Human Papilloma Virus: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एचपीव्ही हा अतिशय धोकादायक विषाणू आहे. हा विषाणू शरीरात खूप लवकर पोहोचतो आणि त्यानंतर शरीरात याची विशेष लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग ओळखणे फार कठीण आहे. हा विषाणू शारीरिक संपर्कातून पसरतो. कमीतकमी ८० टक्के लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिला आणि पुरुषांना त्यांच्या आयुष्यात या विषाणूचा सामना करावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूके पब्लिक हेल्थ सर्व्हिस, NHS आणि अमेरिकन असोसिएशन ऑफ सेक्शुअल हेल्थ यांनी याची पुष्टी केली आहे. त्यामुळे मानवी विषाणूचा संसर्ग कसा टाळता येईल हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. मानवी पॅपिलोमा विषाणू लैंगिक संभोगादरम्यान आणि ओरल सेक्सच्या मार्फत व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. तसेच, शारीरिक संबंध ठेवताना कंडोम वापरला नाही तरीही विषाणू पसरू शकतो.

एचपीव्हीपासून कसे वाचायचे?

एचपीव्ही संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टर कंडोम वापरण्याची शिफारस करतात. जर जोडीदारापैकी कोणाच्याही प्रायव्हेट पार्टवर पुरळ उठत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि समस्या दूर होईपर्यंत सेक्स टाळावा. याव्यतिरिक्त, धूम्रपान आणि अल्कोहोल सोडणे किंवा मर्यादित करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बचावासाठी उपाय जाणून घ्या..

  • जर तुम्हाला ह्युमन पॅपिलोमा विषाणू संसर्गाने ग्रासले असेल तर त्यावर कोणताही खात्रीशीर इलाज नाही. पण, या विषाणूची लक्षणे जाणून घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येते. एचपीव्ही टाळण्यासाठी, एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध टाळा. असे केल्याने या विषाणूचा संसर्ग टाळणे सोपे होते.

(आणखी वाचा: ओव्याचे पाणी प्यायल्याने वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल? पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या)

  • एचपीव्ही संसर्गानंतर महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोकाही जास्त असतो. गर्भाशयात काही असामान्य पेशी तयार झाल्यास त्यावर उपचार करता येतात. तसेच तज्ज्ञांच्या मते महिलांनी वेळोवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. एका अहवालानुसार, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे एचपीव्हीमुळे होतात.
  • एचपीव्ही विषाणूच्या संसर्गामुळे जास्त नुकसान होत नाही आणि कालांतराने या विषाणूचा प्रभाव संपतो. तसेच गुप्तांगात गाठ असेल तर त्यावर उपचार करून तो बरा करणे शक्य आहे.
  • एचपीव्ही संसर्गामुळे शरीरात इतर कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो. यामध्ये घशाचा कर्करोग आणि पुरुष जननेंद्रियाच्या कर्करोगाचा समावेश आहे. या विषाणू संसर्गाची लक्षणे वेळीच समजून न घेतल्यास कर्करोग होऊ शकतो, असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी तरुण प्रौढांसाठी एक लस उपलब्ध आहे.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hpv dangerous human papilloma virus can spread while making physical relations gps