Men’s Sexual Health : हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: पुरुषांच्या शारीरिक आणि लैंगिक आरोग्यावर थंड हवामानाचा अनपेक्षित परिणाम दिसू शकतो. यूकेमधील डॉक्टरांनी ‘विंटर पेनिस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रकरणाविषयी सतर्क केले आहे. हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो आणि पुरुषांचे जननेंद्रिय (genitals) आकुंचन पावते.

‘द डेली एक्स्प्रेस’च्या एका अहवालानुसार, “हिवाळ्यात पुरुषांच्या लिंगाचा आकार अर्ध्यापर्यंत आकुंचित होताना दिसतो आणि या भागात रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे लिंगावर त्याचा परिणाम दिसून येतो. विशेषत: इरेक्टाइल डिसफंक्शनने ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा जास्त परिणाम होतो,” असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

इरेक्शन म्हणजे जेव्हा पुरुषांच्या जननेंद्रियामधील स्पंजवत ऊती फुगतात तेव्हा इरेक्शन होते. इरेक्शनमध्ये लिंग मोठे होते. लिंगामध्ये ताठरता येते. जेव्हा एखाद्या पुरुषाला लिंगाची ताठरता टिकवून ठेवण्यात अडचण येते तेव्हा त्या स्थितीला ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’, असे म्हणतात.

या परिणामाचा पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून काळजी घेणे अपेक्षित आहे, याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने पब्लिक हेल्थ इंटेलेक्चुअल डॉ. जगदीश हिरेमठ यांच्याशी संवाद साधला आणि सविस्तर माहिती जाणून घेतली.

डॉ. जगदीश हिरेमठ याबाबत सांगतात, “थंड हवामानाचा रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्याचे दिसून येते. ही एक शारीरिक प्रक्रिया आहे. हिवाळ्यात शरीरातील उष्णता वाचवण्यासाठी रक्तवाहिन्या अरुंद होतात. अशा वेळी रक्तवाहिन्या या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त पुरवण्यास प्राधान्य देतात. त्यावेळी जननेंद्रियांसह इतर अवयवांमधील रक्ताभिसरण कमी होते. पुरुषांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे लिंगाचा आकार कमी होतो आणि थंडीच्या महिन्यांमध्ये लिंग ताठरतेची क्षमताही कमी होते.

डॉ. हिरेमठ पुढे सांगतात, “युरोलॉजी (२००६) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार लिंगाच्या ऊतींमधील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे हिवाळ्यात रक्तवाहिन्यांशी संबंधित इतर कार्यांवर त्याचा थेट परिणाम दिसून येतो; ज्यामुळे ‘इरेक्शन’ची क्षमता कमी होते. हिवाळ्यात रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते आणि नायट्रिक ऑक्साईड सोडण्यावर मर्यादा येऊ शकते. नायट्रिक ऑक्साईड हे जननेंद्रियातील रक्तवाहिन्यांना आराम देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हेही वाचा : Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…

पुरुषांनी हिवाळ्यात लैंगिक आरोग्य जपण्यासाठी काय करावे?

डॉ. हिरेमठ सांगतात, “जीवनशैलीत बदल केला, तर हिवाळ्यात रक्तप्रवाहात सुधारणा होऊ शकते आणि थंड हवामानाचा लैंगिक कार्यक्षमतेवर होणारा प्रभाव कमी करता येतो”

उबदार राहा : शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उबदार कपडे वापरा. विशेषत: शरीराच्या खालच्या भागात उबदार कपडे वापरण्यास प्राधान्य द्या. त्यामुळे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत होईल.

नियमितपणे व्यायाम करा : हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित शारीरिक व्यायाम नियमितपणे करा. या व्यायामामुळे संपूर्ण रक्ताभिसरण आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारते आणि रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करण्यास मदत मिळते.

पोषक आहार घ्या : आर्जिनिन (नट, बिया, मासे) आणि अँटिऑक्सिडंट्स (बेरी, डार्क चॉकलेट) यांचे सेवन करा. त्यामुळे नायट्रिक अॅसिड निर्माण होते, जे रक्तवहिन्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

पेल्विक फ्लोर व्यायाम : ‘केगेल’ व्यायाम पेल्विक स्नायूंना मजबूत करतो, जे ‘इरेक्टाइल’ कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि जननेंद्रियाच्या भागात रक्तप्रवाह वाढवतात.

भरपूर पाणी प्या : थंड हवामानामुळे अनेकदा निर्जलीकरणाची समस्या जाणवते आणि त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण बिघडू शकते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर केल्याने रक्तवहिन्यांशी संबंधित कार्य सुधारते.

हेही वाचा : “आम्हाला मूल नको होतं; पण…”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा खुलासा! सांगितला मातृत्वाचा कमी बोलला जाणारा पैलू

तज्ज्ञांनी सुचविलेले उपचार

औषधोपचार : सिल्डेनाफिल (वियाग्रा) यांसारखे PDE5 इनहिबिटर अधिक फायदेशीर ठरतात पण, हिवाळ्यात रक्तप्रवाहाची गती बदलते आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

गरम पाण्याने अंघोळ करणे : हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ केल्याने रक्तप्रवाह वाढू शकतो आणि रक्तवाहिन्या सुरळीतपणे कार्यप्रवण राहू शकतात.

तणाव हाताळणे : हिवाळ्यात कॉर्टिसोल हार्मोनची पातळीदेखील वाढू शकते, ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीवरही नकारात्मक परिणाम होतो. योगा, तसेच ध्यानधारणा करून तणाव कमी करता येतो.

Story img Loader