Coriander Health Benefits : तुमच्या किचनमध्ये असलेले मसाले फक्त खाण्याच्या पदार्थांनाच चविष्ट बनवत नाही, तर या मसाल्यांमध्ये औषधी गुणही असतात. या मसाल्यांच्या सेवनामुळं आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. मसाल्यांमध्ये धने हा एक जबरदस्त मसाल्याचा पदार्थ आहे. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धने एक असा पॉवरफुल मसाला आहे, ज्याचं सेवन केल्यावर एसिडिटी, मायग्रेन, डोकेदुखी, रक्तस्त्राव, थायरॉईड, डियबिटीज, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, अपचन आणि हार्मोनल असमतोल असणाऱ्या आजारांवर मात होऊ शकते.
आयुर्वेदात धने खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, धने आयुर्वेदिक डिटॉक्सचंही काम करतं. म्हणजे तुमच्या शरीरातील अवयवांना स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. याचा फायदा वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यासाठी होतो. सर्वजण धन्याचा वापर जेवणासाठी करतात. पण धन्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. जाणून घेऊयात धने खाल्ल्याने आरोग्यासाठी कोणते फायदे होऊ शकतात.
नक्की वाचा – किडनी निरोगी ठेवायचीय? हे आहेत सोपे अन् तितकेच प्रभावी घरगुती उपाय
फॅटी लिव्हर-डायबिटीजसाठी धन्याचा चहा
जर तुम्हाला फॅटी लिव्हर, डायबिटीज आणि पचनाच्या संबंधीत समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल, तर धन्याचा चहा पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चहाचे गुण आणि प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही सोप आणि जीरा टाकूनही चहा बनवू शकता.
थायरॉईडसाठी असा करु शकता धन्याचा वापर
थायरॉईडच्या लक्षणांना कमी करण्यासाठी तुम्ही फक्त १ चमच किसलेले धने १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी याला अर्धा होईपर्यंत उकळा आणि निवडून घ्या. या पेयाचे सेवन केल्यानंतर चयापचय वाढण्यास मदत मिळू शकते. याचा जास्त फायदा घ्यायचा असल्यास, उकळत असताना या पाण्यात कडीपत्ता आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकता.
थायरॉईड झालेल्या रुग्णांनी या गोष्टीची काळजी घ्या
जर तुम्ही थायरॉईडे रुग्ण आहेत, तर तुम्हाला गोळी घेण्याच्या १ तास नंतरच धन्याचं पाणी पिणे योग्य ठरेल. गोळी घेतल्यानंतर एक तासापर्यंत साधा पाणी प्या. या वेळेत इतर कोणतंही द्रव्य सेवन करु नका.
रक्तस्त्राव आणि एसिडिटीसाठी असा करा वापर
रक्तस्त्राव, एसिडिटी आणि जळजळ सारख्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी २५ ग्रॅम धने किसून घ्या. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याला रात्री किंवा ८ तासांसाठी झाकून ठेवा. दुसऱ्या दिवळी सकाळी त्याला गाळून घेऊन त्यात थोडी खडीसाखर मिक्स करून उपाशीपोटी सेवन करा.
डिस्क्लेमर – सामान्य माहितीवर आधारित हा लेख आहे. हा कोणत्याही प्रकारचा दावा किंवा विकप्ल होऊ शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी डॉक्टरांना संपर्क करा.