IIT Professor Heart Attack Death Due To Cholesterol: थंडीत हृदयविकाराच्या घटनांची प्रकरणे वाढत असताना अलीकडेच एका ५३ वर्षीय आयआयटी प्राध्यापकाचा व्यासपीठावरून भाषण करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांना पाच वर्षांपासून उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास होता. ते कोणत्या प्रकारची औषधे आणि किती काळ घेत होता हे माहित नसले तरी, या प्रकरणातून शिकण्याची बाब म्हणजे भारतीयांना कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याइतकेच महत्त्व कोलेस्ट्रॉलचीच्या वाढीच्या लक्षणांकडे सुद्धा देण्याची गरज आहे.

खरं तर, अलीकडेच जर्नल PLOS One मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात सांगण्यात आले होते की, ५५ हुन अधिक वयाच्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि/किंवा उच्च कोलेस्टेरॉल असण्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. आज आपण कोलेस्टरॉलचा धोका कसा ओळखावा व कमी करावा याविषयी डॉ कुमार केंचप्पा, सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेली माहिती जाणून घेऊया.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Success story of Pratiksha Tondwalkar who once worked as a sweeper and now holds the SBI AGM post
शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?

कोलेस्टरॉलमुळे अचानक हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कसा वाढतो?

हृदयाच्या धमन्या कोलेस्टेरॉलने बंद झाल्यास अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. हृदयविकाराचा झटका वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन किंवा जलद अनियमित हृदयाचे ठोके वाढवतो ज्यामुळे हृदयाचे काम थांबते आणि अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तसेच, हृदयविकाराच्या झटक्यामुळे पेशी व उतींना दुखापत होऊ शकते, ज्यामुळे भविष्यातही हृदयाच्या ठोक्यांची लय बदलते.

काहींमध्ये कायमच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक का असते?

भारतीयांमधील कोलेस्टेरॉल वाढण्याचे प्रमाण अनुवांशिकदृष्ट्या प्रभावित आहे. सोपा अर्थ सांगायचा तर आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे चयापचय करण्यासाठी पुरेसे एंजाइम उपलब्ध नसतात. यकृत रक्तातील कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) किंवा खराब कोलेस्टेरॉल रिसेप्टर्सद्वारे काढून घेते पण हे कोलेस्टेरॉल मुळातच चिकट व घट्ट असते, याचे प्रमाण जितके जास्त तितका जास्त प्रभाव रक्ताभिसरणावर होत असतो. परंतु काही अनुवांशिक विकारांमध्ये, असे रिसेप्टर्स कमी किंवा काहीवेळा अजिबातच उपस्थित नसतात. या स्थितीला फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात ज्यामुळे रक्तप्रवाहात कोलेस्टेरॉल जमा होते. अगदी किशोरवयीन वर्गात सुद्धा हा धोका कायम असतो.

तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉलचा धोका आहे की नाही हे कसं ओळखायचं?

तज्ज्ञ सांगतात की, 20 ते 25 वयोगटातील व्यक्तींनी सुद्धा ठराविक कालांतराने कोलेस्ट्रॉल तपासणी करायला हवी, जर प्रमाण सामान्य असेल तर साधारण पाच पाच वर्षांनी तपासणी केली तरी चालू शकते. अन्यथा प्रत्येक वर्षी चाचणी करावी. जर तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असेल तर जीवनशैलीच्या बदलांपासूनच सुरुवात करावी लागेल. विशेषत: लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारातील बदल आणि शारीरिक व्यायाम वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच, कोलेस्टेरॉलसह रक्तातील साखर आणि रक्तदाब या दोन्हीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे कारण यापैकी एकाही घटकाची उच्च पातळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवते. न खाता (रिकाम्या पोटी) रक्तातील साखरेची पातळी 99 mg/dL किंवा त्याहून कमी असणे हे सामान्य आहे, तर 100 ते 125 mg/dL प्रीडायबेटिस मानले जाते आणि 126 mg/dL किंवा त्याहून अधिक मधुमेह सूचित करते. दुसरीकडे, HbA1c चाचणी, गेल्या तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवते आणि ती चार टक्क्यांपेक्षा कमी असावी. अनियंत्रित रक्तदाबाचा तुमच्या धमन्या आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, भारतीयांमध्ये, लठ्ठपणा हा सुद्धा एक प्रमुख जोखीम घटक आहे आणि ज्यांचे कोलेस्टेरॉल जास्त आहे त्यांचे सरासरी वजन सामान्य वजनापेक्षा १० किलो जास्त असते. यासाठी योगा किंवा मध्यम तीव्रतेचा शारीरिक व्यायाम आवश्यक आहे.

कोलेस्टेरॉलची पातळी किती असावी?

जर LDL चे प्रमाण खूप जास्त असेल तर डॉक्टर गोळया औषधे लिहून देतात. सामान्य LDL पातळी 100 mg/dL पेक्षा कमी असावी आणि सामान्य ट्रायग्लिसराइड पातळी 150 mg/dL पेक्षा कमी असावी. परंतु उच्च रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब असल्यास तुम्हाला तुमची LDL पातळी 70 mg/dL, शक्यतो 50 mg/dL च्या खाली ठेवावी लागेल. तुमच्या कुटुंबात ५५ वर्षांखालील हृदयविकाराचा झटका येण्याचा इतिहास असल्यास, डॉक्टरांनी सुचवलेले स्टॅटिन (औषध) घेणे अति उत्तम! हे औषध यकृतामध्ये कोलेस्टेरॉलचे उत्पादन थांबवते.

हे ही वाचा<< मला सर्दी, ताप आहे की Covid JN.1, फरक कसा ओळखावा? तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणे, उपचार

स्टॅटिन्स थांबवू नका!

स्टॅटिनच्या वापराबाबत टाळाटाळ करण्याचे एक कारण म्हणजे स्नायूंवर होणारा परिणाम! मात्र फायदे व परिणाम यांची तुलना केल्यास फायद्याचे प्रमाण जास्त असते. अगदी सहा ते आठ महिन्यांमध्ये तुम्ही मूळ कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर परत येऊ शकता. लक्षात ठेवा वयानुरूप व अन्य आजारांच्या वाढीनुसार गुंतागुंत निर्माण होऊ शकते त्यामुळे परिस्थिती कठीण होण्याआधीच संबंधित औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेण्यास सुरुवात करावीच. स्टॅटिन्स केवळ LDL कमी करण्याचेच नाही तर अन्यही अनेक कामे करते. रक्तवाहिन्यांमधील जळजळ नियंत्रित करण्यापासून प्लेक फुटण्याचा धोका कमी करेपर्यंत अनेक फायदे स्टॅटिन्स देतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

Story img Loader