साखर हा आपल्या दररोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे. गोड पदार्थांपासून तर विविध पदार्थांमध्ये आपण साखरेचा उपयोग करतो पण साखरेचे अतिसेवन हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते, हे विसरता कामा नये. साखरेच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाचे आजार इत्यादी दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे साखरेचे कमी सेवन करणे, महत्त्वाचे आहे.

अशा वेळी पूर्णपणे साखरचे सेवन बंद करावे का? आणि महिनाभर साखर खाल्ली नाही तर शरीरावर खरंच फरक दिसून येणार का? या संदर्भात प्रायमस सुपर स्पेशिॲलिटी हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ अंकिता घोषाल बिष्ट यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली. अंकिता घोषाल बिष्ट सांगतात, ” जर तुम्ही एक महिना साखर खाल्ली नाही तर तुमच्या शरीरात खूप बदल दिसू शकतो.”

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
Ginger benefits in winter This winter superfood will help keep the body warm and healthy
आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

हेही वाचा : Heart Attack : हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणे नव्हे! ही लक्षणेही जाणून घ्या; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… 

१. रक्तातील साखरेची पातळी सुधारणार – जर तुम्ही एक महिना साखरेचे सेवन केले नाही तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते, ज्याचा थेट प्रभाव तुमच्या ऊर्जेवर आणि मूडवर दिसून येतो.

२. वजन कमी होते – साखरेतून आपल्याला सर्वात जास्त कॅलरी मिळतात. जर काही दिवस साखर खाल्ली नाही तर तुम्हाला वजन कमी झाल्याचा अनुभव येईल.

३. क्रेव्हिंग कमी होणे – साखर हे एक व्यसन आहे. जर तुम्ही साखर एक महिना खाल्ली नाही तर तुम्हाला कोणतेही गोड पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग (लालसा) होणार नाही.

४. एनर्जी लेव्हल वाढते – जर तुम्ही साखर खाणे सोडले तर ऊर्जेसाठी तुम्हाला कमी साखरेची आवश्यकता भासते, ज्यामुळे एनर्जी लेव्हल अधिक वेळ टिकून राहणार.

५. दात हेल्दी राहणार – दात खराब होण्यामागील महत्त्वाचे एक कारण हे साखर होय. जर तुम्ही साखर खाल्ली नाही तर दात किडणार नाही.

६. त्वचेचे आरोग्य सुधारू शकते – साखरेच्या कमी सेवनामुळे त्वचा स्वच्छ आणि त्वचेवरील डाग कमी होऊ शकतात.

मीरा रोडस्थित वोक-हार्ट हॉस्पिटल्सच्या इंटर्नल मेडिसीनचे सल्लागार डॉ. अनिकेत मुळे ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगतात, “साखरेचे कमी सेवन करणे हे रक्तातील साखर आणि इन्सुलिन पातळी कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे तुम्हाला ट्रायग्लिसेराइड ( triglycerides) होण्याची शक्यता असते. हा एक प्रकारचा फॅट असतो, जो रक्तात निर्माण होतो. जर तुम्ही साखरेचे सेवन कमी केले तर तुम्ही कॅलरी आणि वजन कमी करू शकता, ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारू शकते.”
डॉ. मुळे पुढे सांगतात, ” जर तुम्ही एक महिना साखरेचे सेवन केले नाही आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही साखर खाणे सुरू केले तर तुम्ही मिळवलेले सर्व फायदे गमावू शकता. “

हेही वाचा : Uric acid and Gout : संधिरोग होण्यामागे खरंच युरिक अ‍ॅसिड कारणीभूत? तज्ज्ञांनी सांगितले खरे कारण..

यावरच बंगळूरु येथील मणिपाल हॉस्पिटलच्या एंडोक्रायनोलॉजिस्ट, डायबिटीज आणि थायरॉइडचे सल्लागार डॉ. अभिजीत भोगराज सांगतात, ” एक महिना साखरेचे सेवन बंद करण्याचे अनेक फायदे आहेत पण हे फायदे कमी कालावधीसाठी असतात, जर तुम्हाला लॉन्ग टर्म फायदे हवे असतील तर तुम्हाला तुमचे ध्येयही लॉन्ग टर्म ठेवावे लागेल.”

आहारतज्ज्ञ अंकिता घोषाल बिष्ट सांगतात, ” एका महिन्यासाठी साखरेचे सेवन करू नये, हा सल्ला देणे तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. अनेक लोकांना हेल्दी राहण्यासाठी साखरेचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो पण आपल्या आहारातून पूर्णपणे साखर काढून टाकणे, हे एक प्रकारचे आव्हान ठरू शकते. त्यामुळे तुम्ही असा चांगला पर्याय शोधणे गरजेचे आहे. “

हेही वाचा : मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम आणि अक्रोड फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये साखर न घेण्याचा विचार करीत असाल तर आहारतज्ज्ञांनी तुम्हाला त्याऐवजी चांगले पर्याय सांगितले आहेत.

नैसर्गिक गोड पदार्थ (Natural sweeteners) – स्टेविआ, मोन्क फ्रुट एक्स्ट्रॅक्ट आणि एरिथ्रीटॉल (stevia, monk fruit extract, and erythritol) या पदार्थांमध्ये कॅलरीचे कमी प्रमाण असते. या नैसर्गिक गोड पदार्थांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम होतो.

ताजे फळ (Fresh fruits) – फळांमध्ये मिनरल्स, व्हिटामिन्स आणि फायबरबरोबरच नैसर्गिक साखर असते. फळे तुमची गोड खाण्याची इच्छा तृप्त करतात आणि फळांपासून तुमच्या शरीराला पोषकतत्त्वेही मिळतात.

मसाले (Spices) – दालचिनी, जायफळ आणि व्हॅनिलासारखे मसाले तुमच्या आहारात साखरेशिवाय गोडवा आणू शकतात.

डार्क चॉकलेट (Dark chocolate) – डार्क चॉकलेटमध्ये मिल्क चॉकलेटच्या तुलनेत कमी साखर असते.

साखर समाविष्ट नसलेली पेये (Unsweetened beverages) – ज्यूस किंवा सोड्यापेक्षा पाणी, हर्बल चहा, साखर नसलेली कॉफी पिणे, नेहमी चांगले आहे.

अंकिता घोषाल बिष्ट सांगतात, या हेल्दी पर्यायांपेक्षा स्वत:वर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. फूड लेबल वाचणे, पदार्थांमध्ये असणारी साखरेची पातळी ओळखणे, खूप गरजेचे आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा डाएट संतुलित ठेवू शकता. तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य निर्णय घेऊ शकता. ‘

डिस्क्लेमर: लेखातील माहिती, सल्ला प्रत्येकाला जसाच्या तसा लागू होत नसल्याने, थेट आचरणात न आणता वैद्यकीय सल्ला घ्यावा.