल्यावर अ‍ॅक्रिलामाइड तयार होते, जे अत्यंत धोकादायक मानले जाते, असे चांदूरकर सांगतात.

Story img Loader