Should You Eat Oranges Everyday In Winter: हिवाळ्यातील थंड तापमानात शरीराचे संतुलन राखण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. आहारातील संतुलन राखताना हंगामी फळे व भाज्यांचे सेवन करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. थंडीच्या दिवसांमध्ये संत्र्यांची बाजारातील विक्री वाढते. तुम्ही जर मुंबई लोकलमधून प्रवास करत असाल तर तुम्हालाही आतापर्यंत संत्र्याच्या पाट्या घेऊन विक्रीसाठी ट्रेनमध्ये चढणारे विक्रेते दिसले असतील, बाजारात सुद्धा सफरचंद, डाळिंबाच्या जोडीने संत्र्याची संख्या वाढलेली दिसत असेल. अशावेळी हिवाळ्यात दररोज संत्र्याचा आस्वाद घेणे खरोखरच फायद्याचे आहे का किंवा यामुळे नेमका तुमच्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो हे आपण आज तज्ज्ञांच्या मते जाणून घेणार आहोत.

डॉ संजय कुमार, सल्लागार जनरल फिजिशियन, सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटल,यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात दररोज संत्र्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी सारखे आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात मिळू शकतात, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि सर्दी आणि तापापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान

कोरड्या हिवाळ्यात संत्र्यांपासून मिळणारे हायड्रेशन तुमच्या त्वचेलाही फायदेशीर ठरते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचा महत्त्वपूर्ण साठा असतो जो त्वचेत कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतो. संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात जी संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देतात.

फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्ससह अशा विविध प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती, शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात, यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण मिळते. अँटिऑक्सिडंट-समृद्ध संत्री पेशींच्या आरोग्यासाठी योगदान देतात आणि दीर्घकालीन आजारांना प्रतिबंध करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांच्या माहितीनुसार, हिवाळ्यात संत्र्याचे नियमित सेवन केल्याने चांगले हायड्रेशन मिळण्यास हातभार लागतो, कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील द्रवपदार्थाची पातळी संतुलित राखण्यास मदत होते. शिवाय संत्र्यातील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.

हे ही वाचा<<डिझायनर रोहित बाल हृदय बंद पडल्याने व्हेंटिलेटरवर; अशी स्थिती का उद्भवते, प्राथमिक लक्षणे कशी ओळखाल? 

हिवाळ्यात जास्त संत्री खाल्ल्याने काही तोटे आहेत का?

संत्री साधारणपणे आरोग्यदायी असली तरी, डॉ कुमार यांच्या मते, जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्यांच्यातील फायबर पचनास समस्या निर्माण करू शकतात. याव्यतिरिक्त, लिंबूवर्गीय सत्वांची ऍलर्जी किंवा किडनीच्या समस्यांसारख्या काही वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींनी त्यांचे सेवन कमी केले पाहिजे.संत्र्यांच्या आम्ल घटकांमुळे दातांच्या समस्यांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सिंघवाल यांच्या मते संत्र्याचे सेवन केल्यावर तोंडी स्वच्छता राखणे आवश्यक आहे.