Heart Attack : गेल्या वर्षभरात तुम्ही हृदयविकाराची अनेक प्रकरणे वाचली असतील; अशात हृदयाचे आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यात हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवू नये आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वयाच्या विसाव्या वर्षापासून आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. द इंडियन एक्स्प्रेसनी कोची येथील अमृता हॉस्पिटलचे डॉ. हिशम अहमद यांच्या हवाल्याने याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.

विसाव्या वर्षापासून अंगीकारा आरोग्याच्या या चांगल्या सवयी

पोषक आहार –

जर तुम्ही वयाच्या विसाव्या वर्षाापासून चांगल्या आहाराच्या सवयी अंगीकारत असाल तर याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल. तुम्ही तुमच्या आहारात सर्व प्रकारची फळे, भाजीपाला, कडधान्ये, प्रोटिनयुक्त आणि चांगला फॅटयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. या आहारातून तुम्हाला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतील, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय शेंगा, सुका मेवा, बिया आणि टोफू इत्यादी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयाशी संबंधित आरोग्याचा धोका टाळण्यासाठी मदत करू शकते. तसेच आहारात सॅच्युरेडेट फॅट्स, ट्रान्स फॅट्स, कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि साखरेचे प्रमाण कमी घ्या; नाहीतर रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढू शकते.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

नियमित व्यायाम –

नियमित १५० मिनिटे एरोबिक व्यायाम करणे गरजेचे आहे. एरोबिक व्यायाम म्हणजे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणारा प्रकार होय. हा व्यायाम केल्याने हृदयाची गती वाढते. यामुळे हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण क्षमता वाढते. दर आठवड्याला दोन किंवा तीन दिवस स्नायू मजबूत करण्यासाठी वर्कआउट करा. वेगाने चालणे, जॉगिंग, सायकल चालविणे, पोहणे, डान्स करणे इत्यादी हृदयाच्या स्नायूंना बळकट करणारे व्यायाम तुम्ही निवडू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

स्नायूंना बळकट करणारे व्यायाम आठवड्यातून किमान दोन दिवस करा. फ्री वेट, रेझिस्टन्स बँड, वेट मशीन किंवा पुश अप्स, स्क्वॅट्स आणि लंग्ज्ससारखे व्यायाम करा; यामुळे तुमचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.आठवड्यातून एक किंवा दोन दिवस चांगला आराम करा. एखाद्या स्पोर्ट्स टीममध्ये सहभागी व्हा किंवा फिटनेस क्लास लावा. शारीरिक शिस्त लावण्यासाठी विसाव्या वर्षापासून चांगल्या आरोग्याच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी खा पपई , ॲसिडिटीचा त्रास होईल दूर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात..

धूम्रपान टाळा आणि मर्यादेत मद्यपान करा

जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्याचे व्यसन लागण्यापूर्वी विशीत ही सवय मोडणे खूप सोपी जाते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडते. रक्तदाब आणि हृदय गती वाढते, रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय स्ट्रोक आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मद्यपान ही आणखी एक मोठी समस्या आहे. मद्याच्या पहिल्या थेंबापासून याचा धोका निर्माण होतो. तुम्ही जितके जास्त मद्यपान कराल तितके ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

वजन नियंत्रित ठेवा

हृदयाशी संबंधित आजार वाढण्यामागे वजन वाढीची समस्या धोकादायक ठरते. आपले सामान्य वजन आपली उंची, शरीर रचना, स्नायूंचे वजन आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते; त्यामुळे वजनाबरोबर निरोगी जीवनशैलीला महत्त्व द्या.

नियमित आरोग्य तपासणी

नियमित आरोग्य तपासणीची सवय लावा आणि तज्ज्ञांबरोबर आरोग्याबाबत चर्चा करा. रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक चाचण्या करा आणि त्यानुसार आरोग्याची काळजी घ्या.

चांगली झोप

रात्री सात ते नऊ तास चांगली झोप घ्या. झोपेचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे अनुकरण करा. तणाव कमी करण्यासाठी चांगली झोप हा एक उत्तम पर्याय आहे.

दररोजच्या कामातून थोडा वेळ ब्रेक घ्या

अनेकदा आपण कामाच्या ओघात तासन् तास एकाच जागेवर बसतो. अशावेळी कामातून थोडा वेळ ब्रेक घेणे गरजेचे आहे. स्क्रीनपासून थोडा वेळ ब्रेक घेतल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि ऊर्जा निर्माण होते. मोबाइल, लॅपटॉपपासून स्वत:ला दूर करा आणि इतर आवडीच्या गोष्टींमध्ये स्वत:ला मग्न ठेवा. जर खूप जास्त तणाव वाढत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. समुपदेशकसुद्धा आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात.