Sleep Position : निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. चांगली झोप ही फक्त निरोगी जीवनशैलीचा भाग नसून, संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने तो महत्त्वापूर्ण भाग आहे. विशेषत: तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता, यावरून तुम्ही शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनच्या पातळीविषयी जाणून घेऊ शकता. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

केअर हॉस्पिटल हायटेक सिटी येथील पल्मोनोलॉजिस्ट सल्लागार डॉ. सतीश रेड्डी सांगतात, “अनेकांच्या झोपण्याच्या स्थितीमध्ये शरीराचे स्नायू योग्यरीत्या शिथिल किंवा आरामदायी नसतात. त्यामुळे त्यांना अस्वस्थता जाणवते किंवा झोपताना त्रास उद्भवतो.”

Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rajamudi rice the best compared to white and red rice
पांढऱ्या आणि लाल तांदळाच्या तुलनेत राजामुडी तांदूळ आहे बेस्ट? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
what happens to blood sugar levels when you walk after a meal
जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…

झोपण्याच्या काही स्थिती खालीलप्रमाणे –

छातीजवळ गुडघे घेऊन झोपणे- छातीजवळ गुडघे घेऊन, एका बाजूला वाकून झोपल्याने श्वासनाशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे मान आणि पाठ यांच्यावर ताण येतो.

पोटावर भार देऊन झोपणे : पोटावर भार देऊन झोपल्याने मान आणि पाठीच्या खालील भागावर ताण येऊ शकतो. कारण- अशा स्थितीत झोपताना व्यक्ती श्वास घेण्यासाठी डोके एका बाजूला वळवते.

स्टारफिश स्थिती : या स्थितीत डोक्याच्या वर हात पसरून, पाठीवर भार देऊन झोपल्याने खांद्यामध्ये अस्वस्थता जाणवते आणि त्यामुळे काही व्यक्तींमध्ये घोरण्यासारखी लक्षणे दिसून येतात

एका बाजूला झोपणे : दोन्ही हात समोर ठेवून, एका बाजूला झोपल्याने खांदे आणि मान यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा : Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?

यामागील कारणे कोणती असू शकतात?

डॉ. रेड्डी सांगतात की, दीर्घकाळ ताण किंवा शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे स्नायूंवर ताण येऊ शकतो. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीराला आराम मिळत नाही.

खूप टणक किंवा खूप मऊ असलेली गादी, नीट उशी नसणे किंवा खोलीचे तापमान योग्य नसल्याचा परिणाम झोपण्याच्या स्थितीवर दिसून येतो. संधिवात, फायब्रोमायल्जिया किंवा शरीराच्या वेदना यांसारख्या कारणांमुळे झोपेच्या स्थितीत अस्वस्थता जाणवते.

चिंता, तणाव किंवा नैराश्यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे आरामदायी झोप घेता येत नाही आणि झोपण्याची योग्य स्थितीसुद्धा शोधता येत नाही. बऱ्याच लोकांना ते नियमित कसे झोपतात, याविषयीची माहितीच नसते आणि त्यामुळे ते झोपेच्या आरोग्यावर झोपण्याची स्थिती कसा परिणाम करते, हे ओळखू शकत नाहीत.

हेही वाचा : Migraine Relief Trick : १५ ते २० मिनिटे गरम पाण्यात बुडवून बसा पाय! मायग्रेनची समस्या होईल कमी? वाचा डॉक्टरांचे मत

चांगल्या झोपेसाठी तुम्ही काय करू शकता?

मन:शांती मिळविण्याचा प्रयत्न : झोपण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या. व्यायाम केल्याने मन शांत होण्यास आणि शरीराला आराम मिळण्यास, तसेच स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चांगली झोप घेता येते.

हळुवार स्ट्रेचिंग : नियमित योगासने करा. विशेषत: पाठ, मान व खांदे यांवर लक्ष केंद्रित करणारे व्यायाम करा. त्यामुळे स्नायूंचा ताण कमी करण्यास आणि शरीरामध्ये लवचिकता येण्यास मदत होते.

गादी-उशी आणि तापमान योग्य असणे आवश्यक : तुमची गादी आणि उशीमुळे तुमच्या शरीराला झोपताना योग्य आधार मिळतोय का, हे एकदा तपासा. तुम्हाला नीट आराम करता येईल, असे खोलीचे तापमान ठेवा.

झोपेच्या वेळी उत्तेजक पेये वर्ज्य : झोपेच्या वेळी कॅफिन, निकोटीन व अल्कोहोल घेणे टाळा. कारण- त्यामुळे तुमच्या झोपेत अडथळे निर्माण होऊ शकतात. परिणामत: शरीराला पुरेसा आराम मिळत नाही.

Story img Loader