How To Detect Fake Tomato Ketchups: हल्ली बाजारातील अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. पदार्थ जास्त दिवस टिकविण्यासाठी, तसेच पदार्थांची चव, रंग चांगला दिसण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये काही विशिष्ट पदार्थ टाकले जातात. त्यापूर्वी बनावट लसूण आणि ॲनालॉग पनीरबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण टोमॅटो सॉसमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील औषध तज्ज्ञ डॉ. पुष्कर शिरकरखाने यांनी सांगितले की, बनावट किंवा भेसळयुक्त सॉसमध्ये असे अनेक घटक असू शकतात; जे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा अनेकविध समस्यांचा धोका वाढू शकतो.

डॉ. शिरकरखाने यांनी, “बनावट सॉसमध्ये अनेकदा हानिकारक खाद्य रंग, सिंथेटिक रंग, कृत्रिम स्वाद, संरक्षक व रसायने असतात. त्याचे वारंवार सेवन केल्यावर, ते तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी अनेक धोके निर्माण करू शकतात. तुम्ही आजारी पडू शकता आणि अपचन, पोट फुगणे, जुलाब, बद्धकोष्ठता, अन्न विषबाधा यांसारख्या आरोग्य समस्या अनुभवू शकतात,” असे सांगितले.

टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखायची?

तुम्ही वापरत असलेला टोमॅटो सॉस भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ग्लासभर पाण्यात तुमच्याकडील एक चमचा सॉस घाला. “जर केचपने पाणी लवकर लाल होत नसेल, तर ते खरे आहे. परंतु, त्यात भेसळ असेल, तर पाणी लवकर लाल होऊन विरघळते,” असे डॉ. शिरकरखाने यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून

खरेदी करताना घ्या काळजी

उत्पादन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही नेहमी पॅकेजिंगवरील घटकांची यादी वाचून घ्या.
“किराणा खरेदी करण्यासाठी गेल्यावर घाईगडबडीत कोणताही सॉस घेऊ नका. त्याची निवड हुशारीने करा. स्थानिकीकृत किंवा प्रमाणित नसलेल्या ब्रँडचे सॉस किंवा कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करू नका. नेहमी माहीत असलेल्या आणि विश्वासार्ह ब्रँडचीच निवड करा; जे खाद्यपदार्थांची प्रमाणित गुणवत्ता राखतात,” असे डॉ. शिरकरखाने यांनी बजावून सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify adulteration in tomato sauce get expert advice sap