Health Special लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं पोट बिघडलं किंवा तब्येतीच्या तक्रारींसाठी डॉक्टरांची भेट घेतल्यास हृदय आणि जीभ या दोन गोष्टी प्रामुख्याने तपासल्या जातात. आहारशास्त्रात जिभेचे चोचले पुरविण्यापेक्षा आवश्यक चवींचे अन्न आहारात समाविष्ट करण्यावर मुख्यत्वे भर दिला जातो. आजच्या लेखात याचबद्दल थोडंसं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची होती . तांब्याचा स्क्रॅपर वापरून जीभ स्वच्छ करायला सुरुवात केल्यापासून मला वाटत माझं खाणं सुधारलंय” समीरा -वय वर्ष २७. गेले अनेक महिने मलावरोध असल्यामुळे तब्येतीच्या विविध तक्रारी घेऊन आली होती. आहारात बदल केल्यापासून तिच्या तक्रारी हळूहळू कमी होत होत्या. पचनाच्या तक्रारींचे मूळ जिभेवरून ओळखता येते, म्हणजे नक्की काय तर?

हेही वाचा : सकाळी उठल्या उठल्या आले खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे! वजन कमी होण्यासह तुमचा ‘हा’ त्रास होईल कायमचा दूर!

जि‍भेची काळजी कशी घ्याल?

आयुर्वेदाचार्य सुश्रुत यांनी चिकित्सा अध्यायात म्हटले आहे – जीभ स्वच्छ करण्यासाठी चांदी, सोने, तांबे किंवा उत्तम धातूच्या काडीचा वापर करावा. दहा बोटाच्या उंचीची एखाद्या झाडाची कोवळी फांदी वापरून जीभ स्वच्छ केली तर उत्तम. यामुळे वाईट चव, तोंडाची दुर्गंधी, जिभेची सूज दूर होते आणि जिभेची चव पूर्ववत होते तसेच उत्तम तेलाने चूळ भरल्यास हिरड्या मजबूत होण्यास तसेच दात शुभ्र होण्यास मदत होते.

जि‍भेपासूनच पचन प्रक्रियेला सुरुवात

आहारशास्त्रात पदार्थ, त्याचा गंध आणि त्याच्या चवीवरून भुकेची संप्रेरके आणि त्याचा शरीरावर होणार प्रभाव ठरविला जातो. एखाद्या पदार्थाची चव तोंडात वेगेवेगळी संप्रेरके स्रवण्यास मदत करते. अन्नाचा घास असो, औषध असो, भाजी असो किंवा प्राणिजन्य पदार्थ असो जिभेपासून अन्नपदार्थांच्या पचनाची क्रिया सुरू होते. प्रत्येक पदार्थ चवीने किंबहुना अभिरुचीने खाल्ल्यास त्याचे पचन उत्तम प्रकारे होते.

हेही वाचा : तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता? तुमची टूथपेस्ट खरंच सुरक्षित आहे का, कसं ओळखाल?

आतड्यातील पेशिका

आपल्या तोंडात किमान ३००० ते १०००० प्रकारच्या विविध चव-पेशिका असतात. याच्या दुप्पट पेशिका आपल्या आतड्यात, जठरात आणि चयापचय संस्थेतदेखील असतात. तोंडातील सूक्ष्माणू यांवर सध्या वेगेवेगळ्या देशांमध्ये संशोधन सुरु आहे. जिभेचे मुख्य काम पदार्थाची चव चाखणं असलं तरी पदार्थाचा ताजेपणा, साठवून ठेवलेल्या पदार्थातील रासायनिक अभिक्रियेमुळे बदललेली चव ओळखणं हे जिभेमुळे शक्य होतं. जीभ स्वच्छ असेल तर अन्न पदार्थ खातानाच त्यातील पोषणतत्वे देखील उत्तम आहेत याची खात्री करणं सोपं जातं.

जिभेची संवेदना

आहारात पाण्याचे प्रमाण उत्तम असेल तर जिभेभवतालच्या चव-पेशिका उत्तमरित्या कार्यरत राहतात. आहारात कमीतकमी प्रक्रिया केलेलं साखर, मीठ यांचं माफक प्रमाण असणारं अन्न जिभेचं आरोग्य उत्तम राखू शकतं. उत्तम दर्जाचं -विशेषतः तेलबियांपासून तयार केलेलं तेल, तूप यामुळे जिभेची संवेदना सजग राहते. अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता केवळ जिभेच्या रंगावरून ओळखली जाऊ शकते. विशेषतः जीवनसत्त्व बी १२, लोह यांची कमतरता जिभेच्या पिवळसरपणावरून ओळखता येऊ शकते.

हेही वाचा : डाळ शिजवण्यासाठी ‘ही’ पद्धत आहे सर्वोत्तम; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

खालील तक्ता जिभेवरून तपासल्या जाणाऱ्या काही पचनाशी संबंधित विकारांवर प्रकाश टाकणारा आहे.

जिभेची स्वच्छता

सकाळी उठल्यावर जीभ स्वच्छ करणे आणि त्यासाठी प्लास्टिकपेक्षा धातूचा वापर करणे उत्तम मानले जाते. खोबरेल तेल, तीळ तेल यांनी चूळ भरणे, जेवण झाल्यावर स्वच्छ पाण्याने चूळ भरणे, रात्री झोपताना जीभ स्वच्छ करणे यामुळे पचनसंस्थेचे विकार कमी होण्यास आणि तोंडाचे विकार कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उत्तम आहाराचं भान ठेवताना जिभेच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to know your health from your tongue hldc css
Show comments