डॉ. जाह्नवी केदारे

घरासमोरून मिरवणूक चालली होती. कानठळ्या बसतील अशा आवाजात संगीत सुरू होते. जोरजोरात गाणी लावली होती. घरात शिरताच वैताग आला आणि माझी चिडचिड सुरू झाली. समोरच्या मैदानातल्या गणपती उत्सवात रोज सकाळी भूपाळी लावत होते त्याची आठवण झाली आणि दोन्हीमधला विरोधाभास जाणवला. सकाळी मधुर आवाजातली अर्थपूर्ण भूपाळी ऐकून गेले दहा दिवस मन प्रसन्न होई, ताजेतवाने वाटे. त्या उलट ह्या मिरवणुकीतल्या गोंधळाने मात्र मनावर ओरखडे आल्यासारखे वाटले.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

घड्याळात न बघता किती वाजले ते कळावे यासाठी रोज सकाळी एफ. एम. रेडीओ किंवा अस्मिता वाहिनी लावणारे बरेच जण असतात. पण वेळ कळण्याबरोबरच चांगली गाणी ऐकायला मिळाली तर अर्थातच खूश व्हायला होते. आपल्यापैकी बहुतेकांची आवडती गाणी, आवडते गीतकार, संगीतकार आणि गायक ठरलेले असतात. संगीताच्या या प्रत्येक घटकाशी आपले एक अतूट नाते लहानपणापासूनच तयार होते. आपल्याकडे तर चित्रपट गाण्यांमुळे हिट होतात. भावगीतांचे आणि नाट्यसंगीताचे एक भांडारच आपल्याकडे आहे. अनेक जणांना शास्त्रीय संगीताचीही खूप आवड असते. शास्त्रीय गायन आणि विविध वाद्यांचे वादन याची काही प्रमाणात तरी ओळख आपल्याला असते. अशा प्रकारे संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

हेही वाचा : आरोग्य वार्ता : झोपेतील छोटयाशा व्यत्ययाचाही मन:स्थितीवर वाईट परिणाम

संगीत नादमय असते, तालबद्ध असते, त्याला लय असते आणि त्यातून विविध भावनांचा आविष्कार होतो. संगीताचा आपल्या भावभावनांवर परिणाम होतो. आपल्या मेंदूतील वेगवेगळ्या रसायनांचे प्रमाण संगीताने बदलते आणि आपल्या भावना आणि वागणे यावर परिणाम होतो. आपल्या प्रतिकारशक्तीला आवश्यक अशा पेशींचे प्रमाण संगीताने वाढते. मनावर ताण निर्माण करणारया अंतःस्रावाचे प्रमाण संगीताने कमी होते. संगीताचा असा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो.

संगीत ऐकणे आणि गाणे म्हणणे, वाद्य वाजवणे अशा दोन प्रकारे संगीताचा आस्वाद घेता येतो. आपण एकटेच गाणे ऐकतो किंवा एखाद्या कार्यक्रमात अनेकजण एकाचवेळेस संगीताचा आनंद लुटतात. कधी कधी आपण आपल्याशीच गुणगुणत असतो, तर कधी कुणासमोर गाणे म्हणून दाखवतो. याउलट सामूहिक गीत किंवा वादन यात आपण इतरांच्या सोबत आपली कला सदर करतो. या प्रत्येक गोष्टीत वेगळा आनंद सामावलेला असतो. समूहाबरोबर काम करताना आपण आपोआप दुसऱ्यांशी सहकार्य करायला शिकतो. इतरांशी आपले एक नाते निर्माण होते आणि आपल्यातील एकटेपणा संपून जातो.

संगीताच्या अशा विविध गुणधर्मांचा मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी उत्तम उपयोग करता येतो. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण याचा अनुभव घेतच असतो. खूप दमून घरी आल्यावर एखादे उडत्या चालीचे, आनंदी भाव निर्माण करणारे गाणे ऐकले की आपोआप उत्साह वाटतो आणि आपण कामाला लागतो.

