What Happens If You Skip Oil For One Month: रिफाइंड ऑइल हा भारतीय स्वयंपाकघरांमध्ये आढळणारा एक सामान्य आणि महत्त्वाचा घटक आहे. भजी- वडे टाळण्यापासून ते डाळ- भाज्यांना फोडणी देण्यापर्यंत, पोळ्यांमध्ये ते अगदी नूडल्स- पास्ता सगळ्यासाठी तेलाचा वापर होतोच. काही वेळा आरोग्याच्या विविध परिस्थितीनुसार कमी अधिक प्रमाणात का होईना पण तेल आपल्या आहारात समाविष्ट असते. पण तेलाच्या वापराचं प्रमाण चुकलं/ वाढलं तर मात्र हे अनेक आजारांना आयतं आमंत्रण ठरू शकतं. लठ्ठपणा, हृदयविकार आणि जळजळ या समस्या तर तेलाच्या अतिवापराला जोडून लगेच वाढू शकतात. तेलाच्या वापराने समस्या उद्भवत असतील तर तेल वापरणे बंद केल्यावर हे त्रास सुद्धा बंद होतील का असा प्रश्न आम्हाला पडला.

समजा आपण एका महिन्यासाठी पूर्णपणे तेलाचा वापर बंद केला तर कोलेस्ट्रॉल, वजन, हृदयविकाराचा धोका हे सर्व कमी होऊ शकेल का? याच प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आपण आज नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जयपूरच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ देवेंद्र श्रीमल यांचे मार्गदर्शन घेणार आहोत.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…

डॉ. श्रीमल सांगतात की, “परिष्कृत तेल, म्हणजेच रिफाईंड ऑइल यामध्ये खराब फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जे वजन वाढण्यास, जळजळ होण्यास आणि हृदयविकाराचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, या तेलाच्या वापराचे प्रमाण कमी केल्यास हे त्रास सुद्धा कमी करता येऊ शकतात. “यालाच सहमती दर्शवत पोषणतज्ज्ञ नुपूर पाटील यांनी सुद्धा तेलाचा वापर बंद केल्यावर शरीरात दिसून येणाऱ्या बदलांची यादी शेअर केली आहे.

एक महिना तेलाचा वापर बंद केल्यास शरीरात दिसणारे बदल

फायदे:

1)हृदयाचे आरोग्य सुधारते: रिफाईंड ऑईल, विशेषत: ज्यात ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात, हे हृदयरोगास कारणीभूत ठरू शकतात. या तेलांचा आहारातील वापर बंद केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.

2) वजन व्यवस्थापन: रिफाईंड ऑईलमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. अगदी साधं गणित जरी वापरलं तरी कमी तेल म्हणजे कमी कॅलरी, कमी कॅलरीज म्हणजे वजनावर नियंत्रण हे समीकरण अगदी सरळ आहे.

3) रक्तातील साखरेची संतुलित पातळी: रिफाईंड ऑईल इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकते, परिणामी तेलाचा वापर थांबवल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यात मदत होऊ शकते.

4) स्वच्छ त्वचा: आहारातून तेल कमी करणे किंवा काढून टाकल्याने त्वचा विकार किंवा त्वचेसंबंधित सामान्य त्रास सुद्धा कमी होतात. तेल हे जळजळ वाढवून शरीरात उष्णता तयार करते यामुळे त्वचेवर अनेकदा फोड येणे, पिंपल असे त्रास वाढतात.

5)पचनप्रक्रियेचा वेग वाढणे: उच्च प्रक्रिया केलेल्या तेलांमुळे पचनास त्रास होऊ शकतो. तेलाचा वापर कमी केल्याने पचनक्रिया सुधारू शकते.

तोटे:

मात्र डॉ. श्रीमल या सांगतात की, “तेल वगळल्यावर सुद्धा आपण आवश्यक फॅटी ऍसिड जसे की ओमेगा-३ आणि ओमेगा-६ चे सेवन करत आहात हे सुनिश्चित करा. हे फॅटी ऍसिडस् विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या कालावधीत संतुलित आहार राखण्यासाठी एवोकॅडो, नट्स, बिया आणि मासे यांसारखे निरोगी चरबीचे स्रोत आहारात समाविष्ट करू शकता.

तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, एका महिन्यासाठी तेल पूर्णपणे सोडून देणे हा बर्‍याच लोकांसाठी एक फायदेशीर प्रयोग असू शकतो कारण यामुळे तुम्हाला तुमच्या अस्वास्थ्यकर चरबीचे सेवन कमी करता येते. असे बदल करण्यापूर्वी, आरोग्यसेवा व्यावसायिक किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. लक्षात ठेवा विविध शारीरिक कार्यांसाठी फॅट्स आवश्यक असतात, त्यामुळे तुमच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही रिफाईंड तेलांच्या जागी आरोग्यदायी पर्याय वापरत आहात याची खात्री करा

तुम्ही तुमच्या आहारातून रिफाईंड तेल पूर्णपणे काढून टाकण्याचा विचार करत असाल, तर पाटील यांनी सुचवलेले काही आरोग्यदायी पर्याय सुद्धा पाहून घ्या.

ऑलिव्ह ऑईल: एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.

अवोकॅडो तेल: अॅव्होकॅडो तेल हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे आणखी एक चांगले स्त्रोत आहे.

नारळ तेल: व्हर्जिन कोकोनट ऑइल (नारळ तेल) मध्ये मध्यम-साखळी ट्रायग्लिसराइड्स (MCTs) असतात आणि त्याची चव वेगळी असते.

नट आणि बियाणे तेल: अक्रोड तेल, फ्लेक्ससीड तेल आणि तिळाचे तेल हे आवश्यक फॅटी ऍसिडचे चांगले स्त्रोत आहेत.

हे ही वाचा<< एक महिना मैदा न खाल्ल्यास वजन, शुगर खरंच कमी होते का? मैदा बंद करण्याचे शरीरासाठी तोटे व फायदे वाचा

लोणी किंवा तूप: जे दुग्धजन्य पदार्थ खातात त्यांच्यासाठी मध्यम प्रमाणात लोणी किंवा क्लॅरिफाईड बटर (तूप) वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

नट बटर: बदाम बटर किंवा पीनट बटर सारखे नैसर्गिक नट बटर स्प्रेड म्हणून वापरले जाऊ शकते/

लक्षात घ्या, तुमच्या आहारातून फॅट्स पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी संतुलित आहार राखणे आणि विविध प्रकारच्या निरोगी फॅट्सचा समावेश हे जास्त फायदेशीर ठरते.