चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराबरोबरच चांगली झोप घेणेही अतिशय आवश्यक असते. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट हे म्हणणेही तितकेच खरे आहे. झोपेच्या बाबतीतही हे अगदी खरं आहे. कोणत्याही व्यक्तीने सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक असते असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र जास्त झोपणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जास्त झोप येणे हा देखील एकप्रकारचा आजार असून याला हायपरसोमनिया असे म्हणतात. यामध्ये व्यक्तीला दिवसाही खूप झोप येते. अशी व्यक्ति कोणतेही कारण देऊन सतत झोपण्याचा प्रयत्न करत असते. मात्र हे शरीरासाठी हानिकारक असते. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत मोबाइलमध्ये वेळ घालवल्याने या आजाराचा धोका अधिक वाढतो. मोबाइलमधून निघणारी निळी किरणे झोपेवर प्रभाव पाडतात. तसेच रात्री झोपताना मद्यपान, धूम्रपान किंवा कॉफीचे सेवन केल्याने झोप येत नाही. तथापि, काही लोकांना कधीही झोप येते. हे हायपरसोमनिया या आजारामुळे होऊ शकते.

Health Tips: मधुमेह ते कोलेस्ट्रॉल, अनेक आजारांमध्ये सुपरफूड प्रमाणे काम करते मशरूम; वाचा इतर फायदे

हायपरसोमनिया हा आजार कोणाला होतो?

क्लीव्हलँड क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हायपरसोमनिया हा आजार होण्याचे प्रमाण सामान्य आहे. असेही मानले जाते की एकूण लोकसंख्येच्या ५% लोकांवर याचा प्रभाव होतो. तसेच सहसा किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे.

डॉ. हेमंत शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जास्त झोपल्याने नैराश्य येते. तसेच यामुळे डोपामाईन आणि सेरोटोनिन हार्मोनचे स्तर कमी होतो. जर तुम्हीही जास्त झोपत असाल तर पूर्ण दिवस तुमची चिडचिड होऊ शकते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जे लोक जास्त झोपतात त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. इतकेच नाही तर याचा आपल्या स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो.

हायपरसोमनियाची लक्षणे

हेल्थ लाइननुसार, हायपरसोमनियाच्या लक्षणांमध्ये भूक न लागणे, सतत झोप येणे, चिडचिड होणे, ताण आणि नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे, दिवसा अस्वस्थ वाटणे पॅनिक अटॅक यासारख्या समस्यांचा समावेश होतो.

महागड्या औषधांशिवायच कमी करता येईल उच्च रक्तदाबाची समस्या; जाणून घ्या, कसं

हायपरसोमनियावरील उपाय

क्लीव्हलँड क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. हायपरसोमनिया हा अतिशय सामान्य आजार असला तरीही तो धोकादायक सिद्ध होऊ शकतो. म्हणूनच यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेत राहणे अतिशय आवश्यक आहे. तुम्ही तुमची झोपण्याची शैली आणि स्थिती सुधारणे आवश्यक आहे. तसेच कॅफिनयुक्त पदार्थ आणि मद्यपान करणे टाळावे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hypersomnia oversleeping can also be harmful to health know the symptoms and prevention methods from experts pvp