मिठाच्या वापरामुळे जेवणाची चव वाढते. पण, हेच मीठ आपल्या शरीरासाठी एक प्रकारे व्हाईट पॉयझन म्हणून काम करत आहे. आहारात जास्त मिठाचं सेवन केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये भारतातील लोक दररोज जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मिठाचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. म्हणजे एक व्यक्ती रोज पाच ग्रॅमऐवजी आठ ग्रॅम मिठाचे सेवन करत आहे. याचा अर्थ एक व्यक्ती दिवसाला तीन ग्रॅम अतिरिक्त मिठाचे सेवन करत आहे. याच विषयावर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉ. माथूर आणि डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, पुरुष (८.९ ग्रॅम), नोकरदार लोक (८.६ ग्रॅम) आणि तंबाखूचे सेवन करणारे (८.३ ग्रॅम) मिठाचे सेवन करत आहेत. तसेच लठ्ठ व्यक्ती (९.२ ग्रॅम) आणि उच्च रक्तदाब (८.५ ग्रॅम) असलेल्या लोकही सरासरी वापरापेक्षा जास्त मिठाचे सेवन करत आहेत.

onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
significant reduction in infant mortality in the state
राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट!

एखाद्या व्यक्तीने मिठाचे सेवन पाच ग्रॅमपर्यंत कमी केल्यास त्याला उच्च रक्तदाबाचा धोका २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ आणि घराबाहेर शिजवलेले पदार्थ खाणेदेखील कमी केले पाहिजे, असे उपाय ICMR-नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चचे संचालक आणि अभ्यासाचे डॉ. प्रशांत माथूर यांनी सुचवले.

आहारातून मीठ कमी करण्यासाठी काय करावे?

डॉ. माथूर यांच्या माहितीनुसार, दररोज मिठाचे सेवन कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे. आपल्यापैकी बरेच जण सवयीनुसार मिठाचा वापर करतात. पण, यापुढे मिठाचा वापर करताना तो मोजून मापून केला पाहिजे. पापड, चटणी, लोणचं यांचा वापर कमी केला पाहिजे. पॅकेज फूडच्या लेबलवरील मिठाचे प्रमाण तपासून ते पदार्थ खाल्ले पाहिजे. तसेच अन्नपदार्थांमध्ये अतिरिक्त मीठ वापरणे टाळले पाहिजे. पण, एखाद्या व्यक्तीने जास्त प्रमाणात मीठ सेवन करणे नुकसानकारक असले तरी शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा मिठाचे सेवन कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

आपण खाताना टाळल्या पाहिजेत ‘या’ चुका

अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी जंक फूड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सचे सेवन पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. कारण एका प्रौढ व्यक्तीला एका दिवसात जितक्या मिठाची गरज असते, तितके मीठ एका चिप्सच्या पॅकेटमध्ये असते. इन्स्टंट नूडल्स आणि प्री-मिक्‍स्ड फूडमध्येही मिठाचे प्रमाण अधिक असते. यामुळे तुम्ही रोजच्या खाण्यात जेवणासह या पदार्थांचा समावेश करत दररोज मिठाचा ओव्हरडोस घेत आहात.

काही पदार्थ असे असतात, जे चवीला अगदी खारट-गोड असतात, कारण त्यामध्ये साखर आणि मीठ दोन्हीचे प्रमाण अधिक असते. याशिवाय फ्रूट दही, कॉर्नफ्लेक्स, कोको आणि चॉकलेट आणि कार्बोनेटेड शीतपेये, गोठवलेले पदार्थ यांसारख्या खाद्यपदार्थांमध्येही अदृश्य मीठ असते, ज्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. या सर्व पदार्थांमुळे किशोरवयीन आणि तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होत आहे. ज्यामुळे ह्रदयावरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत ह्रदयविकाराचा झटका येण्यापासून वाचण्यासाठी मिठाचे सेवन टाळा आणि योग्य आहाराची निवड करा, असे डॉ. रोहतगी सांगतात.

आपण दुसरी सर्वात सामान्य चूक करतो ती म्हणजे व्यवसायाकरित्या बनवलेल्या कमी सोडियमयुक्त मीठ पॅकेट्स वापरतो. पण, या पॅकेटमध्ये मिठाचा एक भाग पोटॅशियममध्ये बदलेला असतो. पण, आपण ते सुरक्षित असल्याचे समजून सेवन करतो. परंतु, जास्त पोटॅशियम हृदयाच्या कार्यात अडथळा आणू शकते तसेच, हिमालयीन किंवा कोणत्याही प्रकारच्या सेंधव मिठातही तेवढेच सोडियम असते, असेही डॉ. रोहतगी म्हणाले.

मीठाला पर्याय आहेत का?

लिंबू आणि त्यावरील साल यांसारखे नैसर्गिक स्त्रोत मीठाला पर्याय आहेत, जे एक तिखट प्रभाव देतात आणि रक्तदाब कमी करण्यासदेखील मदत करतात. ठेचलेला लसूण, ओवा, काळी मिरी आणि मसाले सॅलडमध्ये चांगले कव्हरेज देतात. बेकिंग पावडरमध्ये अधिक प्रमाणात सोडियम असते, त्यामुळे त्याचा वापर टाळत तुम्ही यीस्ट पाउडरचा वापर करा. डाळ आणि करी खाताना, भात, कोशिंबीर, पोळी आणि दह्यात मीठ टाकू नका, असेही डॉ. रोहतगी म्हणतात.

मिठाची लालसा कशी कमी करावी?

तासाभरात तुम्ही जितके पाणी पिता ज्यातून शरीरातील अतिरिक्त मीठ निघून जाते. अशावेळी मीठ खाण्याची लालसा कमी करण्यासाठी डॉ. रोहतगी यांनी सल्ला दिला की, तुम्ही चुना, संत्री आणि पुदिना मिसळलेले पाणी पिऊ शकता. मिठाच्या लालसेमुळे तुम्हाला तहान लावते जे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या कमतरतेचे संकेत असतात, त्यामुळे अशा परिस्थितीत काळजी घेणे गरजेचे आहे.

मिठाची भूक कशी कमी करावी?

अगदी लहानपणापासून चवीने खात असलेला पदार्थ कधी तुमच्या आहाराचा भाग बनून जातो सांगता येत नाही, म्हणून डॉक्टर लहान मुलांना त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात मीठ आणि साखर न देण्याचा सल्ला देतात. अशावेळी बाहेरील पॅकेट फूड न देता, घरी शिजवलेले पदार्थ प्युरी करून देण्याचाही सल्ला देतात. याशिवाय सॉल्टेड नट्स, चिप्स आणि इतर खाण्याच्या वस्तू किराणा मालाच्या सामानात लिहू नका, तसेच ऑनलाइन ऑर्डर केलेले जेवण मुलांना देऊ नका, असही डॉ. रोहतगी सुचवतात.