संपूर्ण वर्षातल्या वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर सहा ऋतूंमध्ये शरीराचे बल सारखेच नसते. प्रत्येक ऋतूमध्ये देहबल हे भिन्न-भिन्न असते. त्या ऋतूमधील निसर्ग-बदलांचा, वातावरणाचा व त्या वातावरणाच्या परिणामी शरीराचा अग्नी (भूक,पचनशक्ती,अन्नसेवन,अन्नपचन), उपलब्ध होणारे अन्न, शरीराची हालचाल,शरीराला होणारे परिश्रम वा केला जाणारा व्यायाम, शरीराला येणारा घाम वगैरे घटकांमध्ये होणारा बदल यावर त्या ऋतूमधील देहबल निर्भर असते आणि साहजिकच प्रत्येक ऋतूमध्ये देहबल वेगवेगळे असते.

‘वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यात देहबल कसे असते?’तर ‘निकृष्ट’ असते. ज्याची कारणे अनेक आहेत,ती समजून घेऊया. वास्तवात वर्षा ऋतू हा विसर्गकाळाचा अर्थात शरीराला बल पुरवणार्‍या काळाचा प्रथम ऋतू आहे, तरीही या ऋतूमध्ये देहबल निकृष्ट का? कारण पावसाळ्यात विसर्गकाळ सुरु झाला म्हणजे लगेच शरीराचे बल वाढले असं होत नाही.

supriya sule
‘बटेंगे तो कटेंगे’वरून भाजपमध्ये दुफळी, सुप्रिया सुळे यांचा दावा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!

आणखी वाचा: Health Special: प्या फुलांचं पाणी, राहा निरोगी

हिवाळ्यामध्ये थंड-निरोगी वातावरण असते, घाम येत नाही, भूक प्रखर असते, जेवण भरपूर जाते आणि सहज पचतेसुद्धा, शिवाय आजारही नसतात. साहजिकच हिवाळ्यामध्ये लोकांचे आरोग्य चांगले राहते, वजने वाढतात, शरीरं गुटगुटीत दिसू लागतात. उन्हाळ्यामध्ये जरी भूक तुलनेने कमी असली व घाम भरपूर येत असला तरी पावसाळ्यासारखे आजार नसतात. शिवाय हल्ली लोक शरीर झिजवणार्‍या उन्हाच्या प्रत्यक्ष संपर्कात फारसे येत नाहीत. एसीमध्ये राहाणार्‍यांना तर उन्हाचा त्रास होतच नाही (एसीचे अन्य त्रास मात्र होतात).

एप्रिलपासून उपलब्ध होणारा आंबा हा या दोन महिन्यात भरपूर खाल्ला जातो (आंब्याने वाढणारे वजन या विषयाची चर्चा आपण ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये विस्ताराने केली आहे). त्याला दूध, दही, आईस्क्रीम अशा पौष्टिक आहाराची जोड मिळते. या सर्व कारणांमुळे ग्रीष्मातल्या दोन महिन्यात कृश लोकांची शरीरेसुद्धा बाळसेदार होताना दिसतात. आंब्यांच्या या पोषणाने मुळात जाड असलेली माणसे तर आणखी जाड होतात. मात्र ज्या सडसडीत व्यक्तींच्या अंगावर आंबे खाऊन मांस चढलेले असते ,ते मात्र पाऊस सुरू झाल्यावर काही दिवसांमध्येच उतरते. आंब्यांमुळे मिळणारे पोषण हे जसे स्टेरॉईडच्या गोळ्या खाऊन शरीर फुगते, तसे असते की काय अशी शंका यावी अशाप्रकारे आंबे खाऊन आलेले बाळसे पाऊस सुरू झाल्यावर काही दिवसांत उतरताना दिसते. प्रत्यक्षातही आंब्यामध्ये फायटोस्टेरॉल्सचे प्रमाण मुबलक असते ज्यामुळे आंबे खाल्ल्यावर वाढलेले वजन आंबे थांबवल्यावर कमी होते, ते पावसाळ्यात.

आणखी वाचा: Health Special: वेदना झोपेला आणि झोप वेदनेला म्हणजे काय?

या आधीच्या ग्रीष्म ऋतूमध्ये कमजोर झालेला अग्नी, पावसाळ्यात अधिकच मंद होतो. त्यात त्याला अम्लविपाकी पाण्याची जोड मिळते, जे पित्त वाढण्यास तर कारणीभूत होते, मात्र अग्नी (भूक व पचनशक्ती) मंद करते. साहजिकच अन्नसेवन नीट होत नाही आणि झाले तरी त्याचे व्यवस्थित पचन होत नाही. अन्नपचन नाही तर उर्जा नाही आणि उर्जा नाही तर शरीराचे बल कमी.

त्यात पावसाळ्यात याला वातप्रकोपाची जोड मिळते. वात हा जात्याच शरीरामध्ये हलकेपणा वाढवणारा आहे. शरीरामध्ये मांसमैदाने तयार होणार्‍या प्रमाणबद्ध देह-रचनेस विरोध करणारा आहे. पावसाळ्यातला वातप्रकोप शरीरामध्ये मांसमेद घटवण्यास व शरीराला अशक्त करण्यास पूरक होतो.

वातावरणातल्या गारव्याचा सामना करायचा तर शरीराला अधिकाधिक उर्जा देईल असा पौष्टिक आहार घ्यायला हव, जे हिवाळ्यात शक्य होते. पावसाळ्यात मात्र अग्नी मंद असल्याने धड भूक लागत नाही आणि पौष्टिक अन्न खाल्ले तरी पचत नाही. पावसाळ्यातील तुषारयुक्त गार हवा, मात्र उर्जा देणार्‍या आहाराची कमी हे सुद्धा शरीर अशक्त होणयाचे एक महत्त्वाचे कारण ठरते.

पावसाळ्यातील थंड, ओलसर वातावरण हे रोगजंतूंच्या वाढीस व प्रसारास पोषक होत असल्याने विविध संसर्गजन्य आजार या दिवसात फैलावतात आणि त्या रोगांशी सामना देण्यामध्ये सुद्धा शरीराचे बल घटून शरीर अधिक कमजोर होते.

एकंदर पाहता बल वाढवणारा विसर्गकाळ असूनही मंद झालेला अग्नी, त्याच्या परिणामी मंदावलेली भूक व पचनशक्ती, अन्न जेवले तरी नीट न पचल्याने अंगी न लागणे, अयोग्य आहारामुळे आम निर्मिती, आमामुळे शरीरकोष दुर्बल होणे, शरीरामध्ये होणारा पाण्याचा व अन्नाचा अम्लविपाक, त्यामुळे होणारा पित्तसंचय, वर्षा ऋतूमध्ये निसर्गतः होणारा वातप्रकोप व त्यामुळे होणार्‍या विविध वातविकृती, या सर्वामुळे व वातावरणामुळे खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, विविध आजारांना तोंड द्यावे लागणे या सर्व कारणांच्या परिणामी शरीरस्थिती खालावते. हे स्वाभाविकच आहे. या सर्व कारणांमुळे पावसाळ्यामध्ये त्यातही प्रावृट्‌ ऋतूमध्ये (पहिल्या पावसाच्या दिवसांमध्ये) शरीर कमजोर होऊन देहबल घटते. त्या तुलनेने पावसाच्या पहिल्या दोन महिन्यानंतर भाद्रपद महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरपासून आरोग्य सुधारायला लागते.