Eye care tips: सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांत डोळे येण्याची मोठी साथ चालू आहे. ही साथ व्हायरल इन्फेक्शनमुळे आहे. आजकाल घरातील सर्वांच्या जीवनशैलीत खूपच बदल झाले आहेत, खासकरून लहान मुलांच्या खाण्यापासून ते खेळण्यापर्यंत सर्व सवयी बदलून गेल्या आहेत. त्यामुळे मुलांना लहान वयातच आजारपण आणि इतर प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मोबाईल फोन, लॅपटॉपवर तासनतास वेळ घालवल्यामुळे बहुतेक मुलांचे डोळे खराब झाले आहेत. मुलांचे डोळे कमकुवत होण्यामागे अनेक कारणे आहेत. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची जास्त भीती असते. बरेचदा शाळेत दुसऱ्या मुलांचं इन्फेक्शन आपल्या मुलांना होऊ शकते, त्यामुळे पालकांनी याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉ. ऋषभ गुप्ता सांगतात, गेल्या दोन दिवसांपासून संसर्ग अधिक वेगाने पसरला आहे. डोळा लाल होणे, सुजणे, डोळ्यातून पाणी किंवा चिकट स्त्राव येणे अशा समस्या या काळात उद्भवतात. हा आजार वेगाने पसरू नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यावेळी डोळ्यांना खाज सुटू शकते आणि पापण्याही सुजतात. यात सगळ्यात लहान मुलांना याचा अधिक फटका बसत असल्याने, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह असलेल्या मुलांची पालकांनी काळजी कशी घ्यावी? डॉक्टर सांगतात, अशावेळी आपल्या मुलांना त्यांचे हात चांगले आणि वरचे वर धुण्यास सांगितले पाहिजे. मुलांच्या डोळ्याला वारंवार खाज येताच मुले डोळे चोळतात, चेहऱ्याला स्पर्श करतात. अशावेळी डोळे चोळू नका; तसेच त्यांचे टिश्यू, वॉशक्लोथ आणि टॉवेल शेअर करू नका.डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह असलेल्या बहुतेक मुलांना अँटीबायोटिक्सच्या उपचारांची गरज नसते असे डॉ गुप्ता सांगतात.

डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह लक्षणे आणि चिन्हे

  • खाज सुटणे
  • डोळे पाणावले
  • लालसरपणा आणि सूज
  • परदेशी शरीराची संवेदना
  • प्रकाशात अस्वस्थता

पालकांनीही घरात स्वच्छता ठेवली पाहिजे, वरचे वर धूळ साफ केली पाहिजे. सुगंधी किंवा त्रासदायक रसायने मुलांच्या आसपास कमीत कमी ठेवावीत, तसेच मुलांच्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी किंवा त्यांना खायला घालण्यापूर्वी स्वतःचे हात धुवा आणि सॅनिटायझर वापरा. दिल्लीमध्ये नुकत्याच आलेल्या पुरामुळे पाणी प्रचंड दूषित झाले आहे, त्यामुळे पाणी पिताना उकळून पिणे गरजेचे आहे. तसेच अनेकवेळा आपण स्विमिंग करण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये जातो; अशावेळी ते पाणी अस्वच्छ असले तर आपल्या डोळ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो.

डॉ. गुप्ता म्हणतात, हे संसर्गजन्य असले तरी ते लगेच बरे होते, अनेकदा रुग्ण रुग्णालयात न येताही बरे होतात. फक्त योग्य ती स्वच्छता राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. डोळे, तोंड आणि नाक हे तीन अवयव शरीराचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत. कारण हातात अडकलेले जंतू या अवयवांपर्यंत पोहोचले की ते त्वरीत शरीरात जातात. त्यामुळे या अवयवाला स्पर्श करण्यापूर्वी नेहमी आपले हात धुवा. हाताच्या स्वच्छतेबाबत आपण बेफिकीर झालो आहोत; जेवण करण्यापूर्वी आणि वॉशरूम वापरल्यानंतर आपले हात धुतलेच पाहिजेत. स्वच्छतेबद्दल समुदाय स्तरावर जागरूकता निर्माण केली पाहिजे. स्वच्छता आवश्यक आहे, कारण आपण कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, सिनेमा हॉल, सार्वजनिक ग्रंथालये, रेस्टॉरंट्स आणि शाळा यांसारख्या ठिकाणी जाणं टाळू शकत नाही; त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा – डायबिटीज असेल तर ऑफिसमध्ये ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; वाचा काय सांगतात डॉक्टर….

कशी घ्याल मुलांची काळजी

  • कोमट पाण्यात भिजवलेल्या कापसाच्या गोळ्यांनी डोळे स्वच्छ करा. नंतर पुनर्संक्रमण टाळण्यासाठी कापसाचा गोळा टाकून द्या.
  • जर एकाच डोळ्यावर परिणाम झाला असेल, तर तो काळजीपूर्वी स्वच्छ करा. जेणेकरून चुकुन स्पर्शाने दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होणार नाही. .
  • पापण्यांच्या आत स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे आणखी नुकसान होऊ शकते.
  • तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटीबायोटिक्स किंवा अँटीहिस्टामाइन्स देऊ नका. तुमच्या मुलाला कोणत्या प्रकारच्या आयड्रॉप्सची गरज आहे याबद्दल फक्त नेत्रचिकित्सक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो.
  • तुमच्या मुलांना हाताने नव्हे तर स्वच्छ वॉशक्लोथने डोळे पुसण्यास सांगा.

हेही वाचा – Exercise Tips: वयानुसार कसे असायला हवे व्यायामाचे प्रमाण? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

  • तुमच्या मुलाची चादर आणि टॉवेल दररोज धुवा आणि बदला, जेणेकरून संसर्ग घरातील इतर सदस्यांना होणार नाही.
  • जे मुले कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात त्यांनी डोळ्यांचा त्रास पूर्ण बरा होईपर्यंत त्यांचा वापर करू नये.