हसणे हे सर्वोत्कृष्ट औषध आहे हे आपण सर्वांनी ऐकले आहे; परंतु एका व्यक्तीला मनापासून खळखळून हसणे महागात पडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर)वर न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी त्यांच्या या पेशंटबाबत माहिती दिली. खूप हसण्यामुळे श्याम (नाव बदलले आहे) हे बेशुद्ध झाले होते.

‘चहा आणि कॉमेडी शो’चा आनंद लुटताना श्याम यांना खूप हसू येत होते; जे त्यांना रोखता येत नव्हते. ते इतके हसले की, शेवटी त्यांनी आपल्या चहाच्या कपावरील नियंत्रण गमावले आणि नंतर त्यांचे शरीर शक्तीहीन झाले. सुरुवातीला ते खुर्चीवरून पडले आणि थोड्या वेळासाठी त्यांची शुद्ध हरपली. सुदैवाने, त्यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळाली. डॉ. कुमार यांनी त्यांच्या स्थितीचे निदान हास्य-प्रेरित सिंकोप (laughter-induced syncope) म्हणून करण्यात आले. ही एक दुर्मीळ; परंतु वास्तविक घटना आहे.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
WATCH Radhika Merchant and Anant Ambani’s fun Turkish ice cream moment in Dubai goes viral
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी फिरत आहेत दुबईत! Turkish आइस्क्रिम खाताना राधिकाचा मजेशीर Video होतोय Viral
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
teacher student sweet joke
हास्यतरंग :  मिठाई…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

हेही वाचा – उन्हाळ्यात उसाचा रस, फळांचे रस, कोल्ड्रिंक, चहा-कॉफी पित आहात का? शरीरावर काय परिणाम होतो, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

याबाबत सहमती दर्शवीत हैदराबाद, बंजारा हिल्स केअर हॉस्पिटल्स, इंटर्नल मेडिसिनचे सल्लागार डॉ. अथर पाशा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “जास्त हसण्यामुळे शुद्ध हरपणे अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे; परंतु परिस्थितीमुळे ते शक्य आहे.”

हास्य-प्रेरित सिंकोप म्हणजे काय? (What is laughter-induced syncope)

“हृदयाच्या गतीमध्ये अचानक चढ-उतार आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे असे होते; ज्यामुळे शुद्ध हरपते”, असे डॉ. पाशा यांनी स्पष्ट केले. हे सहसा काही प्रकारच्या तणावपूर्ण स्थितीची प्रतिक्रिया म्हणून होते. अत्याधिक हसण्यामुळे चेतना (consciousness) नष्ट होण्याद्वारे ही अत्यंत दुर्मीळ स्थिती उदभवू शकते.

वासोवागल (Vasovagal), कार्डियाक, सिच्युएशनल व न्यूरोलॉजिक सिंकोप हे काही प्रकारचे सिंकोप आहेत; जे हास्य-प्रेरित सिंकोपसारखे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका आहे का?

हास्य-प्रेरित सिंकोपशी संबंधित विशिष्ट धोका वाढविणाऱ्या घटकांवरील संशोधन मर्यादित प्रमाणात झाले आहे. “या संशोधनात असे सुचवले जाते की, अचानक मृत्यू, छातीत दुखणे किंवा धडधडणे यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींना सिंकोपचा धोका जास्त असतो आणि त्यामुळे हास्य-प्रेरित सिंकोपचाही धोका जास्त असतो. या विकारावर प्रतिबंध आणि रुग्णाच्या समस्येबद्दल जागरूकता याद्वारे उपचार केले जातात,” असे डॉ. पाशा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – काजू, बदाम, शेंगदाणे, सीड्स भाजून खावेत की कच्चे? तज्ज्ञांनी सांगितलेले तुमच्या शरीरावर होणारे ‘हे’ परिणाम वाचून घ्या निर्णय

त्यावर उपचार केले जाऊ शकतात किंवा फक्त नियंत्रित केले जाऊ शकतात?

हास्य-प्रेरित सिंकोपसाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही; पण काही नियंत्रण धोरणे अवलंबल्यास ते ही परिस्थिती टाळण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. उदा. जोरजोरात हसण्यामुळे सिंकोपचा त्रास होऊ शकतो. त्यामध्ये जीवनशैलीतील बदलांचा समावेश असू शकतो; जसे की खूप हसविणाऱ्या परिस्थिती किंवा गोष्टी टाळणे. विशेषतः जर भूतकाळात सिंकोपचे प्रसंग आले असतील, तर आवर्जून अशा गोष्टी टाळाव्यात.