कॉन्टॅक्ट लेन्स हे शाप आणि वरदान दोन्ही आहेत. सतत चष्मा बाळगण्याच्या त्रासापासून किंवा तो चोरीला जाण्याच्या टेन्शनपासून कॉन्टॅक्ट लेन्स आपला बचाव करतात. मात्र, पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना योग्य ती काळजी घेतली नाही तर त्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. शिवाय त्या संसर्गाचा संभाव्य स्त्रोतदेखील ठरु शकतात. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करताना कोणती काळजी घ्यायला हवी. याबाबतच्या काही टिप्स नेत्ररोग तज्ञ आणि नेत्र शल्यचिकित्सक डॉ. नीरज सांडुजा यांनी सांगितल्या आहेत. तुम्ही डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी या टिप्सचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर कसा करायचा?

स्वच्छता – कॉन्टॅक्ट लेन्ससाठी स्टोरेज केस स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवले पाहिजेत. जेव्हा आपण लेन्सचा पुन्हा वापर करतो तेव्हा ते डोळ्यांच्या संसर्गाला प्रतिबंध करु शकतात. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी लेन्स केस लेन्स टाकण्यापूर्वी ते कोमट साबणाच्या पाण्याने स्वच्छ करुन पूर्णपणे कोरडी करणं आवश्यक आहे.

अस्वच्छ हात – कॉन्टॅक्ट लेन्स घालताना कधीही अस्वच्छ हात डोळ्यांना लावू नका. दिवसभर आपले हात अस्वच्छ पृष्ठभागाच्या आणि असंख्य जंतूंच्या संपर्कात येतात, त्यामुळे डोळ्यांना किंवा लेन्सला स्पर्श करण्यापूर्वी नेहमी तुमचे हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे.

चेहरा धुताना काळजी घ्या – कॉन्टॅक्ट लेन्स घालून पोहणे टाळा, कारण स्विमिंग पूल हे संसर्गाचे खरे केंद्र आहे. तसेच तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातल्या असतील तर चेहरा धुताना किंवा अंघोळ करताना नळाचे पाणी लेन्सवर येणं टाळा. कारण ते केवळ संसर्गाचे स्त्रोतच नाहीत तर कॉन्टॅक्ट लेन्सवर सूक्ष्म ओरखडे देखील आणू शकतात.

हेही वाचा- ‘या’ कारणामुळे भारतीयांमध्ये वाढतेय पाठदुखीची समस्या? स्त्रियांना होतोय याचा सर्वाधिक त्रास; डॉक्टरांनी सांगितले कारण

झोप – झोपण्यापूर्वी आठवणीने कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवा. डोळे बंद राहिल्याने कॉर्नियाला हवेतील ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. यामुळे अंधुक दृष्टी, डोळ्यांवर सूज येणे आणि डोळेदु:खीसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

डोळ्यांचे संक्रमण – डोळे कोरडे होणे, खाज सुटने किंवा लाल होत असल्याचं जाणवताच कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. हे डोळ्यांच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.

जास्त वापर – जर तुमच्या नेत्रतज्ञांनी शिफारस केलेल्या कालावधीपेक्षा कॉन्टॅक्ट लेन्स जास्त प्रमाणात वापरल्यामुळे कॉर्नियाला जळजळ होऊ शकते, ज्यामुळे कॉर्नियाला दुखापत आणि केरायटिस होण्याचीही शक्यता असते.

लेन्स बदला – डोळ्याचे जुने संक्रमण आणि जळजळ टाळण्यासाठी ठराविक अंतराने तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्स बदला.

स्वच्छता – तुमच्या लेन्स नियमितपणे स्वच्छ करा, तसे न केल्यास लेन्सवर प्रथिने, धूळ आणि सूक्ष्मजंतू तयार होऊ शकतात, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.

मेकअप – कॉन्टॅक्ट लेन्स घालताना डोळ्यांच्या मेकअपचा वापर टाळा. कॉस्मेटिक उत्पादन किंवा फेस क्रीम लेन्सच्या संपर्कात आल्यास, लेन्स काढा आणि डोळे चांगले धुवा.

सल्ला घ्या – लेन्स वापरताना कोणतीही डोळ्यांची जळजळ झाल्यास किंवा संसर्ग झाल्यास, तत्काळ तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य तो सल्ला घ्या.