१. मायरा माझ्यासमोर बसून सांगत होती. “मला आवडत नाही पाणी प्यायला. सारखी शू लागते आणि मला पाणी प्यायला नको वाटतं . “घरी पीते मी  आणि मला नाही लागत तितकी तहान. पण मायरा शरीरात पाणी कमी आहे बाळा त्यासाठी पाणी प्यायला हवं. 
यावर एक मोठा पोज घेऊन मायरा म्हणाली ,”शाळेत सगळे खूप हसतात. शूसाठी वॉशरूमला जायचं म्हटलं तरी …. आय हेट इट ” 

२. ” संध्याकाळी मी पाव भाजी , वडा पाव , समोसे, दाबली यापैकी काही खाऊ शकते का? ऑफिसमध्ये नाही म्हणवत नाही. सगळ्यांसोबत काहीतरी खरंच लागतं “

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?

३. ” माझं क्षेत्र असं आहे ना कि क्लाएन्ट समोर असेल तर थोडं अल्कोहोल होतंच. त्यामुळे दारू पूर्ण बंद होणं अवघड आहे आणि तसंही फक्त शनिवार रविवार पिणं होतं. सगळे दिवस नाही “
४. ” अरे बापरे तू साखर बंद केलीयेस का? एक दिवस खाऊन काही ना नाही होत रे तू बिनधास्त खा .”
५. “मित्रांनी चिट डे म्हणून कन्व्हिन्स केलं आणि नको नको म्हणता म्हणता पिझ्झा , फाइड चिप्स ,कोक सगळंच झालं आणि गेले ३ दिवस सगळं विस्कटलंय . इतका गिल्ट आलाय मला “
६. “एक दिवस साखरेचा चहा पिऊन काही होत नाही रे . बाकी दिवस आहेच नो शुगर :

७. ” तू रोज सकाळी ५ वाजता उठतो? आमचे १० वाजले तरी डोळे उघडत नाहीत “
८. ”  तुला दुधाची अलर्जी आहे ? भलतंच काहीही. मी बघ रोज २ ग्लास दूध सायीसकट पितो. काही होत नसतं
“९. ” वजन कमी झालंय ते उत्तम आहे. आता पुन्हा वाढणार नाही याकडे लक्ष द्या नाहीतर आहे आपलं तेच “
१०. जानेवारीपासून माझं सगळं नीट सुरु होतं. आताशा मन उडाल्यासारखं वाटतं खाण्यावरून आणि भीतीच वाटत राहते. खातोय ते चांगलं असेल का ? याने फॅट्स वाढतील का ? काहीही खायचं म्हटलं तरी दडपण येतं “.

आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा

या प्रकारचे संवाद आपल्या  आजूबाजूला घडत असताना आपण हमखास ऐकतो. आहारतज्ज्ञांसाठी हे संवाद सवयीचेच ! आहार नियमन म्हटलं कि त्यासाठी आपण घडविण्यात आलेल्या बदलामुळे किंवा आहाराच्या शिस्तीला “नवीन फॅड किंवा हे काय भलतंच ” असं म्हणणारा एक वर्ग आपल्या भोवताली असतो जोपर्यंत शरीरावर गांभीर्याने परिणाम होत नाही तोपर्यंत आहाराची, व्यायामाच्या भोवतालची माणसं गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. अनेकदा आजूबाजूच्या आपल्याच माणसांमुळे आणि त्यांच्या खाण्याबद्दलच्या बेफिकीर किंवा अज्ञानातून विचार करण्याच्या पद्धतीमुळे खाण्याची शिस्त मोडल्याचे किंवा खाण्याची शिस्त आपलीशी करणाऱ्यांचे  मानसिक खच्चीकरण झाल्याचे पाहायला मिळते.
 
अनेकदा दोस्तांच्या कॅम्पमध्ये चिट मिलचे दिवस वाढवून पथ्य राहून गेले किंवा अतिरिक्त खादाडी झाल्याचे किस्से ऐकायला मिळतात. आपल्या शिस्तीचा इतरांना कमी त्रास व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते. शिवाय आपल्या शिस्तीचं हसं होण्याची सुप्त भीती मनात असते. याच मानसिकतेमधून काहीजण खाणं बंद करतात. जेवण सोडणे, आदल्या दिवशी गोड खाल्ल्याची शिक्षा म्हणून दुसऱ्या दिवशी कारल्याचा रस पिणे. किंवा पूर्ण दिवस उपाशी राहणे किंवा जिममध्ये २ तास जास्तीचा धावण्याचा व्यायाम करणे. असे अनेक उपाय तत्परतेने केले जातात. आहाराचा पहिला नियम आहे तो म्हणजे तुम्ही जे अन्न खाताय त्याने तुम्हाला उल्हसित आणि आनंदी वाटायला हवं. आपल्या शरीरात काही हॅपी हार्मोन्स (संप्रेरके) असतात. आपल्या खाण्याचा आणि या संप्रेरकांचा जवळचा संबंध आहे. फळ, हिरव्या भाज्या, हळद, दालचिनी यासारखे पदार्थ या संप्रेरकांचे योग्य संतुलन साधण्यासाठी मदत  करतात. शिवाय माफक खाणे मात्र आवश्यक प्रमाणात खाणे यामुळे या संप्रेरकांचे कार्य आणखी सुरळीत होते. 

