मागच्या लेखात आपण कॅलरीज बद्दल जाणून घेत होतो. कॅलरीज म्हणजे अन्नातून मिळणारी ऊर्जा. अन्न पदार्थांवर केलेली प्रक्रिया आणि त्यांचे मिश्रण यावर पदार्थातील उर्जेवर परिणाम होतो. मानवी शरीराला लागणारी ऊर्जा वजन , वय, लिंग यावर अवलंबून असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेप्टीन आणि घ्रेलिन ही दोन महत्वाची संप्रेरके. लेप्टीन भूक शमल्याचं मेंदूला जाणीव करून देते आणि घ्रेलिन भूक असण्याचं. आपण खात असलेल्या कर्बोदकांच्या, प्रथिनांच्या आणि स्निग्धांशाच्या प्रमाणानुसार लेप्टीन आणि घ्रेलिनचे कार्य बऱ्यापैकी अवलंबून असते. अनेकदा उत्तम पोषणमूल्ये, फायबर, प्रथिनेयुक्त पदार्थ चूक शमल्याचा संदेश मेंदूला पाठवून आहार उत्तम राखण्यास मदत करते.

इन्शुलिन : शरीरातील कर्बोदकांचे प्रमाण, वेळा , ताण यांचा थेट परिणाम इन्शुलिनच्या पातळीवर होतो. तसेच भुकेच्या संप्रेरकांसोबत योग्य तऱ्हेने काम करण्याचे कार्य इन्शुलिन करते. स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन , थायरॉईड या ग्रंथींवर देखील ऊर्जेचे प्रमाण अवलंबून असते. विशिष्ट मासिक पाळीच्या सुमारास स्त्रियांना नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. शरीरातील सिट्रोजेन आणि रोजेस्टेरॉनचे प्रमाण या भुकेसाठी विशेष कारणीभूत असते.

हेही वाचा : २० किलो वजन कमी करून सोनम कपूर झाली ‘फिट आई’! प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचा काय आहे मंत्र?

मासिक पाळीदरम्यान जास्तीच्या ऊर्जेचे अन्न खावे खावे का ? याचे उत्तर आहे- हो. आहारशास्त्रज्ञ आणि आहारतज्ज्ञ तुमच्या नेमक्या कॅलरीजची गरज ओळखून त्याप्रमाणे जास्तीचे पदार्थ किंवा किमान प्रमाणात उत्तम ऊर्जा देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करू शकतात. स्त्रीच्या आहाराचा विचार करताना मूळ ऊर्जा -१५००- १८०० कॅलरीज इतके असणे आवश्यक असते. पुरुषांसाठी १७००-२००० इतक्या कॅलरीज म्हणजे ऊर्जेचा आहार आवश्यक असतो.

स्त्रियांच्या शरीरात संप्रेरकांचे बदल होत असताना ऊर्जेची पातळी बदलत असते आणि याचा विचार देखील आहारातील ऊर्जेचे नियमन करताना करणे आवश्यक आहे. या कॅलरीज रोज किमान १ तास कसरत करणाऱ्या व्यक्तींसाठी लागू होतात. नियमित व्यायाम करणाऱ्या किंवा मैदानी खेळ खेळणाऱ्या व्यक्तींना आहाराची ऊर्जेची आवश्यकता बदलू शकते.

हेही वाचा : १८ वर्षीय विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने कोचिंग क्लासमध्येच मृत्यू! कमी वयात हृदयविकार का होतात, लक्षणे कशी ओळखाल?

सध्या विविध अॅप्स दररोज आवश्यक असणाऱ्या कॅलरीज आपल्याला सहज मोजून देऊ शकतात. या कॅलरीजचे पालन करताना त्या केवळ कर्बोदकांपासून (कार्ब्स पासून ) येणार नाहीत किंबहुना लेव्हल एकाच प्रकारच्या पोषण घटकापासून मिळणार नाहीत तर वेगवेगळ्या पोषक घटकांचा आहारात समावेश असायला हवा याची काळजी घेणे गरजेचे आहे.

शरीरात ऊर्जा स्नायूंमध्ये साठवली जाते. आहारातून अतिरिक्त ऊर्जा मिळाल्यास आणि त्याचे वेळेत विघटन न झाल्यास हळूहळू स्निग्धांशाचं पेशीत रूपांतर होऊ लागते. जसं एखाद्या गाडीची इंधन क्षमता असते तशीच आपल्या शरीराची देखील क्षमता असते. जेव्हा बद्धकोष्ठ , अजीर्ण यासारखे विकार सुरु होतात तेव्हाच त्याकडे लक्ष देऊन ते दुरुस्त करायला हवेत. अनेकदा शून्य ऊर्जा किंवा अति ऊर्जा यासाठी कारणीभूत ठरू शकते. अन्न घटकांमधून मिळणाऱ्या कॅलरीज शरीराच्या क्षमतेप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे जाणून शरीरास पुरविणे आरोग्यदायी ठरते. कॅलरीज मोजताना पोषणमूल्ये , वय, शरीरातील स्नायूंचे प्रमाण यांचा आवर्जून विचार करून त्याप्रमाणे आहार घेतल्यास असा आहार कायम पोषक ठरू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human body and calories hldc css