how to weight loss fast वजन कमी करण्यासाठी नेहमी आहारात आवश्यक ते बदल करण्याचा सल्ला दिला जातो. काही लोक वजन कमी करण्यासाठी चपाती खाणे बंद करतात, तर काही लोक भातापासून दूर राहतात. चपाती खाल्ल्याने वजन लवकर कमी होते की भात खाल्ल्याने याबाबत लोकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. काही लोक चपातीला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानतात, तर बरेच लोक वजन कमी करण्यासाठी भात आवश्यक मानतात. मात्र आहारतज्ञांच्या मते, चपाती आणि भात या दोन्हींच्या पौष्टिक मूल्यांमध्ये फरक आहे. वजन कमी करण्यासाठी दोन्हींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या न्यूट्रिफायच्या संस्थापक पूनम दुनेजा म्हणतात की, चपाती आणि भात दोन्ही पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही जर वजन वाढीमुळे आहाराकडे दुर्लक्ष करत असाल तर मात्र ते धोकादायक ठरु शकतं. तुम्ही आठवड्यातून 4 दिवस चपाती खाल्ल्यास 2 दिवस भात खा. अशा प्रकारे आहारात विविधता ठेवा. निरोगी लोक वजन कमी करण्यासाठी दोन्ही गोष्टींचा आहारात समावेश करू शकतात. चपाती आणि भाताच्या पौष्टिक मूल्यांमध्ये खूप फरक असून मधुमेहासह गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. तसेच, वजन कमी करण्यासाठी कधीही उपाशी राहू नये, अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

कोणत्या प्रकारची चपाती आणि भात फायदेशीर आहे?

आहारतज्ज्ञ पूनम दुनेजा सांगतात की, नाचणी, ज्वारी आणि बाजरीची भाकरी वजन कमी करण्यासाठी गव्हापेक्षा जास्त फायदेशीर आहे. यामुळे चरबी वाढत नाही आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यात फायबर आणि प्रथिनेही जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून बनवलेल्या चपात्या अतिशय पौष्टिक असतात. भातामध्ये तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता. दरम्यान आपल्या आहारात दोन्हीचे प्रमाण निश्चित केले पाहिजे.

हेही वाचा – १० मिनिटांत करा हॉटेलसारखा रंगीत पुलाव; नोट करा ही स्पेशल रेसिपी

वजन कमी करण्यासाठी 10 महत्वाच्या टिप्स

  • पुरेसे पाणी प्या. दररोज 2-3 लिटर पाणी प्यावे
  • आपल्या आहारातून साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करा
  • जंक फूड टाळा, घरगुती आहार घ्या
  • वजन कमी करण्यासाठी कधीही उपाशी राहू नये
  • क्य तितक्या लवकर धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर रहा
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to weight loss fast roti or rice whats best for weight loss srk