जोपर्यंत आपल्या डोळ्यांना काही त्रास होत नाही, तोपर्यंत आपण डोळ्यांची काळजी घेण्याचा विचारही करत नाहीत. कॉम्प्युटरचा सतत वापर, वाचन किंवा टीव्ही पाहण्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण यामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात.

बऱ्याचदा डोळ्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून वापरण्यात येणाऱ्या प्रॉडक्टसमुळेही डोळ्यांवर दुष्परिणाम होतो. आयलायनर आणि मस्करा पर्सनल ठेवावे. शक्यतो इतरांची प्रॉडक्ट्स वापरू नयेत. बाहेर असताना विशेषत: उन्हात फिरताना गॉगल्स वापरल्यास डोळ्यांचे उष्णतेपासून रक्षण होईल.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Yavatmal Bhumika Sujeet Rai, Bhumika Sujeet Rai,
दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
amaltash movie
सरले सारे तरीही…
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!

कॉम्प्युटरवर काम करताना, वाचताना, टीव्ही पाहताना ठराविक काळाने डोळ्यांना आराम द्यावा.

अंधारात कामं करू नयेत तसेच सहसा कमी प्रकाशात वाचन, धान्य निवडणे यासारखी कामे करू नयेत.
प्रवासात सुध्दा वाचन यासारख्या डोळ्यावर ताण येईल अशा गोष्टी करू नये.

स्मोकिंगमुळे होणाऱ्या धुराचाही डोळ्यांना त्रास होतो. डोळ्यात कचरा गेल्यास डोळे चोळू नये. असं केल्याने डोळ्यांच्या वरच्या बाजूस इजा पोहचू शकते. अशा वेळी डोळ्यांवर पाण्याचे हबकारे मारावेत.

संसर्ग हा डोळ्यांचा सर्वात मोठा शत्रू. यासाठी डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असू दे. कॉण्टॅक्ट लेन्स लावण्यापूर्वी आणि काढण्यापूर्वी हात साबण आणि कोमट पाण्याने धुवावेत.

दृष्टिदोष निर्माण होईपर्यंत डॉक्टरकडे जाणे टाळत राहिल्यास एखाद्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं. म्हणूनच नियमितपणे डोळ्यांची तपासणी करायला हवी.

व्यायाम करून डोळ्यांना आराम मिळवून देता येईल. डोळे ताणल्याने स्नायू बळकट होतात आणि आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

अपघातामुळेही डोळ्यांना धोका संभवतो. शारीरिक आघात जसे ब्लॅक आय म्हणजेच डोळ्यांभोवती रक्त साकळल्यास कॉटन किंवा मऊ कपड्याची घडी थंडगार करून तिचा हलकेच दाब द्यावा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. परंतु, डोळ्यांमध्ये रंगबदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरकडे जायला हवं.

केमिकल्स डोळ्यांसाठी हानीकारक ठरू शकतात. डोळ्यांमध्ये केमिकल्सचे शिंतोडे उडाल्यास प्रथम डोळे स्वच्छ पाण्याने धुवा आणि ओलसर कपड्याने डोळे झाकून डॉक्टरकडे जावे.

कॉम्प्युटरवर २ तासांपेक्षा अधिक काम करणाऱ्या व्यक्तींनी दर २ तासांनी उठून थंड पाण्याचे हबके डोळ्यांवर मारून डोळ्यांना १० मिनिटांसाठी विश्रांती द्यावी.डोळ्यांची उघडझाप सतत करावी. कॉम्प्युटर वापरणाऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करावी.

Story img Loader