What Happens When You Stop Drinking Alcohol One Month: मित्र आणि सहकाऱ्यांसह एखाद्या कार्यक्रमात किंवा खास औचित्य असल्यास दारू पिणे आपल्यापैकी अनेकांसाठी सामान्य आहे. परंतु जर हे “औचित्य” दर दोन-तीन दिवसात एकदा येत असेल तर मात्र शरीरावर व तितकाच मनावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो. याची सवय कधी व्यसनात बदलू शकते हे ही अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. डॉ संजय गुप्ता, मणिपाल हॉस्पिटल्सचे सल्लागार, म्हणतात की सोशल ड्रिंकिंग म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा मद्यपान करणे. तुम्हाला अतिवजन, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असे त्रास नसल्यास इतके मद्यपान तुमच्या जीवाला धोका ठरण्याची शक्यता कमी असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ श्रेय श्रीवास्तव, एमडी, अंतर्गत औषध आणि आंतरिक औषध विभाग, शारदा हॉस्पिटल, येथील सहायक प्राध्यापक यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “दररोज ५०० मिली पेक्षा जास्त अल्कोहोलचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत वाईट आहे.” यूएसएच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अ‍ॅब्यूज अँड अल्कोहोलिझमच्या मते, जर तुम्ही दिवसातून पाचपेक्षा जास्त किंवा आठवड्यातून १५ किंवा त्याहून अधिक पेये घेत असाल तर तुम्ही मद्यपानाच्या आहारी गेला आहात असे समजायला हवे.

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संस्थापक-संचालक डॉ शुचिन बजाज यांच्या माहितीनुसार, तुम्ही मद्यपान करत असाल तर वैयक्तिक आरोग्य, कौटुंबिक आजारांचा इतिहास यासारख्या घटकांचा विचार केला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक परिस्थितीवर, नातेसंबंधांवर किंवा अल्कोहोलमुळे एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतील, तर दारू सोडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, दारू कायमची सोडण्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. मग जर तुम्ही महिनाभर दारू सोडली तर तुमच्या शरीराचे काय होईल? हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ञांशी संपर्क साधला.

जर अगोदरच एखादी व्यक्त मद्यपान करत असेल तर…

१) अल्कोहोल बंद केल्याने यकृताची स्थिती सुधारू शकते, यकृत रोगाचा धोका कमी होतो, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते, रक्तदाब कमी होतो आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

२) शरीराला डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत होऊ शकते. यामुळे वारंवार होणारा जळजळ, ऍसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो व परिणामी चांगली झोप, सुधारित एकाग्रता आणि ऊर्जा पातळीत वाढ असे फायदे होऊ शकतात.

३) दारूमुळे यकृत किंवा मूत्रपिंडाचे विकार असलेल्यांना सुधारणा जाणवू शकते.

४) डॉ गुप्ता यांच्या माहितीनुसार मात्र जर तुम्ही दीर्घकाळ मद्यपान करत असाल तर, फक्त एका महिन्यासाठी दारू सोडून दिल्याने लगेच फायदे होतील असे नाही तरीही प्रयत्न म्हणून हे चांगले आहे व त्याचा कालांतराने फायदा होऊ शकतो.

जर तुम्ही मद्यपी नसाल आणि क्वचित मद्यपान करत असाल तर…

१) दारूमुळे वजन वाढण्याचा धोका असतो त्यामुळे महिनाभर दारू पूर्ण बंद केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

२) एक महिना दारू सोडल्यास, मानसिक दृष्टीने तुमची स्थिती भक्कम होऊ शकते. कर्तृत्वाची भावना, वाढलेले आत्म-नियंत्रण शक्य होऊ शकते. यामुळे नातेसंबंध सुधारू शकतात.

३) झोपेचे गुणवत्ता सुधारल्याने तुमचा मूड उत्तम राहू शकतो व चिंता कमी होऊ शकते.

हे ही वाचा<< किती तास झोपल्याने कोलेस्ट्रॉल व रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहते? तज्ज्ञांचं उत्तर वाचा

डॉ बजाज यांनी सांगितल्याप्रमाणे, “मद्यपान हे डोके आणि मानेचे कर्करोग, अन्ननलिका कर्करोग, यकृत कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यासह विविध कर्करोगांसाठी एक ज्ञात जोखीम घटक आहे. पुरुषांमध्ये तीव्र मद्यपान करण्याची प्रवृत्ती असल्याने, त्यांच्या यकृताला झालेल्या दुखापती दीर्घकालीन असतात, त्याउलट ज्या महिला अधिक मद्यपान करतात आणि त्यांच्या यकृताला झालेल्या जखमा गंभीर असतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये दारू सोडल्यास यकृताची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you stop drinking alcohol one month body detoxification in 30 days liver growth kidney health svs
Show comments