हेही वाचा : Health Special : सर्वोत्तम देहबल कधी असते?

प्रवासात गाणी ऐकण्याची अनेकांना सवय असते. त्याचा तर आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी नक्की उपयोग होऊ शकतो. मनात खूप विषय घोळताहेत, समोर कामाने गच्च भरलेला दिवस आहे, काही विषयांमधला संघर्ष मनात सुरू आहे अशा वेळी आपले आवडते एखादे गाणे लागले आणि आपण ते लक्षपूर्वक ऐकले तर आपल्या मनावरचा ताण कमी होतो. शरीर आणि मन शिथिल (relax) होते, लक्ष केंद्रित करता येते; त्यामुळे कामे भराभर होतात आणि दिवस मजेत पार पडतो. संगीत ऐकणे आणि प्रत्यक्ष सादर करणे दोन्ही गोष्टींनी ताण कमी होतो. स्वतःच्या भावना व्यक्त करायला संगीत मदत करते. आपल्यातील सर्जनशीलता वाढवते.

किशोरावस्थेतील मुलांच्या दृष्टीने तर संगीत फार महत्त्वाचे असते. स्वत्वाची ओळख करून द्यायला संगीताची मदत होते, तसेच मित्रमंडळींमध्ये सामावून जायला संगीत मदत करते. मुलांच्या भावनांचा उद्रेक न होता त्या व्यक्त होण्याचे साधन म्हणजे संगीत. या उलट काही विशिष्ट प्रकारचे कर्कश्श संगीत आक्रमकता वाढवते, हिंसक वृत्ती निर्माण करते. काही वेळा संगीत उद्दीपित करणारे असते. स्वतःच्या भावना ओळखायला शिकतानाच संगीताद्वारे इतरांच्या भावना समजून घ्यायलाही मुले शिकतात. समूहात कसे वागायचे, एकमेकांशी नाते कसे जोडायचे हेही शिकतात.

हेही वाचा : Health Special : अष्टपैलू राजगिरा

विद्यार्थ्यांमध्ये तर असे शास्त्रीय संशोधन झाले आहे की संगीताने त्यांची चिंता, दडपण कमी होते आणि शैक्षणिक प्रगती होते. अर्थात कोणत्या प्रकारचे संगीत हे महत्त्वाचे आहे. संगीताचा मानसिक विकारांच्या उपचारांमध्येही यशस्वीपणे वापर केला गेला आहे. आपल्याकडे तर प्राचीन काळापासून हा उपयोग माहीत आहे. विशिष्ट राग विशिष्ट रोग बरे करण्यासाठी वापरले जात असे आपले प्राचीन साहित्य सांगते. विविध रागांमधून विविध रस निर्माण होतात हे तर आपण जाणतोच. चिंता, विशेषतः शस्त्रक्रियेआधी निर्माण होणारी चिंता, त्यानंतर होणाऱ्या वेदना, मरणाच्या जवळ येऊन ठेपलेल्या रुग्णाच्या मनातली भीती कमी करण्यासाठी संगीत उपचारपद्धतीचा वापर केला जातो. उदासीनता कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. अर्थात औषधोपचारही आवश्यक असतातच. संगीत उपचार पद्धतीमध्ये संगीत ऐकणे, गीत लिहिणे, त्याला चाल लावणे, ते म्हणणे, एखादे वाद्य वाजवणे अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. अगदी स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक विकारामध्येही रुग्णाने समूहामध्ये मिसळावे, तसेच आपल्या भावना व्यक्त कराव्या, आक्रमकता कमी व्हावी यासाठी संगीताचा उपयोग केला जाऊ शकतो. संगीत म्हणजे एक प्रकारचे ध्यान(meditation) लावणे होय. मानसिक समाधानापासून अध्यात्मिक प्रगतीपर्यंत संगीताचा प्रत्येकाला उपयोग होतो, तो प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे.