दमा ही एक आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये वायुमार्गाच्या आसपासच्या स्नायूंना सूज येते. यामुळे श्लेष्मा तयार होतो, ज्यामुळे वायुमार्ग अवरोधित होतो. ज्याला ब्रॉन्कोस्पाझम म्हणतात. वायुमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा प्रभावित होऊ लागतो. जेव्हा दम्याचा झटका येतो तेव्हा वायुमार्गाला सूज येते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि घशात घरघर आणि खोकल्यासारखी लक्षणे देखील दिसतात.

जगभरातील मोठ्या संख्येने लोक दम्याने त्रस्त आहेत. रात्रीच्या वेळीही अनेकांना दम्याचा झटका येतो. रात्रीच्या वेळी दम्याचा झटका येण्यामागील मुख्य घटकांपैकी एक म्हणजे सर्कॅडियन रिदम, ज्यामुळे रात्रीच्या वेळी हार्मोन्सची पातळी कमी होते.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

जर्नल ऑफ अस्थमाच्या अंडरडायग्नोसिस ऑफ अस्थमा इन नॉक्टर्नल सिम्प्टम्स इन जनरल प्रॅक्टिस अभ्यासानुसार, सतत दमा असलेल्यांना 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांना जीवनात कधीतरी रात्री येणाऱ्या दम्याचा झटक्याचा सामना करावा लागतो. या संशोधनामध्ये ज्यामध्ये किमान 14,000 रूग्णांचा समावेश आहे.

रात्री दम्याचा झटका येण्याचा धोका कसा टाळायचा?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमची औषधे नियमित घेण्यासह तुम्ही अशी काही पावले उचलू शकता, ज्याच्या मदतीने रात्रीच्या वेळी दम्याचा झटका येण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते. ही धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलू शकता.

तीव्र दम्यासह रात्री चांगले झोपण्याचे मार्ग

आरोग्य तज्ञांच्या मते, तुमची औषधे नियमितपणे घेण्याव्यतिरिक्त, रात्रीच्या वेळी अटॅक येण्याची शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलली पाहिजेत:

१. तुमची खोली स्वच्छ ठेवा:

रात्रीच्या वेळी दम्याचा अटॅक टाळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमची खोली स्वच्छ ठेवावी लागेल. तुमची विश्रांतीची किंवा झोपण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्याची खात्री करादररोज झाडून आणि पुसून घ्या. तसेच ज्या ठिकाणी अनेकदा दुर्लक्ष केले जाते, जसे की पंखेचे ब्लेड, कपाटांचा वरचा भाग इ. साफ करता. सातत्यपूर्ण साफसफाईची दिनचर्या कायम ठेवल्याने रात्रीच्या वेळी दमा होऊ शकणार्‍या इतर ऍलर्जन्सचे संचय रोखण्यास मदत होते.

२. गादीवर झाकण ठेवा:

डस्ट-प्रूफ मॅट्रेस आणि पिलो कव्हर्स धूळ, घाण आणि काजळी बेडमध्ये जाण्यापासून रोखतात. जर्नल सायन्स डेलीमध्ये प्रकाशित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या अभ्यासानुसार, बेडरुममधील धुळीचे कण कमी करण्यासाठी गादी आणि पिलो कव्हर वापरणे हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे.

३. आठवड्यातून एकदा चादर धुवा :

घराच्या स्वच्छतेसह चादरीची साफसफाईही महत्त्वाची आहे. दम्याचा त्रास टाळण्यासाठी दर आठवड्याला चादर धुण्याची सवय लावा. जर तुम्हाला दमा नसेल, तर दर आठवड्याला तुमची चादर आणि उशाचे कव्हर धुवा. ते धुण्यासाठी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

४. एक ह्युमिडिफायर मिळवा

थंड हवा कोरडी असते आणि गंभीर दमा असलेल्या लोकांना खूप त्रास होऊ शकतो. म्हणूनच, आरोग्य तज्ञ हिवाळ्यात तुमच्या बेडरूममध्ये हवेत आर्द्रता जोडण्यासाठी ह्युमिडिफायरची शिफारस करतात. परंतु प्युरिफायर कमीत कमी 99 टक्के हानीकारक कण काढून टाकू शकतो, ज्यामध्ये सामान्य दम्याचा समावेश आहे.

हेही वाचा : संत्री-लिंबाच्या तुलनेत आवळ्यामध्ये ९ पट जास्त असते व्हिटॅमिन सी, जाणून घ्या त्याचे फायदे

५. पाळीव प्राण्यांसह एकाच रुममध्ये झोपणे टाळा:

डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर त्यांना तुमच्या बेडरूमपासून दूर ठेवा कारण त्यांचा कोंडा तुमच्या त्रासात वाढ करू शकतो आणि दम्याचा त्रास होऊ शकतो.

जरी तुमचे पाळीव प्राणी तुमच्यासह झोपत नसले तरी ते एकाच खोलीत असले तरी ते घाणीचे कण आणू शकतात जे बेडिंग आणि फर्निचरवर चिकटतात.

६. झोपताना डोके उंचावर ठेवा:

तज्ञांच्या मते, जर तुम्हाला सायनसच्या संसर्गाचा त्रास होत असेल तर कधीही सरळ स्थितीत झोपू नका, कारण यामुळे पोस्टनासल ड्रिप वाढू शकते, मुळे दम्याचा अटॅक येऊ शकतो. झोपताना मऊ उशीने डोके थोडे वर ठेवा.

हेही वाचा – कढीपत्ता- चरबी कमी करणारे सुपरफूड; वजन कमी करण्यासाठी कसे ठरते फायदेशीर? जाणून घ्या

७. झोपताना एअर फ्रेशनर किंवा परफ्यूम वापरणे टाळा:

ज्या लोकांना दमा आहे त्यांच्यासाठी सुगंधी सुगंधी वस्तू जसे की, परफ्यूम किंवा एअर फ्रेशनरमुळे दम्याचा अटॅक येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. एरोसोल फवारण्या, वॉल प्लग-इन आणि सुगंधित मेणबत्त्या देखील दमा सुरू करू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)