Identify fake sindoor: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्यात कुंकवाचा टिळा लावला जातो. कुंकवाला सौभाग्याचे प्रतीकही म्हटले जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, कुंकू दूषित घटकांनीही बनवले जाऊ शकते? परंतु, यामुळे तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण- पनीर, लोणी आणि लसूण यांसारख्या पदार्थांमध्ये होणारी भेसळ ओळखल्यानंतर आता आम्ही तुम्हाला भेसळयुक्त कुंकू कसे ओळखायचे ते सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. करुणा मल्होत्रा, सौंदर्य चिकित्सक, सौंदर्यशास्त्रज्ञ व कॉस्मेटिक स्किन अॅण्ड होमिओ क्लिनिक राजौरी गार्डन, नवी दिल्ली येथील त्वचातज्ज्ञ म्हणाल्या, “भेसळयुक्त कुंकू ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण- काही भेसळयुक्त कुंकू त्वचेवर जळजळ किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.”

भेसळयुक्त कुंकू वापरण्याचे परिणाम

त्वचेची प्रतिक्रिया : भेसळयुक्त कुंकवातील हानिकारक रसायनांमुळे ॲलर्जी, पुरळ, खाज सुटणे व लालसरपणा येऊ शकतो.

श्वसनासंबंधित समस्या : भेसळयुक्त कुंकवाच्या वापरामुळे श्वास घेताना श्वासोच्छ्वासाच्या समस्या उद्भवू शकतात.

आरोग्य समस्या : भेसळयुक्त कुंकवाचा दीर्घकाळ वापर केल्याने मज्जासंस्थेचे नुकसान, मूत्रपिंड किंवा प्रजनन आरोग्य या समस्यांसह अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात, असे डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या.

बनावट कुंकू कसे ओळखायचे?

चमक, रंग तपासा

भेसळविरहित कुंकवाचा रंग नैसर्गिक चमकदार लाल किंवा नारिंगी-लाल असतो. “नकली किंवा भेसळयुक्त कुंकवामध्ये असामान्य चमकदार चमक किंवा अनैसर्गिक रंग असू शकतो, जो हानिकारक रंग किंवा रसायनांची उपस्थिती दर्शवतो, असे डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या.

रासायनिक सुवास

अस्सल कुंकवाला साधारणपणे तीव्र गंध नसतो. “जर त्याला रसायने किंवा धातू (जसे की पारा) सारखा वास येत असेल, तर ते भेसळयुक्त असू शकते,” असे डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या.

जल परीक्षण

त्यासाठी कुंकू पाण्यात मिसळा. डॉ. मल्होत्रा ​​यांच्या मते, शुद्ध कुंकू सहज पाण्यात विरघळेल; तर भेसळयुक्त कुंकू जोडलेल्या रसायनांमुळे रंग वेगळे करू शकतो.

हेही वाचा: मुलतानी मातीचा सतत वापर करणे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांचे मत काय..

पारा आणि शिसे तपासा

डॉ. मल्होत्रा ​​म्हणाल्या, “भेसळयुक्त कुंकवामध्ये लेड ऑक्साईड किंवा पारा सल्फाइड असते, जे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे लोकल मार्केटमधून कुंकू खरेदी करणे टाळा. योग्य प्रमाणीकरणासह विश्वासार्ह ब्रॅण्ड्सची निवड करा”, असा सल्ला डॉ. मल्होत्रा ​​यांनी दिला.

टीप : सुरक्षित राहण्यासाठी नेहमी नैसर्गिक किंवा हर्बल, असे स्पष्टपणे लेबल लावलेले आणि हानिकारक रसायने आणि जड धातूपासून मुक्त असलेल्या कुंकवाची निवड करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify fake sindoor kumkum special tips from experts sap