Tea With Cigarette Side Effects: अनेकदा नकळत काही सवयी माणसांच्या जीवनशैलीचा भाग बनतात. मात्र, या सवयींचा थेट नकारात्मक परिणाम आरोग्यावर होत असतो. चहासोबत सिगारेट पिणं, हे अशा सवयींपैकीच एक आहे. चहा आणि धुम्रपानाचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. रिपोर्ट्सनुसार, जर चहा पिताना धुम्रपान आणि दारुचं व्यसन करत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण या सेवनामुळं अन्ननलीकेच्या कर्करोगाचा धोका ३० टक्क्यांपर्यंत वाढतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न नलीकेच्या पेशी कमकुवत होऊ शकतात

जर्नल अन्नल्स ऑफ इंटरनल मेडिसीनने सादर केलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, गरम चहामुळं अन्ननलीकेच्या पेशी कमकुवत होतात. जर तुम्ही चहा आणि सिगारेटचं एकत्रित सेवन केलं, तर तुमच्या पेशी डॅमेज होण्याचा धोका २ टक्क्यांनी वाढतो. परिणामी, तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका अधिक वाढतो. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चहामध्ये कॅफीन असतं. यामुळे पोटात एका विशिष्ट प्रकारचा अॅसिड निर्माण होतं. याचा फायदा पचनक्रियेसाठी होतो, पण कॅफिन जास्त प्रमाणात पोटात गेल्यावर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसंच सिगारेटमध्ये निकोटिन असतं. जर काही न खाता चहा आणि सिगारेटचं एकत्रित सेवन केलं, तर तुम्हाला डोकेदुखी, चक्कर आल्यासारखं वाटू शकतं.

नक्की वाचा – आहारवेद : बीजांडकोशाची सूज घालविणारे कारले

एक सिगारेट पिणंही धोकादायक?

गुरुग्रामच्या पारस रुग्णालयातील कार्डियोलॉजी डिपार्टमेंटचे डॉ. अमित भूषण शर्मा यांनी एका व्हिडीओत म्हटलंय, मला नेहमी अनेक लोकं विचारतात की, दिवसभरात एका सिगारेटचं सेवन केल्यावर काय नुकसान होतं? मी त्यांना सांगतो, नक्कीच सिगारेट पिण्यामुळं तुमचं नुकसान होईल. एक सिगारेट पिणाऱ्या माणसालाही ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट स्ट्रोकची शक्यता वाढते. रिसर्चच्या माहितीनुसार, दिवसभरात एक सिगारेट पिणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ७ टक्क्यांहून अधिक असते. जर तुम्ही सिगारेटचं सेवन नेहमी करत असाल, तर तुमचं आयुष्य १७ वर्षांनी कमी होऊ शकतो.

वर्षभर धुम्रपान केल्यावर आरोग्यावर कोणता परिणाम होतो?

डॉ. अमित भूषण यांनी दिलेली माहिती अशी की, लोक अधूनमधून धुम्रपान करणं सोडून देतात. याचा काही विशेष फायदा होत नाही. जर तुम्ही धुम्रापान करणं कायमचं सोडलं तर, तुमच्या आरोग्याला याचा फायदा नक्कीच होतो. तसंच तुमच्या शरीरावर याचा कोणत्याही प्रकारचा घातक परिणाम होत नाही. विशेषत: मेंदू आणि हृदय निरोगी राहतं.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you smoke while drinking tea or coffee many side effects on your health according to health research nss
Show comments