चहा प्यायला कोणाला आवडत नाही. बहुतेक लोकांची सकाळची सुरुवातच चहाने होते. काहींना चहा बिस्किटांबरोबर आवडतो तर काहींना स्नॅक्सबरोबर आवडतो. दिवसभराचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी असो किंवा बिघडलेला मूड सुधारण्यासाठी चहा प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहे. हाच चहा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवतो. त्यामुळे चहाची चवसुद्धा वेगवेगळी असते. चहात केवळ चार गोष्टी वापरल्या जातात. प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून चहा तयार करत असल्याने चव वेगवेगळी लागते. कोणी साखर वापरून, तर कोणी गुळाचा वापर करून चहा बनवतो.
तसंच यामध्ये आलंही टाकलं जातं. आपण आलं टाकून चहा करतो मात्र, अनेकदा चहा फाटतो किंवा आल्याची चव चहाला लागत नाही. त्यामुळे चहा हवा तसा होत नाही. अशातच आम्ही तुम्हाला चहामध्ये आलं टाकायची योग्य पद्धत सांगणार आहोत.
चहामध्ये आलं टाकण्याच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे कुटुन आलं टाकणे आणि दुसरे, किसून आलं टाकणे. मात्र यातील एकच पद्धत योग्य आहे.
आलं कुटून टाकू नका –
अनेकजण चहाची चव वाढवण्यासाठी किसलेले आले टाकण्याऐवजी ते कुटून टाकतात. मात्र, असे केल्याने आल्याचा रस चहामध्ये उतरण्याऐवजी भांड्यातच राहतो. त्यामुळे चहाची चव वाढत नाही. तसेच यामुळे चहाचा रंगही बदलतो.
किसून टाका आलं –
चहाची चव वाढवण्यासाठी किसलेले आले टाकावे. यामुळे आल्याचा रस थेट चहामध्ये जातो आणि चहा चवदार आणि कडक बनतो. किसलेले आले घातल्याने चहाची चव तर वाढतेच पण त्याचा रंगही बदलतो.
हेही वाचा – उन्हाळ्यात गूळ खावा का? जाणून घ्या फायदे आणि तोटे
चहात आलं केव्हा टाकावं?
तुम्ही चहामध्ये आलं कधी टाकता यावर चहाची चव अवलंबून असते. फक्कड चहासाठी नेहमी आलं दूध, चहा पावडर तसेच साखर टाकल्यानंतरच टाकावे. कडक चहासाठी नेहमी आलं चहाला उकळी आल्यानंतर घालावे.