आपण नेहमी आपल्या वयाचाच जास्त विचार करतो. कधी तुम्ही तुमच्या शरीरातील अवयवांच्या वयाचा विचार केला का? तुमच्या हृदयाचे बायोलॉजिकल वय हे तुमच्या वयापेक्षा जास्त असेल तर .. म्हणजे तुम्ही ५५ वर्षांचे आहात आणि तुमचे हृदय ६५ वर्षांचे दिसत असेल तर ..
तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे?; पण हे खरे असू शकते. अशा स्थितीत तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा धोका अधिक असू शकतो. त्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) टेस्ट करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या या टेस्टमुळे तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याविषयी अधिक माहिती मिळू शकते.

जर तुम्ही ५५ वर्षांचे असाल; पण इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या रीडिंगनुसार तुमच्या हृदयाचे वय ६५ वर्षे दाखवत असेल, तर समजायचे की तुमचे अवयव तुमच्यापेक्षा लवकर वृद्ध झाले आहेत. त्यामुळे होणाऱ्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका टाळण्यासाठी आणि हृदयाचे वय कमी करण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलणे आणि चांगल्या आरोग्याच्या सवयी स्वीकारणे गरजेचे आहे. जर गरज भासली, तर वैद्यकीय सल्ला घेणेही तितकेच आवश्यक आहे.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

हेही वाचा : Heart Attack & Depression : ‘टॉक थेरपी’मुळे डिप्रेशन आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो?

दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओ थोरेसिक सर्जरीचे सल्लागार डॉ. वरुण बन्सल सांगतात की, एखाद्या व्यक्तीचे इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या मदतीने जाणून घेतलेले हृदयाचे वय त्या व्यक्तीच्या आरोग्य स्थितीबद्दल तपशीलवार माहिती देऊ शकते.

इलेक्ट्रोकार्डिओग्राम बायोलॉजिकल वय आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांविषयी कसा अंदाज लावू शकतो?

हार्ट रेट, ऱ्हिदम आणि इलेक्ट्रिक पॅटर्न या इलेक्ट्रोकार्डिओग्रामवर दिसणाऱ्या पॅरामीटर्सवरून तज्ज्ञ हृदयाच्या बायोलॉजिकल वयाचा अंदाज लावू शकतात. विशेष म्हणजे हृदयाचे वय हे व्यक्तीच्या वयापेक्षा वेगळे असू शकते. त्यावरून हृदयाशी संबंधित आजार आणि भविष्यात आरोग्याशी संबंधित अडचणींचा अंदाज लावला जातो; ज्यामुळे वेळेपूर्वी उपचार घेऊन आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.

चांगल्या आरोग्याच्या सवयी हृदयाचे बायोलॉजिकल वय कमी करू शकतात?

अनेक अभ्यासांतून असे समोर आले आहे की, जर चांगल्या आरोग्याच्या सवयींचे पालन केले, तर हृदयाचे बायोलॉजिकल वय आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका टाळता येतो. त्यासाठी नियमित व्यायाम, चांगला आहार व आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करायला हवी.
शारीरिक हालचाली आणि नियमित व्यायाम केल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो; ज्यामुळे हृदयाचे वय कमी होऊ शकते.

हेही वाचा : महिलांनो PCOS चा त्रास होतो? मग कोणता आहार घेतला तर फायदा होईल? स्त्रीरोग तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला येईल कामी! 

धूम्रपान किंवा मद्यपान केल्यामुळे हृदयाच्या वयावर कसा परिणाम होतो?

हृदयाशी संबंधित आजार होण्यामागे धूम्रपान हे खूप मोठे कारण आहे. त्यामुळे हार्ट रेट, ऱ्हिदम व रक्तवाहिन्यांचे कार्य यामध्ये अडचणी येऊ शकतात. व्यक्तीच्या वयाच्या तुलनेत हृदयाचे वय वाढू शकते. मद्यपान केल्यानंतरही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयाचे स्नायू कमकुवत होणे इत्यादी कारणांमुळे हृदयाचे वय वाढू शकते.

जर हृदयाचे वय व्यक्तीच्या वयापेक्षा जास्त असेल, तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो का?

अभ्यासानुसार हृदयाचे वय जास्त असेल, तर हृदयविकाराचा झटका, हृदय फेल्युअर होणे आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदयाचे वय त्याच्या वास्तविक वयापेक्षा जास्त असते, तेव्हा समजायचे की, त्याचे हृदय वृद्ध झाले आहे; ज्यामुळे हार्ट रेट, ऱ्हिदमचा स्पीड कमी होतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम टेस्ट करणे आवश्यक आहे. या टेस्टमुळे लवकरात लवकर उपचार करणे सहज शक्य होते आणि जीवनशैलीत बदल करता येऊ शकतो; ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

हेही वाचा : सावधान! तुम्ही रोज प्लास्टिकच्या डब्यातले अन्न खाता का? मग वाचा तज्ज्ञ काय सांगतात ….

जर हृदयाचे वय तुमच्या वयापेक्षा कमी असेल तर?

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे वय हे त्याच्या वास्तविक वयापेक्षा लहान असेल तर समजायचे की त्याचे हृदय तरुण, निरोगी, तणावमुक्त आहे आणि चांगले काम करीत आहे. अशा व्यक्तीला हृदयाशी संबंधित आजारांचा किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. हृदयाचे वय कमी असणाऱ्या व्यक्तींना नियमित व्यायाम, संतुलित आहार घेणे इत्यादी आरोग्यदायी सवयी असतात. या सवयी त्यांना निरोगी राहण्यास प्रोत्साहन देतात.