वातावरणात होणाऱ्या बदलानुसार आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यातही काही गोष्टींचा आपल्या आरोग्यावर इतका परिणाम होतो, की त्याबाबत केलेल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. अशीच एक गोष्ट म्हणजे वायुप्रदूषण. वायुप्रदूषणामुळे फुफ्फुसाचे इन्फेक्शन, दम्यासारखे आजार होऊ शकतात किंवा श्वसनाशी निगडित काही आजार असल्यास ते वायुप्रदूषणामुळे आणखी बळावतात. त्यामुळे फुफ्फुसांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. प्रदूषणामध्ये फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय जणून घ्या.
फुफ्फुसांची काळजी घेण्याच्या पद्धती:
आणखी वाचा: सर्दी, खोकल्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करतील मदत; लगेच जाणून घ्या
व्यायाम
नियमित व्यायाम केल्याने फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. नियमित फुफ्फुसांचा व्यायाम केल्यास वायुप्रदूषण आणि त्यापासून होणाऱ्या आजारांपासून वाचण्यास मदत मिळते. तसेच यामुळे स्नायू मजबुत होतात. यामुळे श्वसनप्रक्रियेचा वेग वाढतो, स्नायूंना पोहोचणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.
इन्फेकशन्स पासून लांब राहा
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी इन्फेकशन्सपासून लांब राहा. यासाठी साथीच्या रोगावरील लस घेणे, इन्फेकटेड व्यक्तीपासून लांब राहणे, बाहेरून आल्यावर किंवा काहीही खाण्यापुर्वी सतत हात धुणे असे उपाय मदत करू शकतात.
घर स्वच्छ ठेवा
बाहेरच्या वातावरणाप्रमाणे घरातील वातावरणाचाही आरोग्यावर परिणाम होतो. नेहमी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील धुळीमुळेही ॲलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे घर स्वच्छ करण्यासाठी चांगल्या व्हॅक्युम क्लिनरचा वापर करा.
आणखी वाचा: सकाळी उपाशी पोटी कॉफी प्यायल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; लगेच जाणून घ्या
गरम पाण्याची वाफ घ्या
गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसननलिका उघडण्यास मदत होते. प्रदूषित किंवा थंड वातावरणामुळे श्वसननलिका कोरडी पडण्याची शक्यता असते. ज्यामुळे रक्तप्रवाहाचा वेगही कमी होऊ शकतो. गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वास घेण्यास मदत मिळते आणि श्वसननलिकेतील व फुफ्फुसातील म्युकसपासून सुटका मिळवण्यास मदत मिळते.