पोषणाच्या जगात जीवनसत्त्वे आणि खनिजे हे आवश्यक घटक आहेत; जे इष्टतम आरोग्य आणि निरोगीपणा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वैयक्तिकरीत्या ते शारीरिक कार्यांमध्ये योगदान देणारी अनेक कार्ये करतात. तथापि, जेव्हा पूरक आहाराचा विषय येतो तेव्हा हे समजून घेणे आवश्यक आहे की, सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे एकाच वेळी घेऊ नयेत. काही संयोग शोषण कमी करू शकतात किंवा एकमेकांच्या फायद्यांमध्ये अडथळा आणू शकतात. त्यामुळे कोणती जीवनसत्त्वे कधी खावीत; शिवाय त्याचा पुरेपूर फायदा आपल्या शरीराला कसा होईल याबाबतची माहिती डॉ. सुरंजित चॅटर्जी, वरिष्ठ सल्लागार, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली यांनी दिली आहे, ती जाणून घेऊ या.
व्हिटॅमिन आणि खनिजे हे घटक एका कोड्यासारखे आहेत; जे अनेक शारीरिक कार्यांना चालना देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. पोषण समन्वय म्हणून ज्याला ओळखले जाते, ते संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु, विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजे एकत्र खाल्ल्याने त्यांमधील समन्वय बिघडू शकतो.
कॅल्शियम आणि लोह
कॅल्शियम व लोह ही महत्त्वाची खनिजे आहेत आणि प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. मजबूत हाडे व दातांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे; तर लोह रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे महत्त्वाचे कार्य करते. परंतु, या दोन्हींचे एकत्र सेवन करणे प्रतिकूल ठरू शकते. कॅल्शियम नॉन-हेम लोहाचे शोषण रोखू शकते (वनस्पतीशी आधारित खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे लोहाचे प्रकार); ज्यामुळे लोहाची कमतरता भासू शकते. लोहाची गरज असलेल्या विशेषत: गर्भवती महिलांसारख्या व्यक्तींमध्ये ही कमतरता भासू शकते. लोहाचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी, कॅल्शियमने समृद्ध पदार्थ किंवा लोहसमृद्ध स्रोतांपासून पूरक आहार वेगळे करण्याचा सल्ला दिला जातो.
हेही वाचा- चालता-बोलता धाप लागते, थकवा येतो? हृदयाचं रक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या क्लुप्त्या वाचा!
झिंक व तांबे
झिंक व तांबे ही सूक्ष्म खनिजे आहेत; जी शरीरातील विविध एन्झाइमॅटिक प्रतिक्रियांमध्ये योगदान देतात. या खनिजांमध्ये एक नाजूक संतुलन आहे; जे एकापेक्षा जास्त प्रमाणात पूरक झाल्यामुळे विस्कळित होऊ शकतात. झिंकचे अधिक प्रमाण तांब्याच्या शोषणात अडथळा आणू शकते; ज्यामुळे तांब्याची कमतरता होऊ शकते. याउलट जास्त प्रमाणात तांबे सेवन केल्याने झिंकचे शोषण बिघडू शकते. एकूण आरोग्य राखण्यासाठी या दोन खनिजांमध्ये योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन डी व मॅग्नेशियम
व्हिटॅमिन डी; ज्याला सहसा ‘सनशाईन व्हिटॅमिन’ म्हटले जाते. ते हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकारक कार्य अशा अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तर, मॅग्नेशियम शरीरातील ३०० पेक्षा जास्त जैवरासायनिक प्रतिक्रियांमध्ये सहभागी होत असते. दोन्ही पोषक तत्त्वे अत्यावश्यक आहेत; परंतु ती एकत्र घेतल्याने मॅग्नेशियमचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे मॅग्नेशियम पातळी सुनिश्चित करण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम सप्लिमेंट्स उच्च प्रमाणात घ्यायचे टाळणे योग्य ठरू शकते.
व्हिटॅमिन ए व ई
व्हिटॅमिन ए व ई ही शक्तिशाली अँटिऑक्सिडेंटस् आहेत; जी त्वचेचे आरोग्य, दृष्टी व रोगप्रतिकारक कार्ये यांना चालना देतात. परंतु, जास्त प्रमाणात एकत्र व्हिटॅमिन घेतल्यास, दोन्हींचा फायदा होण्यास ती सक्षम ठरत नाहीत. व्हिटॅमिन ए उच्च प्रमाणात घेण्यामुळे व्हिटॅमिन ईचे शोषण होऊ शकते. संपूर्ण आहाराद्वारे या दोन जीवनसत्त्वांमधील समतोल राखणे हे त्यांचे वैयक्तिक फायदे मिळविण्याची गुरुकिल्ली आहे.
व्हिटॅमिन सी आणि बी १२
व्हिटॅमिन सी हे त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी आणि अँटिऑक्सिडंटस् प्रभावांसाठी ओळखले जाते; तर व्हिटॅमिन बी १२ मज्जातंतूंच्या कार्ये आणि डीएनए यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही दोन्ही जीवनसत्त्वे एकत्र घेतल्यास नकारात्मक परिणाम देऊ शकतात.
हेही वाचा- Heart Attack & Depression : ‘टॉक थेरपी’मुळे डिप्रेशन आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो?
पोषक संयोजनासाठी मार्गदर्शक तत्त्वे
अंतर पाळा : जर तुम्ही एकाच वेळी अनेक पूरक आहार घेत असाल, तर त्यातील विरोधाभास टाळण्यासाठी ते दिवसभराच्या अंतराने घेण्याचा विचार करा. त्यामुळे ते शरीराची प्रत्येक पोषक द्रव्ये शोषून घेण्याची आणि वापरण्याची क्षमता वाढवू शकतील.
वैविध्यपूर्ण आहार : नैसर्गिक स्रोतांकडून जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळविण्यासाठी समृद्ध आहारास प्राधान्य द्या.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या : तुम्ही विशिष्ट जीवनसत्त्वे किंवा खनिजे पूरक आहार घेण्याचा विचार करीत असाल तर, आरोग्य सेवा व्यावसायिक किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते तुमच्या वैयक्तिक गरजा आणि आरोग्य स्थिती यावर आधारित वैयक्तिकृत मार्गदर्शन देऊ शकतात.
तुमच्या गरजा समजून घ्या : काही लोकांना जसे की गरोदर स्त्रिया, शाकाहारी आणि क्रीडापटूंना अद्वितीय पोषक गरजा असतात. या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तुमची पूरक पथ्ये तयार करा.
पोषक तत्त्वे एकत्रित करण्याचे बारकावे समजून घेऊन, तुमच्या पौष्टिक निवडींचा अधिकाधिक उपयोग करू शकता आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता. दिवसाच्या शेवटी निरोगी जीवनशैली जगणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. तसेच केवळ अनेक खनिजपूरक आहारांवर अवलंबून न राहता नियमित व्यायाम करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.