Hypertension Disease : हायपरटेन्शन ज्याला उच्च रक्तदाब असेही म्हणतात, ही जागतिक स्तरावर वेगाने वाढणारी गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे. हायपरटेन्शन हा आजार ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे जीवघेणे आजार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. यात भारतातील हायपरटेन्शनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक चिंताजनक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, जून २०२३ पर्यंत २७ राज्यांमधील ५.८ दशलक्ष (५८ लाख) पेक्षा जास्त हायपरटेन्शन रुग्णांवर इंडियन हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह (IHCI) अंतर्गत उपचार केले जात होते. पण, रुग्णांची संख्या काळानुसार वाढत आहे, जे एक प्रमुख जोखीम घटक आहे. याच अहवालाबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, डॉ. व्ही. मोहन, डॉ. यादव यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

देशात हायपरटेन्शन असलेल्या लोकसंख्येच्या निम्म्या लोकांनी यावर नियंत्रण मिळवल्यास २०४० पर्यंत भारतातील किमान ४.६ दशलक्ष मृत्यू टाळता येतील. पण, देशाच्या लोकसंख्येपैकी ३१ टक्के किंवा १८८.३ दशलक्ष लोक सध्या या स्थितीत जगत आहेत.

icici prudential value discovery fund
आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची द्विदशकपूर्ती; गुंतवणुकीवर ‘निफ्टी’च्या तुलनेत दुप्पट लाभ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
These countries have the most rivers in the world
जगातील ‘या’ देशांमध्ये आहेत सर्वाधिक नद्या; जाणून घ्या भारतातील नद्यांची संख्या
40 percent increase in hearing problems during Ganeshotsav 2024 mumbai news
गणेशोत्सवादरम्यान श्रवण क्षमतेच्या समस्यांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ!
What is the humanitarian crisis in Sudan
सुदानमधील लष्करी गटांतील संघर्षामुळे भीषण मानवतावादी संकट… पुढे काय होणार? भारताच्या हितसंबंधांना धोका?
Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित
fiscal deficit latest news in marathi
वित्तीय तूट जुलैअखेर निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत १७.२ टक्क्यांवर
number of billionaires in India is growing
देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, भारतीय आता होत आहेत अधिक श्रीमंत; हे कसं घडतंय? जाणून घ्या

हायपरटेन्शन (140/90 mmHg किंवा त्याहून अधिक) आजारामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल, मूत्रपिंडाचे नुकसान आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवत आहेत, जे टाळण्याजोगे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, केवळ ३७ टक्के भारतीयांनाच हायपरटेन्शनचे निदान होते आणि यातील ३० टक्केच उपचार घेतात; तर १५ टक्के लोकांनाच हा आजार नियंत्रणात ठेवता येत आहे.

देशातील हृदयविकाराच्या झटक्यासारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांमुळे होणाऱ्या निम्म्याहून अधिक मृत्यूमागे (५२ टक्के) हायपरटेन्शन हे मुख्य कारण आहे. यामुळे भारतात ह्रदयविकाराचे रुग्णही अधिक आहेत. यात तरुणांमध्ये ह्रदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांचे नुकसान होते. यात हृदय बराचवेळ तणावात असल्यास ह्रदयविकाराचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे तरुणांमध्ये हायपरटेन्शनचे निदान न झाल्यास किंवा अनियंत्रित राहिल्यास भविष्यात त्यांची आरोग्यस्थिती गंभीर होऊ शकते.

भारतातील एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास, मधुमेह (१०१ दशलक्ष) आणि प्री-डायबेटिसमुळे (१३७ दशलक्ष) हायपरटेन्शन आजाराचा धोका अधिक वाढतोय. आपल्या राहणीमानात बदल करून आणि औषधांचे योग्य प्रमाणात सेवन करून हा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार या आजारावर आता तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.

प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. के. श्रीनाथ रेड्डी , पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) नुसार, हायपरटेन्शनवर उपचार करण्यापूर्वी त्यामागील कारणे शोधणे महत्वाचे आहे. यात रक्तातील साखर, रक्तातील लिपिड्स, लठ्ठपणा आणि इतर आजारांबाबत तपासणी, चाचणी केल्यास तुम्हाला हायपरटेन्शन मागची मुख्य कारणं समजतील.

भारताने २०२५ पर्यंत हायपरटेन्शन किंवा मधुमेह असलेल्या ७५ दशलक्ष रुग्णांची काळजी घेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ज्याचे WHO नेही कौतुक केले आहे. जागतिक स्तरावर, तीन प्रौढांपैकी एकाला किंवा सुमारे १.३ अब्ज लोक हायपरटेन्शनमुळे प्रभावित होत आहेत. या अहवालात ३० ते ७९ वयोगटातील डेटा गोळा करण्यात आला आहे.

भारतात हायपरटेन्शन आजारामागील मुख्य कारणे?

भारतात मीठाचे जास्त सेवन, तंबाखूचे सेवन, लठ्ठपणा, मद्यपान आणि शारीरिक व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हायपरटेन्शनची समस्या वाढताना दिसतेय. यात तंबाखूचे सेवन (२८ टक्के) आणि शारीरिक व्यायामाचा अभाव (३४ टक्के) हे भारतातील हायपरटेन्शनमध्ये दोन सर्वात प्रभावी ट्रिगर म्हणून अधोरेखित केले आहेत.

