Summers Diet In Heat Stroke: उन्हाळा आला आहे. कडक उन्हामुळे आणि उष्णतेमुळे लोकांना अनेकदा अशक्त वाटू लागते, आजारी पडतात. अशावेळी आहार, व्यायाम आणि काही साध्या गोष्टींचे आवर्जून पालन करावे लागते. अन्यथा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला चक्कर, डोळ्यासमोर अंधारी येण्यासह उन्हाचा ताप, डोळ्यांची आग, मूत्राघात यांसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत हिट स्ट्रोक टाळण्यासाठी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, जे पचन सुधारतात आणि उन्हाळ्यात फिट राहण्यास मदतही करतात. जाणून घेऊया या पदार्थांबद्दल…

१. पुदीना खा –

पुदिन्याची ताजी पाने खाल्ल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकतो. यामध्ये असलेले मेन्थॉल शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. यासोबतच उष्माघातापासूनही बचाव होतो.

modi dont have time for Manipur marathi news
लोकमानस: मोदींना मणिपूरसाठी वेळ नसावा?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत

२. किवी खा –

एका रिपोर्टनुसार कीवीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होऊ शकते. यामध्ये असलेले पोटॅशियम उष्माघातापासून आराम देण्यास उपयुक्त आहे

३. काकडीचे सेवन करा –

कडक उन्हात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडीचे सेवन जरूर करा. त्यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक आढळतात. जे तुम्हाला उन्हाळ्यात फिट राहण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असलेले खाद्यपदार्थ जे केवळ शरीराला हायड्रेट ठेवत नाहीत तर पचनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरतात.

४. कवठ सरबत –

सरबत प्यायल्याने उष्माघातात आराम मिळतो. कवठ सिरपमध्ये भरपूर फायबर असते, ते पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

हेही वाचा – गाजराचा जन्म कुठे झाला ? आंतरराष्ट्रीय गाजर दिनानिमित्त जाणून घ्या ‘या’ रंजक गोष्टी

असा घ्या आहार –

पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.