How To Identify Fake Brown Bread : आपल्यापैकी बरेच जण पांढऱ्यापेक्षा ब्राऊन ब्रेडचे सेवन करण्याला प्राधान्य देतात. या दोन्ही ब्रेडच्या पौष्टिकतेमध्ये फारसा फरक नसला तरी तुम्ही बनावट ब्राऊन ब्रेड खाण्यास बळी पडू नये इतकंच आम्हाला वाटते आहे, कारण सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ ब्राऊन ब्रेडच्या उत्पादनात भेसळ (Fake Brown Bread) आहे असा इशारा देतात आणि ग्राहकांना ते खरेदी करताना सावध राहण्याचे आवाहनसुद्धा करतात. आहारतज्ज्ञ शिखर कुमारी यांनीदेखील एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दावा केला आहे की, व्यावसायिक ब्राऊन ब्रेडबद्दल दावा करतात तितके ते पौष्टिक नसतात.

मुंबईच्या झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले की, काही उत्पादक पांढरे किंवा मैदा ब्रेड, ब्राउन ब्रेड आहेत असे सांगून विकू शकतात (Fake Brown Bread) . यासाठी ते अनेकदा भ्रामक (मिसलिडिंग) लेबले, साहित्य (ingredient list) किंवा पॅकेजिंग वापरतात.

पण, ही मार्केटिंग युक्ती एखाद्याच्या एकूण आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते आणि अचानक वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे, पाचन समस्या आणि पोषक तत्वांची कमतरता यांसारख्या आरोग्याच्या परिस्थितीस कारणीभूतसुद्धा ठरू शकते. त्यामुळे ब्राऊन ब्रेड खरेदी करताना लोकांना सावध राहण्याचा सल्ला (Fake Brown Bread) दिला जातो,” असे आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले आहे.

हेही वाचा…Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?

ब्राऊन ब्रेड भेसळयुक्त नाही हे कसे ओळखाल (How to check for its authenticity)

ब्राऊन ब्रेड घेताना इन्ग्रेडिएंट लिस्ट म्हणजेच साहित्य (ingredients list) काय वापरण्यात आले आहे ते एकदा तपासून पाहा. जर ब्राऊन ब्रेडमध्ये गव्हाच्या पिठाच्या ऐवजी रिफाइंड पीठ असेल तर ती बनावट ब्राऊन ब्रेड असण्याची शक्यता जास्त असते. कमीत कमी साखरेचे प्रमाण असलेले ब्राऊन ब्रेड निवडा आणि कोणताही कृत्रिम रंग नाही ना याचीसुद्धा खात्री करा’, असे जिनल पटेल यांनी सांगितले आहे.

आहारतज्ज्ञ शिखर कुमारी यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, प्रत्येकाने स्वतःचा ब्रेड घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरी गव्हाचा ब्रेड बनवल्याने तुम्हाला इन्ग्रेडिएंट लिस्ट म्हणजेच साहित्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते. तुम्ही १०० टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ वापरू शकता आणि कॅरमेल कलरसारखे पदार्थ टाळू शकता.

जिनल पटेल यांनी सांगितले की, तुमचा ब्राऊन ब्रेड बनावट आहे की नाही हे शोधण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे त्याच्या टेक्सचरचे (पोत) बारकाईने परीक्षण करणे. ब्राऊन ब्रेडचा टेक्सचर जाड आणि ओलसर असतो. तसेच दुसऱ्या बाजूला, बनावट ब्राऊन ब्रेड किंवा पांढरा ब्रेड हलका असतो आणि त्याचा टेक्सचर स्पंजसारखा असतो. तर भेसळ असणारे ब्राऊन ब्रेड विकत घेणे टाळून निरोगी गव्हाचा ब्रेड विकत घेण्यासाठी स्थानिक बेकरी किंवा प्रतिष्ठित ब्रँडची निवड करा, असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत

Story img Loader