जास्त घनता असलेले (High-Density) लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (HDL) यालाच आपण सोप्या भाषेत चांगले कोलेस्ट्रॉल, असे म्हणतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले जास्तीचे कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ मदत करते आणि हृदयाच्या आरोग्य जपण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. ”एचडीएल’ची उच्च पातळी असल्यास ह्रदयविकारांसंबधित धोका कमी होतो. परंतु, अनेक भारतीयांना जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल केल्यानंतरही ‘एचडीएल’ किंवा ‘चांगल्या कोलेस्ट्रॉल’च्या पातळीत ४५ mg/dL पर्यंत वाढ करणे आव्हानात्मक वाटू शकते,” असे अपोलो अॅरोटिक प्रोग्रॅमचे सर्जिकल लीड आणि कार्डिओव्हॅस्क्युलर, अॅरोटिक सर्जन, सीनियर कन्सल्टंट डॉ. निरंजन हिरेमठ यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. यामागे अनेक कारणे आहेत. प्रथम ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका कशी पार पाडते हे समजून घेऊ..

‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ची आवश्यकता का आहे?

कमी घनता असलेले लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (LDL); ज्याला ‘खराब कोलेस्ट्रॉल’, असेही म्हटले जाते. जेव्हा एलडीएल (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ची पातळी वाढते आणि उत्सर्जन प्रक्रियेसाठी ते यकृताकडे पाठवले जाते. त्यामुळे ‘एचडीएल’ची पातळी जास्त असेल, तर ह्रदयविकार आणि ॲथरॉसक्लेरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.

nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
Chief Minister Devendra Fadnavis directs to evaluate the health system Mumbai news
आरोग्य व्यवस्थेचे मूल्यमापन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Ram Kapoor recently shared his personal struggles with weight loss,
“दोनदा ३० किलो वजन कमी केले पण पुन्हा ‘जैसे थे’! नेमके चुकले कुठे? राम कपूरने केला खुलासा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
yashwantrao Chavan university loksatta
नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या उद्यापासून परीक्षा
Rajiv Kapoor alcohol addiction heart disease cardiovascular health
अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात
Nutritionist recommends having black cardamom when you feel extreme cold
हिवाळ्यात खूप जास्त थंडी जाणवत असेल तर काळी वेलची चघळा! पोषणतज्ज्ञांनी दिला सल्ला, जाणून घ्या कारण….

पुरेश्या प्रमाणात ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ची पातळीत पटकन वाढ का होत नाही?

प्रत्येक व्यक्तीच्या ‘एचडीएल’ची पातळी निश्चित करण्यामध्ये आनुवंशिकता महत्त्वाची भूमिका पार पाडते. भारतीयांसह काही लोकांमध्ये ‘एचडीएल’ची सामान्य पातळीच खूप कमी असते. हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

हेही वाचा – मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्सची गरज आहे का? संतुलित आहार हा अजूनही सर्वोत्तम पोषक घटक का आहे

आहारात बदल केल्यास मिळू शकतो फायदा

‘चांगल्या कोलेस्ट्रॉल’च्या पातळीमध्ये बदल करण्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये काही घटकांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात; जे ‘एचडीएल’च्या पातळीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला त्याची ‘एचडीएल’ची पातळी वाढवायची असेल, तर आहारामध्ये बदल करावा लागेल. त्यासाठी सॅच्युरेडेट फॅट्स नसेलेले पदार्थ, ओमेगा ३- फॅटी अॅसिड असलेले पदार्थ जसे की सुका मेवा, अॅव्होकॅडो, फॅटी फिश इ. आणि फायबरने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करावा लागेल. आहारातील हा बदल परिणामकारक ठरू शकतो हे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. या संशोधनामध्ये सहा हजार लोक १२ वर्षांसाठी सहभागी झाले होते आणि जास्त प्रमाणात साखर असलेले पेय उदा. सोडा, फळांचा रस इ. यांचा ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ची पातळीवर कसा नकारात्मक परिणाम होतो हे दिसून आले.नकारात्मक परिणाम होते हे दिसून आले.

शारीरिक हालचाल किंवा व्यायाम वाढवा

नियमित शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केल्यास ‘एचडीएल’च्या पातळीमध्ये वाढ होते. पण, भारतीयांमध्ये जास्त वेळ काम करणे, शहरीकरण, जीम, योगा, स्विमिंग यांसारख्या सुविधांचा लाभ घेता न येणे, अशा अनेक कारणांमुळे बैठी जीवनशैली वाढत आहे. त्यामुळे अशा वातावरणामध्ये जास्त शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देणे आव्हानात्मक ठरू शकते आणि जीवनशैलीमध्ये बदल करून ‘एचडीएल’च्या पातळीत वाढ करणे आणखी अवघड होऊ शकते. पण, संशोधनातून असे समोर आले आहे की, ‘जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही १० किलो वजन कमी केले, तर तुमच्या ‘एचडीएल’च्या पातळीत वाढ होऊ शकते. त्याचबरोबर रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते’. ‘द अमेरिकन जर्नल ऑफ फिजिऑलॉजी’ला असे आढळले की, आठवड्यातून तीन वेळा शारीरिक हालचाल किंवा व्यायाम प्रशिक्षण घेतल्यास सर्व प्रकारच्या शरीरयष्टीच्या व्यक्तींमधील चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होऊ शकते.

हेही वाचा – नाश्ता किंवा जेवणाची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी काय करावे?

धुम्रपान सोडून द्या, मद्यपान मर्यादेत करा

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर धूम्रपान सोडल्याल तुमच्या ‘एचडीएल’च्या पातळीत सातत्याने वाढ होऊ शकते, असे संशोधन सांगते. ‘मर्यादित प्रमाणात मद्यपान केल्यास एचडीएल’ किंवा ‘चांगल्या कोलेस्ट्रॉल’ची पातळीत वाढ होत असल्याचे काही संशोधनांत दिसून आले आहे. सुरुवातीला सेवनाचे प्रमाण मर्यादित करा आणि नंतर हळूहळू त्यावर अवलंबून राहणे सोडून द्या.

औषधे आणि सप्लिमेंट्स

बीटा ब्लॉकर्स (beta blockers), ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स (anabolic steroids), प्रोजेस्टोन (progeston), बेन्झोडीझेप्सन (benzodiazepines) यांसारख्या औषधांमध्ये ‘एचडीएल’ची पातळी कमी होते. जेव्हा फक्त जीवनशैलीमधील बदल करूनही ‘एचडीएल’ची पातळी पुरेशा प्रमाणात वाढत नाही तेव्हा तुम्हाला डॉक्टर स्टॅटिन्स (statins) हे औषध खाण्याची शिफारस करतात; जे ‘एलडीएल’ची पातळी कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी सकारात्मक परिणाम करू शकते. त्याशिवाय नियासिन (niacin); जे व्हिटॅमिन बी म्हणून ओळखले जाते, ते ‘एलडीएल’ची पातळी वाढवण्यासाठी वापरले जाते. पण, हे औषध आणि सप्लिमेंट्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे. कारण- याचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. याबाबत प्रत्येक व्यक्तीची आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील महत्त्वाचे घटक लक्षात घेऊन वैयक्तित दृष्टिकोन ठेवणे भारतीयांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.

Story img Loader