आणखी वाचा: Health Specia: फूड फ्रीडम आणि चौरस आहार
आहाराबाबत सगळ्यात जास्त दुर्लक्षित असणारी गोष्ट म्हणजे झोप. तुमची झोप पूर्ण आणि शांत असेल तर शारीरिक क्रिया अधिक कार्यक्षम होतात. चयापचय क्रियेचा वेग सक्षम करण्यासाठी करीत कमी मानसिक ताण आणि शांत झोप अत्यावश्यक आहेत. मानसिक ताणतणाव जास्त असेल तर खाण्याच्या सवयींवर परिणाम होतात. उदा अन्न त्याग करणे , कमी पाणी पिणे , खूप गोड खाणे , सातत्याने चहा पिणे , सिगारेटचं सातत्याने सेवन करणे , दारू पिण्याचे प्रमाण वाढणे.
या सवयीमुळे शशरीरातील पोषणमूल्ये कमी होऊ लागतात आणि आपण एका दुष्टचक्रात अडकून जातो. हळूहळू शरीरात संथपणा येतो. आणि आपण आपल्याच संथपणा गुरफटून जातो. उत्साह वाढविण्यासाठी पुन्हा सध्याच्या काळात सोशल मीडिया, सातत्याने नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी उपलब्ध असल्या सामाजिक माध्यमांवर अवलंबून राहतो. आकडा उत्साह वाढविण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या घेतल्या जातात आणि या सगळ्यात शरीरावर आणि मनावर काम करण्याचा वेळ वायुवेगाने निघून जातो. प्रत्यक्ष आयुष्यात डोकावल्यावर लक्षात येतं”. मला अॅसिडिटी खूप होतेय केस गळती सातत्याने होतेयमला झोपच येत नाही अरे माझं वजन अतिरेकी  वाढलाय किंवा जास्तच कमी झालंय किंवा माझं व्हिटॅमिन कमी झालंय डोळ्याखाली काली वर्तुळवाढली आहेत मला खूप थकवा येतोय, पाय सातत्याने दुखतायत.
मग व्हिटॅमिन कमी झाले म्हणून गोळ्या घेणे सुरु होते आणि या सगळ्यात आहारविहाराच्या मूलभूत मुद्द्यांवरून दूर होतो. मानसिक आरोग्य आणि आहार यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण मन आणि मेंदू यांचा मेळ आहाराचे गणित सहज सोडवू शकतो. 
वय वर्ष २५ ते ४५ या वयोगटातील स्त्रियांमध्ये झोप न लागल्याचं सर्रास पाहायला मिळतं. दिवसभराच्या कामाचं रहाटगाडगं सांभाळताना किमान एक वेळ जेवण स्वतःच्या वेगाने खाणे एवढी शिस्त आणि सुख प्रत्येकाने अवलंबायला हवं. आपल्या आहाराबद्दल सद्भावना असणं. उपलब्ध असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वार करणं (विशेषतः स्त्रियांनी पाणी पिण्याकडे लक्ष द्यायलाच हवं) योग्य पाण्याचे प्रमाण केवळ शरीर नव्हे तर मानसिक स्वास्थ्य साठी देखील उपयुक्त आहेत .

कोणीही लठ्ठ व्यक्ती व्यायाम करू लागली किंचा व्यायामाचे पथ्य करू लागली तर त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे हे समाज म्हणून मान्य करायलाच हवे . .

जितक्या सहज आपण पाश्चात्य जीवनशैली स्वीकारताना तिरक्या सहज आपण भारतीय  खाद्यपदार्थांबाबत सजग  असणं  आवश्यक आहे.  भारतीय आहारातील विविध फळे , भाज्या, मसाल्याचे विविध पपदार्थ मानसिक आरोग्यासाठी प्रसिद्ध आहेत. रोजच्या वापरतील पेरू, करवंद, सीताफळ , लिंबू, सफरचंद यांसारखी फळ हळद, दालचिनी, दगड फुल , जायफळ , केशर यासारखे पदार्थ आनंदी संप्रेरकांसाठी अत्यंत गुणकारी आहेत. १० ऑकटोबर रोजी मानसिक आरोग्य दिवस साजरा झाला. मानसिक आरोग्य सगळ्याचा मूलभूत अधिकार आहे. अन्न , वस्त्र ,निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. मानसिक आरोग्य याच मूलभूत गरजेचा पाया आहे हे लक्षात ठेवून आरोग्य आणि  आहारशैली बाबत सद्भावनेचा नवा पायंडा सुरु करूया. अन्नाचा आणि त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा स्वतःपुरताच नव्हे तर इतरांसाठी देखील आदर करायला सुरुवात करूया .

Story img Loader