व्हर्जिनिटी म्हणजे कौमार्य गमावणे हे बऱ्याचदा अनेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जाते. पण, त्यामुळे लोकांना नेहमीच आनंद किंवा मुक्तता मिळत नाही. कधीकधी त्यामुळे अपराधीपणा, पश्चात्ताप किंवा दुःख यांसारख्या अनपेक्षित भावना येऊ शकतात.”
अभिनेता रघु रामने २१ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावल्यानंतर खूप अस्वस्थ झाल्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला. त्याने कबूल केले की, त्याला अपराधीपणाची भावना जाणवत होती, जणू काही त्याने त्याचे आणि त्याच्या जोडीदाराचे आयुष्य ‘उद्ध्वस्त’ केले आहे. अलीकडेच अन्ट्रिगर्ड पॉडकास्टमध्ये (Untriggered Podcast) त्याने खुलासा केला की, “मी २१ वर्षांचा होतो तेव्हा मी व्हर्जिनिटी गमावली. मोठी चूक केल्यासारखे मला वाटत होते. मला खूप वाईट वाटत होते. मी स्वत:बरोबर आणि इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यासारखे वाटत होते. मी २१ वर्षांचा होतो, मी इतका घाबरलो होतो की मी हे काय करून ठेवेल असे वाटत होते?
रघुच्या म्हणण्यावर प्रतिक्रिया देताना, पॉडकास्टचे होस्ट अमीनजाझ यांनी मान्य केले की, “पहिल्यांदाच लैंगिक संबंध ठेवल्यानंतर अनेकांना असेच वाटते. ही अशी भावना आहे, जी बहुतेक लोकांना पहिल्यांदा लैंगिक क्रिया केल्यानंतर जाणवते.” पण, असे का घडते?
काही लोकांना लैंगिक संबंध ठेवल्यानंतर गुंतागुंतीच्या भावनांशी का संघर्ष करावा लागतो?
पहिल्या लैंगिक अनुभवानंतर अपराधीपणा किंवा पश्चात्तापाच्या भावनांना कोणते मानसिक किंवा सांस्कृतिक घटक कारणीभूत ठरतात?
याबाबत मानसशास्त्रज्ञ अंजली गुरसाहने (Gursahaney) इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात, “आपली संस्कृती, श्रद्धा आणि संगोपन लैंगिक संबंधांबद्दलच्या आपल्या भावनांवर परिणाम करू शकते. अनेक संस्कृती आणि धर्म शिकवतात की, लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आहे, ज्यामुळे लाज किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होते. याव्यतिरिक्त, जेव्हा अनुभवाबद्दलच्या वैयक्तिक अपेक्षा भावनिक नातेसंबंधात्मक किंवा प्रतिमात्मक (symbolic) वास्तवाशी जुळत नाहीत, तर ते निराशा किंवा पश्चात्तापाचे कारण बनू शकते. जर तुम्हाला दबाव जाणवत असेल किंवा भावनिकदृष्ट्या तयार नसाल, तर लैंगिक संबंध ठेवणे ही तुमची निवड आहे असे वाटण्याऐवजी तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असल्यासारखे वाटू शकते.”
याशिवाय त्या सांगतात, “लैंगिक संबंधांमुळे अनेकदा “खोल भावनिक प्रतिक्रिया निर्माण होतात, विशेषतः एक्गझायटी अटॅचमेंट (anxious attachment) शैली असलेल्या व्यक्तींमध्ये ही प्रतिक्रिया जाणवते आणि जर त्यांच्या भावनिक गरजा नंतर पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांना त्रास किंवा काहीतरी गमावल्याची भावना येऊ शकते. शेवटी, जर एखाद्या व्यक्तीने ‘योग्य वेळेची’ किंवा ‘योग्य व्यक्ती’ची वाट पाहण्याचा दृढ विश्वास ठेवला असेल, परंतु हेतूपेक्षा लवकर कृती केली तर संज्ञानात्मक विसंगती (cognitive dissonance ) उद्भवू शकते, ज्यामुळे त्याच्या मनात संघर्ष आणि आत्म-शंका निर्माण होते.”
व्हर्जिनिटी गमावल्यानंतर स्वत:ला स्विकारण्यासाठी गुरसाहने (Gursahaney) यांनी मार्ग सुचवले आहेत.
व्हर्जिनिटी गमावल्यानंतर स्वत:ला स्वीकारण्यासाठी गुरसाहने (Gursahaney) यांनी मार्ग सुचवले आहेत.
लज्जेवर आधारित श्रद्धांना आव्हान द्या (Challenge Shame-Based Beliefs) : लैंगिक अनुभव एखाद्याचे मूल्य किंवा नैतिकता ठरवत नाहीत हे ओळखण्यास मदत होते. वारशाने मिळालेल्या श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे मुक्ततेची भावना निर्माण करू शकते.
आत्म-करुणा (Self-Compassion) : स्वत:ला दोष देण्याऐवजी, एखाद्याला हे मान्य करता येते की, “त्यांनी त्या वेळी असलेल्या ज्ञान आणि भावनांनी सर्वोत्तम निर्णय घेतला.”
तज्ज्ञांची मदत घ्या (Therapeutic Exploration): जर भावना खूप त्रासदायक असतील, तर त्या उघड करण्यासाठी थेरपिस्टची मदत घेणे उपयुक्त ठरू शकते.
डायरी लिहा व पुन्हा वाचून चिंतन करा (Journaling and Reflection) : निर्णय न घेता अनुभव आणि भावनांबद्दल लिहिणे ही निरोगी पद्धतीने आपल्या भावना समजून घेण्यास मदत करू शकते.
माइंडफुलनेस आणि स्वीकृती (Mindfulness and Acceptance): माइंडफुलनेस पद्धतीचा वापर केल्याने नकारात्मक विचारांमध्ये अडकण्याऐवजी भावनांचा स्वीकार करण्यास मदत करू शकते.