कित्येक वर्षांपासून दालचिनी या गरम मसाल्याचा वापर आपण विविध भाज्या, डाळी, पेय, आणि इतर खाद्यपदार्थांची चव वाढविण्यासाठी करीत आहोत. परंतु, दालचिनीमध्ये अँटीमायक्रोबायल आणि अँटीइन्फेलमेट्री असे घटक असल्याने बरेच जण याचा वापर सध्याच्या त्वचेचे आरोग्य सांभाळण्यासाठी (स्किन केअर) करीत आहेत, अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळते.

चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरमे येण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंविरुद्ध दालचिनी आणि सिट्रोनेला तेल यांचे मिश्रण त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान न पोहोचवता, एक जीवाणू प्रतिबंधक (अँटीबॅक्टेरियल) म्हणून काम करीत असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Mumbai Street Style Masala Pav Easy recipe
मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी

‘बोर्नियो जर्नल ऑफ फार्मसी’च्या २०२३ च्या अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, सिनॅमोमम बर्मान्नी तेल, खासकरून सिनामाल्डिहाइडने बनविलेले तेल हे रक्तप्रवाह वाढविण्यास मदत करते. तसेच, ते फ्री रॅडिकल्सचा सामना करणे आणि त्वचेला अधिक तजेला देण्याचे काम करते.

यासंबंधी त्वचातज्ज्ञांनी दी इंडियन एक्स्प्रेसला काय माहिती दिली आहे, ते जाणून घेऊ.

हेही वाचा : World No Tobacco Day 2024: धूम्रपानाचा गर्भवती महिलांवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या…

दालचिनी त्वचेवरील मुरमांवर इलाज करण्यास मदत करते का? [Does cinnamon help treat acne?]

दालचिनीमध्ये ‘सिलोन’ हा दालचिनीचा प्रकार सर्वत्र सहजतेने उपलब्ध असतो. या दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात. त्याचा थोड्या प्रमाणातील वापर हा त्वचेसाठी सुरक्षित असतो, असे नवी दिल्ली येथील ‘आकाश हेल्थकेअर’मधील त्वचातज्ज्ञ डॉ. श्वेता मनचंदा यांनी सांगितले आहे.

“दालचिनीमध्ये सिनामाल्डिहाइड [cinnamaldehyde] सारखे घटक आहेत. अभ्यासानुसार, त्वचेवर ज्या जीवाणूंमुळे मुरमे येतात, त्यांचा सामना करण्यासाठी हे घटक सक्षम असतात. इतकेच नाही, तर दालचिनीमध्ये दाहविरोधी घटक असतात; जे मुरमांमुळे त्वचेवर येणारा लालसरपणा आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात,” अशी माहिती हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमधील सल्लागार व त्वचाशास्त्रज्ञ डॉक्टर अविनाश जाधव यांनी दिली.

मुरमांसाठी दालचिनी कशी वापरावी?

“केवळ दालचिनीच्या पावडरीची पेस्ट बनविण्याची चूक करू नका. त्यात एक चमचा दालचिनीसह दोन ते तीन चमचे मध मिसळा. मध त्वचेला ओलावा देणारा / मऊ ठेवणारा घटक आहे; जो त्वचेचा दाह वा जळज होण्यापासून रोखतो”, असे डॉक्टर श्वेता म्हणतात. त्यासह दालचिनी दह्यामध्ये मिसळण्याचाही सल्ला त्यांनी दिलेला आहे. दह्यातील लॅक्टिक अॅसिड हे एक उत्तम एक्सफोलिएंट म्हणून काम करू शकते यासाठी त्यांनी हा सल्ला दिला.

हेही वाचा : सफरचंदाचा रस दारू इतकाच घातक असतो? काय सांगतात तज्ज्ञ एकदा घ्या समजून….

दालचिनीचा त्वचेवर वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते?

“दालचिनीचा वापर त्वचेवर करण्याआधी तुम्हाला त्याने त्रास होणार नाही ना हे पाहण्यासाठी ‘पॅच टेस्ट’ करून पाहावी. त्यासाठी दालचिनीचे तयार केलेले मिश्रण अगदी थोड्या प्रमाणात घेऊन आपल्या त्वचेवर लावून पाहावे. त्वचेवर त्या मिश्रणाचा कोणता त्रास होतोय की नाही याची खात्री करण्यासाठी २४ तासांची प्रतीक्षा करावी”, असा सल्ला डॉक्टर जाधव यांनी दिला आहे.

दालचिनी अर्कावर आधारित तेलांचा वापर करताना मात्र सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टर श्वेता यांनी दिला आहे. “दालचिनी अर्काचे तेल हे त्वचेसाठी थोडे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची आग होणे किंवा डाग उठण्यासारखे त्रास काहींना जाणवू शकतात.” असे त्या म्हणतात.

तर, डॉक्टर जाधव यांनी दालचिनीला एखाद्या कॅरियर तेलासह मिसळून संपूर्ण त्वचेला लावण्याआधी पॅच टेस्टचा सल्ला दिला आहे. मात्र, दालचिनीचा त्वचेवर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास त्याचा वापर ताबडतोब थांबवावा आणि पुढील वापरासाठी त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सुचविले आहे