Expired soaps side effects: लेबल्स वाचणे हे केवळ खाण्यायोग्य प्रोडक्ट्ससाठी नाही तर तुम्ही सामान्यतः तुमच्या शरीरावर वापरत असलेल्या प्रोडक्ट्ससाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक्स्पायरी आणि शेल्फ लाइफमधील फरक तुम्हाला आधीच माहीत असल्याने, तुम्ही तुमच्या शरीरावर एक्स्पायरी साबण वापरता तेव्हा काय होते, याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
“नाशवंत वस्तूंप्रमाणेच, साबण कालांतराने खराब होत नाही,” असे तज्ज्ञ म्हणतात. तथापि, त्याची “प्रभावीता” कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, ते कसे साठवले जातात आणि वापरले जातात यावरूनदेखील फरक पडू शकतो.
कॉस्मेटिक स्किन अँड होमियो क्लिनिकच्या सौंदर्यतज्ज्ञ आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. करुणा मल्होत्रा म्हणाल्या की, कालबाह्य (एक्स्पायर) झालेले साबण वापरल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. “काळाच्या ओघात साबणांची प्रभावीता कमी होऊ शकते, विशेषतः अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि घटकांचे विघटन झाल्यामुळे पीएच पातळी (pH पातळी) बदलू शकते,” असे डॉ. मल्होत्रा म्हणाले.
डॉ. मल्होत्रा यांनी पुढे सांगितले, “यामुळे त्वचेवर जळजळ, कोरडेपणा किंवा ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते, विशेषतः संवेदनशील त्वचेसाठी. शिवाय, कालबाह्य झालेल्या प्रोडक्ट्समध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशीची वाढ होऊ शकते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.”
साबण जर योग्यरित्या साठवला गेला तर त्याचा बार त्याच्या मुदतीनंतरही प्रभावी राहू शकतो. तथापि, कालांतराने त्याचा सुगंध कमी होऊ शकतो.
साबण कालबाह्य झाला आहे की नाही हे कसे ठरवायचे?
तुमच्या साबणाच्या बारची मुदत संपली आहे की नाही हे ठरवण्यासाठी डॉ. मल्होत्रा म्हणाले की, तुम्ही रंग फिकट होणे आणि सुगंध कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष द्यावे. जर तुमच्या साबणाच्या बारमध्ये बुरशीची लक्षणे दिसली तर तो साबण टाकून देणे चांगले.
जोखीम कमी करण्यासाठी डॉ. मल्होत्रा यांनी “त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी सौम्य, सुगंध नसलेले साबण वापरण्याची आणि कालबाह्य झालेले प्रोडक्ट्स टाकून देण्याची” शिफारस केली.
डॉ. मल्होत्रा म्हणाले की, बुरशीजन्य संसर्ग किंवा कोरडेपणा यासारख्या त्वचेच्या आजारांना बळी पडणाऱ्या व्यक्तींसाठी, “जुनी किंवा खराब झालेले प्रोडक्ट्स टाळणे अधिक महत्त्वाचे बनते.”
साबण योग्यरित्या साठवल्याने त्याचे आयुष्य वाढू शकते. डॉ. मल्होत्रा यांनी तो कमी आर्द्रतेच्या ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे बुरशीची वाढ रोखण्यास मदत होते.