जागरुकतेचा अभाव

चेन्नईतील डायबेटिस स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी सांगितले की, ग्रामीण भारतात बहुसंख्य लोकांना अजूनही हायपरटेन्शन आजाराबाबत फारशी माहिती नाही. जरी तपासणी शिबिर चालू असले, तरी ते हायपरटेन्शन असलेल्यांसाठी आहे हे त्यांना ठावून नाही, त्यामुळे अशा शिबिरांमध्ये कोणी जात नाही. यात अनेक जण आपल्याला हा आजार होणार नाही या भ्रमात असतात. कारण याची लक्षणे सहसा दिसत नाहीत. त्यामुळेच अनेकांना निदान होऊनही वेळीच उपचार मिळत नाहीत.

अनेकदा इतर आजारांवरील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर हायपरटेन्शनचे निदान होते, अशावेळी आरोग्य स्थिती अधिक गुंतागुंतीची होते. यात अधिक चिंतेची बाब म्हणजे निदान झालेले रुग्ण वेळेवर औषधे घेण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी जोपर्यंत आरोग्य स्थिती गंभीर होत नाही, तोपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यामुळे हृदय खराब होते किंवा मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे होणारे शारीरिक नुकसान कधीही भरून काढता येत नाही, अशी माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ. राकेश यादव यांनी दिली.

इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह (IHCI) हायपरटेन्शनसंबंधित लोकांची तपासणी करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारांसाठी राबवलेला एक सरकारी उपक्रम आहे, ज्यामध्ये आता २७ राज्यांमधील हायपरटेन्शनचा त्रास असलेल्या ५.८ दशलक्ष लोकांची नोंदणी झाली आहे. पण, या उपक्रमात ब्लड प्रेशर औषधाच्या खरेदीशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे बहुतांश लोक पुन्हा उपचारांसाठी केंद्राकडे परतले नाहीत.

पण २०२० पर्यंत परिस्थिती सुधारली. २०२० पर्यंत IHCI ने हे सुनिश्चित केले होते की, ७० टक्क्यांहून अधिक आरोग्य सेवा सुविधांनी प्रोटोकॉल औषधांचा एक महिन्याचा साठा सुनिश्चित केला होता; यामुळे १० टक्क्यांहून कमी लोकांनाच फक्त स्टॉक-आउट्सचा सामना करावा लागला.

उदाहरणार्थ, चार वर्षांमध्ये अम्लोडिपिनच्या खरेदीत लक्षणीय वाढ दिसून आली. पंजाबमध्ये २०१८-१९ मध्ये ५.१ दशलक्ष टॅब्लेटची संख्या २०२०-२१ मध्ये ३६ दशलक्ष झाली. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात १२ दशलक्ष वरून ३७ दशलक्ष, केरळमध्ये ४३ दशलक्ष वरून ६७ दशलक्ष, महाराष्ट्रात २३ दशलक्ष वरून १४३ दशलक्ष आणि तेलंगणात ४४ दशलक्ष वरून २०९ दशलक्ष इतकी वाढ दिसून आली. औषधांच्या पुरेशा आणि अविरत उपलब्धतेमुळे, १८ हजारांहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रांवर या कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करणे शक्य झाले आहे.

हायपरटेन्शन आजार रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?

डॉ. यादव यांच्या माहितीनुसार, ही तपासणी वयाच्या २० किंवा ३० व्या वर्षी केली जाते. पण, दर दहा वर्षांनी आणि तुम्ही पन्नास वर्षांचे झाल्यावर दर पाच वर्षांनी अशीच तपासणी सुरू ठेवा. निदानावर औषधोपचार सुरू ठेवा. पुढील नुकसान टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. आजकाल मॉनिटरिंग तितकेच महत्त्वाचे आहे, यासाठी तुम्ही ८०० ते ९०० रुपयांमध्ये चांगला डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर खरेदी करा.

देशात १८.८३ कोटी लोकांना उच्च रक्तदाब; ४६ लाख मृत्यू रोखण्याचे भारतासमोर आव्हान

डॉ. रेड्डी यांनी आहाराबद्दल बोलताना सांगितले की, लोकांनी अन्नातील मीठाचे सेवन कमी करत फळे आणि भाज्यांचा वापर वाढवायला पाहिजे. (ज्यामध्ये रक्तदाब कमी करणारे पोटॅशियम असते). अल्कोहोलचे सेवन टाळले पाहिजे किंवा खूप कमी केले पाहिजे, कारण ते हायपरटेन्शन वाढवते किंवा कायम ठेवते यामुळे गुंतागुंत अधिक वाढते. शारीरिक हालचाली, झोपेच्या चांगल्या सवयी, वायू प्रदूषणाचा कमी संपर्क; यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होईल, तसेच योग, ध्यान आणि संगीत यांसारख्या ताण-तणावांना तोंड देण्याच्या पद्धतीस मदत करतील.

डॉ. रेड्डी यांनी म्हटले की, भविष्यात आरोग्य व्यवस्था निरोगी ठेवण्यासाठी आत्तापासून काळजी घेणे महत्वाचे आहे. यात देशातील हायपरटेन्शन आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी आशा आणि ANM सारखे तंत्रज्ञान सक्षम फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्सची खूप मदत होऊ शकतो. यात स्क्रीनिंग आणि इतर गोष्टींच्या मदतीने घराघरात जाऊन हायपरटेन्शनच्या रुग्णांची माहिती गोळी करू शकता. यावर चेन्नईतील डायबेटीस स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष, डॉ. व्ही. मोहन यांनी तामिळनाडूमधील एका आरोग्य तपासणीसंदर्भातील उपक्रमावर प्रकाश टाकत म्हणाले की, या उपक्रमात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करतात.