If YOu Don’t Drink Milk : कॅल्शियमचे सेवन शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. कॅल्शियमची मात्रा वाढविण्यासाठी अनेकदा आपल्याला नियमित दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण- दूध कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे. काही लोकांना दूध प्यायला आवडत नाही. त्यामुळे ते अनेकदा दूध पिणे टाळतात. अशा लोकांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते. जर तुम्हीसुद्धा दूध पीत नसाल, तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवू शकता. पण, त्यापूर्वी कॅल्शियम आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे, ते जाणून घेऊ या. या संदर्भात नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट वर्षा गोरे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली. त्या सांगतात, “हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाची भूमिका बजावते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. गोरे सांगतात, “साधारणपणे १००० ते १३००० मिलिग्रॅमपर्यंत तुम्ही नियमितपणे कॅल्शियमचे सेवन करायला पाहिजे. दूध हा कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे. एक कप दुधामध्ये ३०० मिलिग्रॅम कॅल्शियम असते.” त्या पुढे सांगतात, “शरीराची दुधातून कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता ही जास्त आहे. कारण- दुधात लॅक्टोज आणि इतर पोषक घटक जास्त असतात. त्याशिवाय दुधामध्ये जीवनसत्त्व ड असते; जे कॅल्शियम शोषून घेण्याचे प्रमाण वाढवते.”

नियमित दूध प्यायल्याने स्त्रियांना होणारा ऑस्टिओपोरोसिसचा त्रास टाळता येतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे कमकुवत होणे. स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. दुधातील कॅल्शियमच्या सेवनामुळे हाडांना प्रोत्साहन मिळते. शरीर निरोगी आणि संतुलित राहते.

हेही वाचा : Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाविषयी हे आठ गैरसमज तुम्हालाही आहेत का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

काही लोक दुधाचे सेवन करीत नाही, त्यांच्यासाठी कॅल्शियमचे अन्य पर्याय जाणून घेऊ.

१. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न करणे म्हणजे कॅल्शियमशी तडजोड करणे, असे नाही. दूध न पिता, तुम्ही कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करू शकता. बदाम, सोया किंवा तांदळाचे दूध तुम्ही पिऊ शकता. या दुधामध्ये गाईच्या दुधाएवढी कॅल्शियमची मात्रा असते.

२. हिरव्या पालेभाज्या, चांगल्या दर्जाचा संत्र्याचा रस, अ‍ॅप्रिकोट, सोयाबीनच्या दुधाचे पनीर हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

३. काही प्रकारचे मासे; जसे शेलफिशमध्येसुद्धा कॅल्शियमची मात्रा अधिक असते.

वरील पर्याय कॅल्शियमची गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, त्याचबरोबर संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. या पर्यायांसह इतर पौष्टिक घटक हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि जे लोक दूध पीत नाहीत, त्यांच्या शरीराला कॅल्शियम पुरवतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you do not like drinking milk then how can you increase calcium level know experts told best options to fulfill your calcium needs ndj
Show comments