Health Special: पावसाळ्यात आजार वाढण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे दूषित पाणी. पावसाळ्यात आकाशातून पडलेले पाणी जमिनीवर पडल्यानंतर जमिनीवरील विविध अशुद्ध घटक पाण्यात मिसळल्यामुळे त्याचप्रमाणे नद्या वाहू लागल्यावर नद्यांच्या पात्रामधील व तीरांवरील विविध प्रकारच्या अशुद्धी मिसळल्यामुळे आणि आजच्या जगात सर्व टाकाऊ पदार्थ पाण्यातच फेकले जात असल्याने नद्यांचे व इतर जलस्त्रोतांचे सुद्धा पाणी अशुद्ध होते. हेच दूषित पाणी विविध आजारांना कारणीभूत होते.

हेही वाचा : जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने झपाट्याने वजन कमी होऊ शकते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

दूषित पाण्याची चरकसंहितेनुसार परीक्षा

‘पाणी प्रदूषित का होते व प्रदूषित पाणी कसे ओळखावे’, याचे इसवी सनाच्या एक हजार वर्षे इतक्या प्राचीन काळामध्ये आयुर्वेदाने केलेले मार्गदर्शन आजही उपयोगी पडण्य़ासारखे आहे. ते पुढीलप्रमाणे

१) जे पाणी विचित्र गंधाचे असेल (ज्याला अतिशय वेगळा वास येत असेल)
२) ज्या पाण्याचा रंग बदललेला असेल
३) ज्याची चव बदललेली असेल
४) ज्या पाण्याचा स्पर्श विचित्र-वेगळा असेल
५) जे पाणी पाहूनच किळस येत असेल
६) ज्यामध्ये अत्याधिक क्लेद असेल अर्थात जे बुळबुळीत झाले असेल
७) ज्या पाण्यामध्ये तंतू (धागे) सुटत असतील
८) ज्या पाण्यापासून पक्षी दूर जात असतील
९) ज्या पाण्यामधील बेडूक, मासे, कासव वगैरे जलचर प्राणी अतिशय कृश झाले आहेत, असे नजरेस पडेल
१०) ज्या पाण्यामधील बेडूक, मासे, कासव आदी जलचर मरत असतील…
…असे पाणी विकृत आहे असे ओळखून ते आरोग्यासाठी घातक समजावे.

हेही वाचा : गर्भवती महिलांना झिका विषाणूचा धोका जास्त? कशी घ्यावी त्यांची काळजी, डॉक्टरांकडून जाणून घ्या…

दूषित पाण्यामुळे संभवणारे आजार (water-borne diseases)-