वॉशिंग्टन : वातावरणातील बदलांचा परिणाम हवामान, पर्यावरणांवरच नाही तर मानवी आरोग्यावरही होत आहे. नव्या संशोधनानुसार वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. बालकांची संज्ञानात्मक क्षमता आणि भावनिक कौशल्यांचा सामान्य विकास यावर वातावरणातील बदलांचा परिणाम होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि इकोअमेरिका’ यांनी यासंदर्भातील संशोधन अहवाल सादर केला आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम बालविकासावर होत असल्याचे हा अहवाल सांगतो. नैराश्य, भीती, चिंता, असुरक्षित भावना असे दुष्परिणाम होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, हवामानातील बदलामुळे उद्भवणाऱ्या अनेक घटनांचा परिणाम गर्भाच्या सामान्य विकासात व्यत्यय आणू शकतो आणि त्यामुळे चिंता किंवा नैराश्यग्रस्त विकार, एडीएचडी आदी विकार होऊ शकतात, तसेच नंतरच्या काळात मानसिक विकारही होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impacts of climate change hit children mental health zws
Show comments