आयुर्वेदानुसार हेमंत ऋतूमध्ये अर्थात हिवाळ्यात वात-पित्त-कफ हे शरीर-संचालक दोष समस्थितीमध्ये असल्याने स्वास्थ्य उत्तम असते. याचा अर्थ या दिवसांत शरीराची रोगप्रतिकारक्षमाता सुद्धा सक्षम होते का, तर याचे उत्तर आहे होय, हिवाळ्यात रोगप्रतिकारयंत्रणा सक्षम असते. कोणत्याही प्राण्याच्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचा संबंध प्रामुख्याने रक्तामधील पांढर्‍या पेशींशी आहे,हे आपण जाणतो,तसाच तो मानवी शरीरामध्येसुद्धा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यामध्ये सुजेसंबंधित सायटोकाईन्स नावाची विशिष्ट रसायने रक्तामध्ये वाढत असल्याचे संशोधनामध्ये दिसून आले आहे. शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचा निदर्शक असलेला ’आय एल ६’ हा घटक हिवाळ्यात सर्वाधिक प्रमाणात निर्माण होतो, असेसुद्धा निरीक्षण संशोधकांनी केले आहे, जे हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कार्यान्वित असल्याचे सुचवते. हिवाळ्यात रोगप्रतिकारयंत्रणा सक्षम होण्याचा संबंध मेलेटोनिनशीसुद्धा आहे, तर त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा… Mental Health Special : पासवर्ड कसा हवा?

हिवाळ्यात सूर्यप्रकाशाअभावी मेलॅटोनिनचे अधिक स्त्रवण

हिवाळ्यात रोगप्रतिकारक्षमत्व सबल होण्याचा संबंध शास्त्रज्ञांच्या मते मेलॅटोनिनच्या स्त्रवणाशी आहे आणि मेलॅटोनिनचा संबंध सूर्यप्रकाशाशी आहे. बाहेरच्या वातावरणामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असेल तेव्हा शरीरामध्ये मेलॅटोनिनचे अधिक स्त्रवण होते.

हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. थंडीमुळे लोक फारसे घराबाहेर पडत नाहीत व सूर्यकिरणांशी शरीराचा संपर्क होत नाही. कमी सूर्यप्रकाश म्हणजे अधिक मेलॅटोनिन आणि अधिक मेलॅटोनिन म्हणजे कार्यान्वित रोगप्रतिकारशक्ती असे हे गणित आहे.

मेलॅटोनिनचा रोगप्रतिकारशक्तीशी संबंध काय अस प्रश्न वाचकांना पडला असेल, तर त्यासंबंधीसुद्धा थोडक्यात समजून घेऊ.

हेही वाचा… Health Special : व्यायाम आणि पाठीचे स्नायू

मेलॅटोनिनविषयी…

मेलॅटोनिन हे रोगप्रतिकारशक्ती संवर्धक आहे. विविध प्रकारच्या रोगजंतूंशी लढण्याच्या शरीराच्या रोगप्रतिकारयंत्रणेला कार्यान्वित करण्यामध्ये मेलॅटोनिन एक अत्यावश्यक घटक आहे.

प्रत्यक्षात रोगप्रतिकारशक्तीचा संबंध आहे तो पांढर्‍या पेशींशी. शरीराचे विविध घातक पदार्थांपासून रक्षण करणार्‍या आणि शरीरामध्ये शिरलेल्या परकीय पदार्थांचे भक्षण करणार्‍या न्युट्रोफ़िल्स,बेसोफ़िल्स, इओसिनोफ़िल्स व मॅक्रोफेजेस प्रकारच्या पांढर्‍या पेशींच्या निर्मितीशाठी आवश्यक असणारे कोष (पेशी) तयार करण्यास मेलॅटोनिन उत्तेजना देते.

नॅचरल किलर्स (सीडी-८) व टी हेल्पर्स (सीडी-८) या नावाने ओळखल्या जाणार्‍या संरक्षक पेशींच्या निर्मितीमध्ये मेलॅटोनिन आवश्यक असते. एकंदर पाहता मेलॅटोनिनमुळे पांढर्‍या पेशींसंबंधित व शरीरकोषांसंबंधित अशी उभयप्रकारची रोगप्रतिकारशक्ती निश्चित वाढते. रोगप्रतिकारशक्ती सुदृढ असल्याने हिवाळ्यामध्ये मानवी आरोग्य ठणठणीत राहणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In winter how immunity is becomes strong hldc asj
Show comments