How To Eat Leftover Rice: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भात हा जेवणातील अविभाज्य घटक आहे. आणि खरंतर कितीही समज- गैरसमज असले तरी आपल्या शरीराचे पोषण करण्यासाठी तसेच तुम्हाला दिवसभर काम करण्यात ऊर्जा देण्यासाठी भाताचे महत्त्व अनेक पोषकतज्ज्ञांनी सुद्धा मान्य केले आहे. पोषक सत्त्वांनी समृद्ध असा भात जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाल्ला तरच तुमचे त्रास वाढू शकतात. विशेषतः अनेकदा आपल्याही घरांमध्ये भात शिल्लक राहतो, आता हा भात फेकूनच द्या असे आम्ही तुम्हाला सांगणार नाही पण निदान तुम्ही भात स्टोअर करण्याची पद्धत तरी सुधारायला हवी. हीच योग्य पद्धत व ती फॉलो न केल्यास होणारे नुकसान आपण जाणून घेणार आहोत.
फ्राइड राइस सिंड्रोम म्हणजे काय?
भात शिजवल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर, अतिरिक्त भात जर तुम्ही बाहेरच ठेवला म्हणजेच रूमच्या तापमानात ठेवला तर त्यामुळे बॅक्टेरिया वाढून भात दूषित होऊ शकतो. शास्त्रीय भाषेत याला फ्राइड राइस सिंड्रोम म्हणतात. भातामध्ये आढळणारा एक सामान्य जीवाणू म्हणजे बॅसिलस सेरियस. हा एक बीजाणू तयार करणारा जीवाणू आहे जो दूषित झाल्यावर अन्नामध्ये वाढू शकतो आणि विष निर्माण करू शकतो ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते.
उरलेला भात कसा स्टोअर करावा? (How To Store Left Over Rice)
B. cereus मुळे पिष्टमय पदार्थांमध्ये विष तयार होते आता यातील एक भाग असा की या प्रकारचा बॅक्टेरिया उष्णता सहन करू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही खाण्यापूर्वी उरलेला भात पुन्हा गरम केल्यास धोका कमी होऊ शकतो पण पूर्ण संपू शकत नाही. उरलेल्या भाताला विषबाधा होणा-या बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी, भात थोडा थंड झाल्यावर नीट हवाबंद डब्ब्यात फ्रिजमध्ये ठेवू शकता.उरलेला भात थंड करून ४० अंश फॅरेनहाइट (४ अंश सेल्सिअस) खाली ठेवलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास, चार दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये चांगला राहू शकतो.
शिळा भात कसा गरम करावा? (How To Heat Left Over Rice)
उरलेला भात सुरक्षितपणे खाण्यासाठी फक्त एकदाच गरम करा. त्यामुळे संपूर्ण बॅच पुन्हा गरम करण्याऐवजी उरलेल्या भाताचा हवा तेवढा फक्त आवश्यक भाग काढून घ्या. तांदूळ किंवा उरलेला पास्ता १६५ अंश फॅरेनहाइट (७४ अंश सेल्सिअस) च्या तापमानात गरम करून खाल्ल्यास धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
हे ही वाचा<< दह्यात मध मिसळल्याने मिळतात अमृतासमान फायदे? वजन वाढलं असेल तर तज्ज्ञांची ‘ही’ सेवनाची पद्धत येईल कामी
लक्षात घ्या, कोणतेही धान्य किंवा स्टार्च युक्त पदार्थ योग्य प्रकारे साठवले नाही आणि पुन्हा गरम केले नाही तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)