व्हिडियोवर सेशन सुरू होतं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषी: मला कशानेही अ‍ॅसिडिटी होते. म्हणजे मला जेवणाआधी कंपल्सरी अन्टासिड घ्यावीच लागते. मी अख्खं पाकीट कॅरी करतो. नाहीतर मीटिंग सुरू असताना पण त्रास होतो. सारखी जळजळ आणि अस्वस्थता वाटत राहाते.
मी: पाणी किती पिता सध्या?
ऋषी: येऊन जाऊन पाणी थोडं पित असतो. पण मी गेले काही दिवस ब्लॅक वॉटर प्यायला सुरुवात केलंय. बघू कसं जमतय?
ऋषीने मला एक काळी पाण्याची बाटली दाखवली, त्यावर Alkaline वॉटर असं लिहिलेलं होतं.
ऋषी: हे जरा महाग आहे. पण मी महिन्याचा स्टॉक आणलाय.
मी: ओके. पण नॉर्मल पाण्यात लिंबू किंवा काकडी टाकून ठेवली तर अशाप्रकारे फायदा होऊ शकतो.
ऋषी: ओह, मग हे नको?
मी: आधी आपण गोळी बंद करूया आणि पुढचे १५ दिवस काकडी- लिंबाच पाणी सुरू करू.
ऋषीच्या कॅमेरात रिचाने डोकावले आणि ती म्हणाली: थँक्स, मी सिद्धिविनायकला चालत जाईन याची गोळी बंद झाली तर.
मी: मग तर तयारी करूच या.
रिचा: आणि काळं पाणी प्यायचं का?
मी: प्यायला हरकत नाही. पण त्यापेक्षा आपण घरगुती पाणी पिऊ

हेही वाचा… Health Special: भिडस्तपणा हा मनोविकार आहे का?

गेल्या काही महिन्यात अल्कलीयुक्त पाणी आणि त्यासंबंधीचे फायदे याबद्दल अनेक चर्चा होतायत. पाण्याच्या pH वरुन त्यातील आम्ल आणि अल्कली जाणता येते. PH7 म्हणजे आम्लता आणि त्याहून जास्त म्हणजे अल्कलीजन्य. अल्कलीजन्य पाण्याचे समर्थक pH सुधारण्याचे अनेक दाखले देतात. शरीराचा pH संतुलित राहिल्यास पचनक्रिया सुधारते त्यामुळे अल्कलीजन्य पाणी प्यायलं पाहिजे हा आग्रह केला जातो. मुळात आपल्या शरीराला pH सांभाळता येतो त्यामुळे आपलं शरीरंच आपसूक सारं काही सांभाळत. मग एवढ्या उठाठेवी का?

मग अल्कलीजन्य पाणी तयार कसे केले जाते?

पाण्यातील मूलद्रव्यांचे प्रमाण वाढवून त्याला अल्कलीजन्य केले जाते. कॅल्शिअम, मॅग्नेशियम, पोटॅशियम या मूलद्रव्यांचे प्रमाण समसमान ठेवत पाण्याचा pH संतुलित केला जातो. आपण थोडा स्वयंपाकघरातील लहान गोष्टींचा वापर करून पिण्याच्या पाण्याची पाचक द्रव्य तयार करू शकतो.

उदाहरणार्थ लिंबू, काकडी, पुदिना, तुळशीची पाने इत्यादी. महत्त्वाचं हे आहे की, किती वेळ? काकडी आणि लिंबू किमान १२ तास स्थिर पाण्यात ठेवणे. दालचिनीचा लहान तुकडा पाण्यात भिजवून ठेवणे. तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे फळांच्या फोडी पाण्यात घालून त्या पाण्याने देखील pH सुधारू शकतो. मात्र पाण्यात ३ ते ४ तासांपेक्षा जास्त वेळ फळं भिजवून ठेवू नयेत. सफरचंद, संत्र्याची साल, अननस, पियर यासारखी फळं कायम उत्तम.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्याच्या आरंभी निरोगी राहण्यासाठी ‘हे’ अवश्य करावे!

बाजारातील अल्कलीयुक्त पाण्यावर सातत्याने अवलंबून राहिल्याने शरीरातील pH वर तात्पुरता फायदा दिसून येऊ शकतो. मात्र आपल्या शरीरातील गुणधर्माचे पोषण करण्यासाठी खाण्याचा वेग आणि वेळ या दोन गोष्टी पाळणे जास्त आवश्यक आहे. खाल्ल्या जाणार्‍या पदार्थांमुळे अत्यल्प प्रमाणात pH वर परिणाम होतो. त्यामुळे केवळ अतिखाणे टाळणे याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिवाय नेहमीच्या पिण्याचे पाण्याचे प्रमाण किमान १.५ ते २ लिटर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ काळ्या पाण्याची एक बाटली रोज पाण्यापेक्षा घरगुती जिन्नस टाकून प्यायलेले पाणी कधीही उत्तम.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make alkaline water at home hldc dvr
Show comments